टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आहेत सध्या ‘हे’ हॉट मोस्ट एलिजिबल बॅचलर्स

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आहेत सध्या ‘हे’ हॉट मोस्ट एलिजिबल बॅचलर्स

लहान पडद्यावरच्या स्टार्सचं फॅन फॉलॉईंग हे मोठ्या प्रमाणात आहे. कोणत्याही मोठ्या स्टार्सइतकाच त्यांचा चाहतावर्ग हा मोठा असतो. सोशल मीडियावर तर या टीव्ही अभिनेत्यांना जास्तच मागणी आहे. खरं तर बॉलीवूड अभिनेत्यांच्या तुलनेत सोशल मीडिया असो अथवा बाहेर असो आपल्या चाहत्यांशी छोट्या पडद्यावरील कलाकारांचं कनेक्शन जास्त असतं. त्यातही काही कलाकार जर बॅचलर्स आणि हॉट हंक असतील तर त्यांना अधिक फॅन फॉलॉईंग असलेलं दिसून येतं. सध्या मालिकांच्या टीआरपी चार्टवर अनेक असे एलिजिबल बॅचलर्स आहेत ज्यांचा महिला चाहतावर्ग अधिक प्रमाणात आहे. त्यापैकी काही एलिजिबल बॅचलर्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या मोस्ट एलिजिबल बॅचलर्स लिस्टमध्ये जर सलमान खान आणि रणबीर कपूर यांची नावं असतील तर टीव्हीवरील असे काही कलाकार आहेत जे अजूनही बॅचलर असून त्यांना पाहून त्यांच्या चाहत्यांच्या हृदयांचं स्पंदन नक्कीच वाढतात. 

सिद्धार्थ शुक्ला

Instagram

टीव्ही कलाकारांमध्ये सिद्धार्थ शुक्ला हे नाव काही नवं नाही. ‘बालिका वधू’ मालिकेतून घराघरात पोहचलेला सिद्धार्थ शुक्ला हा सध्या एलिजिबल बॅचलर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकताच ‘बिग बॉस 13’ च्या नव्या सीझनमध्ये सिद्धार्थने सहभाग घेतला असून त्याचा चाहतावर्ग कॉमनच नाही तर सेलिब्रिटीमध्येही त्याचा चाहतावर्ग असल्याचं दिसून आलं आहे. सिद्धार्थने आपल्या अभिनयाने आणि त्याच्या वागण्याने सगळ्यांचच मन नेहमी जिंकून घेतलं आहे. 

झेन इमाम

Instagram

टीव्ही अभिनेता झेन इमाम हेदेखील लहान पडद्यावरील प्रसिद्ध नाव आहे. Mtv वरील ‘कैसी ये यारियां’ या मालिकेतून आपलं टीव्ही करिअर सुरू करणाऱ्या झेनला महेश भट्ट यांच्या ‘नामकरण’ या मालिकेमुळे ओळख मिळाली. तसंच झेनचा लुक आणि त्याचं व्यक्तिमत्व यासाठी झेनचा फिमेल फॉलॉईंग खूपच आहे. इतकंच नाही तर झेनचं नाव 2018 मध्ये ब्रिटिश न्यूज पेपर 'ईस्टर्न आईज' मध्ये सेक्सिएस्ट एशियन मेन लिस्टमध्येदेखील समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे मोस्ट एलिजिबल बॅचलरमध्ये झेनचं नाव येणार नाही असं होऊच शकत नाही. 

लग्नानंतर राखीला लागले आहेत आई होण्याचे वेध, व्हिडिओ केला शेअर

पार्थ समथान

Instagram

एकता कपूरने ‘कसौटी ज़िंदगी की’ च्या  रिमेकबद्दल सांगितलं तेव्हाच यामध्ये अनुराग बासूची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. बऱ्याच टीव्ही अभिनेत्यांच्या नावांची चर्चा होती पण त्यामधून ही आयकॉनिक भूमिका मिळवली ती पार्थ समथानने. पार्थने आता आपली जागा प्रेक्षकांच्या मनात करायला सुरुवात केली आहे. पार्थची उंची, त्याचा चेहरा आणि अभिनय या सगळ्यामुळेच त्याची क्रेझ सध्या वाढत चालली आहे. पार्थ हादेखील एलिजिबल बॅचलर्सपैकी एक आहे. 

मोहसिन खान

Instagram

स्टार प्लसवरील मालिका  ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील कार्तिक गोएंका कोणाला माहीत नाही असं नक्कीच नाही. ही भूमिका गेले कित्येक वर्ष मोहसीन खान साकारत आहे. मोहसीनचा फिमेल फॉलॉईंग खूपच आहे. त्याचं स्माईल बऱ्याच जणांना आकर्षित करतं. मोहसीनचं त्याची को - स्टार शिवांगी जोशीबरोबर नेहमीच नाव जोडलं गेलं आहे. पण दोघांनी कधीही ही गोष्ट कबूल केलेली नाही. पण तरीही मोहसीन हा बॅचलर्सपैकी एक कलाकार आहे. 

काजोल झाली लेखिका, श्रीदेवीच्या बायोग्राफीसाठी लिहिली प्रस्तावना

साहिर शेख

Instagram

साहिर शेख अभिनेता बनण्यापूर्वी एक वकील होता. पण आज टीव्ही इंंडस्ट्रीमध्ये मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी त्याचं नावही पुढे आहे. इतकंच नाही त्याचा फॅन फॉलोईंग भारतातच नाही तर इंडोनेसियामध्येही आहे. आतापर्यंत 20 पेक्षाही अधिक मालिकांमध्ये काम केलेला साहिर सध्या ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेमध्ये काम करत आहे. 

‘ड्रीम गर्ल’ नंतर आयुषमान खुराणा घेतोय चित्रपटांपासून ‘ब्रेक’

पर्ल व्ही पुरी

Instagram

‘नागिन-3’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारलेला मिहीर अर्थात पर्ल व्ही. पुरी या अभिनेत्याची चर्चाही सध्या आहे. पर्लने आतापर्यंत काहीच मालिकांमध्ये काम केलं आहे पण तरीही त्याचा फॅन फॉलॉईंग खूप आहे. विशेषतः मुलींमध्ये पर्लची जास्त क्रेझ आहे. पर्लचेदेखील अनेक लिंकअप्स करण्यात आले असले तरीही पर्लदेखील टीव्ही इंडस्ट्रीमधील एलिजिबल बॅचलर्सपैकी एक आहे.

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सूट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.