ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अर्जुन कपूर आणि तारा सुतारियाच्या ‘एक व्हिलेन रिटर्न्स’चं शूटिंग सुरू

अर्जुन कपूर आणि तारा सुतारियाच्या ‘एक व्हिलेन रिटर्न्स’चं शूटिंग सुरू

एक व्हिलेन रिटर्न्स चित्रपटाची चर्चा गेले वर्षभर सुरू आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाची अगदी आतूरतने वाट पाहत आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे शूटिंग चांगलेच रखडले होते. मात्र अनलॉकनंतर आता निर्माता मोहित सूरी या चित्ररपटाचे दिग्दर्शन करण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे मोहित सूरीने अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री तारा सुतारियासोबत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात देखील केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग गोव्यामध्ये सुरू झालं असून अर्जुन आणि ताराचं शूटिंग शेड्यूल झालं आहे. मोहित सूरीने  सोशल मीडियावर याबाबत शेअर केलं आहे की, ” एक व्हिलेन रिटर्न्सच्या  सेटवर परत येऊन चांगलं वाटत आहे” याआधी या चित्रपटाचे  काही रोमांचक सीन्स जॉन अब्राहम आणि दिशा पटनीसोबत शूट झालेले आहेत. त्यानंतर गोव्यात दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंगही पार पडलं होतं. मात्र नंतर लॉकडाऊन सुरू झाला होता. आता अर्जुन  आणि तारासोबत या चित्रपटाच्या तिसऱ्या शेड्यूलचं शूटिंग सुरू झालं आहे.  

एक व्हिलेन रिटर्न्स या चित्रपटाचा आहे सीक्वल

एक व्हिलेन हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका होत्या. प्रत्येक चित्रपटामध्ये एक हिरो आणि एक व्हिलेन असतो. मात्र या चित्रपटात दोन व्हिलन आहेत ज्यापैकी एक हिरो बनतो. गुरू नावाचा गुंड जो कोणालाही सहज मारू शकतो. मात्र एकदा पोलिसांनी पकडलं असताना तो एका मुलीला भेटतो जिचं नाव आयशा असतं.आयशा गंभीर आजाराने त्रस्त  असते ज्यामुळे डॉक्टरांनी ती काहीच दिवस जगेल असं सांगितलेलं असतं. उरलेलं आयुष्य आनंदात घालवण्यासाठी ती नेहमीच्या आयुष्यापेक्षा कुठेतरी दूर जाण्याच्या विचारात असते. आयशा गुरूला व्हिलन म्हणत असते. शेवटी आयशाचा खून होतो. या चित्रपटात गुरूप्रमाणेच राकेश नावाचा व्हिलन असतो. आयशाचा खून करणाऱ्या राकेश आणि गुरूचा संघर्ष यात दाखवण्यात आला आहे. आता नव्या सीक्वलमध्ये  काय स्टोरी असणार हे जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

कसा असणार एक व्हिलनचा सीक्वल

एक व्हिलेन रिटर्न्स भूषण कुमारच्या टी सिरिज  आणि एकता कपूरच्या  बालाजी टेलिफिल्मद्वारा संयुक्तिक रितीने केले जात आहे. निर्मात्यांच्या मते कोविडबाबत सर्व नियम पाळत कलाकार आणि प्रॉडक्शन टीम चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी सेटवर एक बबल बवण्यात आला आहे. सेटवरील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मोहित सूरी सर्व सुरक्षेचे नियम पाळत शूट करताना दिसत आहेत. ज्यामध्ये मोहित सूरी यांनी तोंडावर काळ्या रंगाचा मास्क लावला आहे आणि चित्रपटाचा फ्लॅप दिसत आहे. चित्रपटाची कथा किती थरारक आणि  रोमांचक असणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजू शकेल. चित्रपटाच्या नावावरून या चित्रपटाचे कथानक पहिल्या भागाशी जोडलेले असणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीक्वल पाहण्यासाठी  तुम्ही एक व्हिलेन आधी पाहिलेला असायला हवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

पुन्हा एकदा एकत्र येणार गोविंदा आणि रविनाची सुपरहिट जोडी

दोन मुलांच्या जन्मानंतर ईशा देओलचा कमबॅक

अखेर आदित्य कश्यप बनणार आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक,’माझा होशील ना’ अपडेट

ADVERTISEMENT
08 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT