नेपोटिझम करु पाहणाऱ्याला मनसे देणार दणका, कलाकारांना मनसेचा दिलासा

नेपोटिझम करु पाहणाऱ्याला मनसे देणार दणका, कलाकारांना मनसेचा दिलासा

चित्रपटात काम करु पाहणाऱ्या कलाकरांना ‘नेपोटिझम’ चा अनुभव अनेकदा आला आहे. या नेपोटिझममुळे अनेकांची करीअर सुरु होण्याच्या आधीच संपली आहे. बॉलीवूड हे केवळ स्टार किडचे आहे किंवा या वर्तुळात काम केलेल्या व्यक्तींचे आहे असे मानणाऱ्या अनेकांनी आतापर्यंत नवोदित कलाकारांना दाबून ठेवले असा दावा केला जातो. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागेही नेपोटिझमच जबाबदार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या महत्वाचा मुद्दा लक्षात घेत मनसेने कलाकारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नेपोटिझम करु पाहणाऱ्यांना मनसे स्टाईल दणका मिळणार आहे. ही माहिती नुकतीच देण्यात आली आहे. त्यामुळे कलाकारांना मोठा आधार मिळाला आहे.

बॉलीवूडच्या 'मास्टरजी' सरोज खान यांचे निधन

मनसे घेणार अॅक्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व प्रवक्ता वागीश सारस्वत यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. कोणत्याही कलाकाराला आपल्यासोबत अन्याय झाला असे वाटत असेल तर त्यांनी तातडीने मनसे कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शूटिंगच्या ठिकाणी जर तुमचा मानसिक छळ होत असेल, तुम्हाला मुद्दाम डावलले जात असेल तर अशा वेळी तुम्ही मनसे कार्यालयात संपर्क साधा. मनसे तुमच्या पाठिशी राहिल आणि यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

Instagram

कोणत्याही बड्या असामीला घाबरण्याची गरज नाही.

वागीश म्हणाले की, नेपोटिझम सारख्या गोष्टीचा तपास पोलिसांनी अधिक करायला हवा. त्यासाठी त्यांनी कोणालाच घाबरायला नको.  नेपोटिझम हा विषय फारच गंभीर आहे हे लक्षात घेत आता पोलिसांनीही याचा अधिक तपास करायला सुरुवात केली आहे. ही सुरुवात आधीच व्हायला हवी होती. या संदर्भात चौकशीही करायला हवी. 

वाढीव वीजबिलामुळे बॉलीवूड स्टारही झाले हैराण

सुशांतच्या गूढ आत्महत्येनंतर हा विषय आला समोर

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि पुन्हा एकदा नेपोटिझम हा शब्द सातत्याने समोर येऊ लागला. अनेकांनी त्यांच्या आत्महत्येचे कारण हे नेपोटिझम म्हटले होते. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या जाण्याला नेपोटिझम कारणीभूत असल्याचे म्हटले. तो इंडस्ट्रीमधील या गोष्टीने तणावाखाली होता. सिरिअलमधून हिट चित्रपट असा प्रवास त्याने केला पण काही लोकांनी त्याची दार मुद्दाम बंद केली होती. असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणे फारच गरजेचे असल्याचे लक्षात घेतच मनसेने हे महत्वाचे पाऊल कलाकारांसाठी उचलले आहे.

सुशांत सिंह राजपूतचा हा फोटो तुम्हालाही करेल भावुक

कंगनाने टाकला प्रकाश

 कंगना रणौत अनेकदा वादाचे विषय उकरुन काढत असली तरी तिने नेपोटिझम हा शब्द सगळ्यात आधी बाहेर काढला. तिने या आधीही करण जोहरवर निशाणा साधला होता. तिने मोठे निर्माते आणि दिग्दर्शक फक्त स्टार किडलाच चित्रपटात घेतात. इतर अनेक चांगल्या कलाकारांना त्यामुळे संधी मिळत नाही, हे तिने आधीच सांगितले होते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिने हा विषय अधिकच लावून धरला. तिने यासाठी सलमान खान, करण जोहर, महेश भट यांच्यावरही टिकास्त्र उगारली होती.


पण आता मनसेच्या निमित्ताने कलाकारांना नेपोटिझम सहन करण्याची गरज भासणार नाही. आणि सुदैवाने नेपोटिझमची कीडही मुळासकट उपटून काढता येईल.