नवाझुद्दीन सिद्दीकीला आतापर्यंत खून करताना, दरोडा घालताना पाहिलं आहे. पण त्याला कधीही रोमँटीक भूमिकेत आतापर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर आता बघा. आता चक्क नवाझुद्दीन सिद्दकीने सनी लिओनसोबत ठुमके लावले आहेत. मोतीचूर चकनाचूर या चित्रपटातील त्याचे गाणे रिलीज झाले असून या गाण्याने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. एक नक्की की, इतरवेळी गँगस्टर असलेला नवाझुद्दीन जरा रंगीबेरंगी वेषात दिसला आहे.
मोतीचूर चकनाचूर हा नवाझुद्दीन सिद्दीकीचा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात ‘बत्तिया बुझादो’ हे सनी लिओनच आयटम साँग आहे. या आयटम साँगमध्येच सनी लिओनसोबत नवाझुद्दीन सिद्दीकी ठुमके लगावताना दिसत आहे. पहिल्यांदाच अशा अवतारात नवाझुद्दीन दिसला आहे. त्यामुळेच त्याचे हे गाणं पाहताना हसू येतं. नवाझुद्दीन जितक्या सिरिअस भूमिका चांगल्या करतो. तितक्याच तो कॉमेडी भूमिका चांगल्या करु शकेल. असे या गाण्यातून दिसून येते. त्यामुळेच हे गाणं अगदी काहीच मिनिटात प्रसिद्ध झाले आहे.
सनी लिओन हल्ली मुलांच्या संगोपनात इतकी व्यग्र आहे की, ती हल्ली कोणत्या चित्रपटात दिसली नव्हती. त्यामुळे तिच्या फॅन्सना ती कधी येणार ही प्रतिक्षा होतीच. पण आता ही प्रतिक्षा संपली असून सनी लिओन या चित्रपटातील आयटम साँगमधून पाहायला मिळाली आहे. आता सनी लिओन असणार म्हणजे तिचा हॉट अंदाज आलाच असेल तुम्हाला गाण्याचे बोलत इतके नॉटी आहेत तसचं नॉटी हे गाणं आहे.
मोतीचूर चकनाचूर या चित्रपटात नवाझुद्दीक सिद्दीकी आणि अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा विषय हा फारच वेगळा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे अथिया शेट्टीला NRI मुलाशी लग्न करायचे असते. परदेशात जाण्यासाठी तिला NRI मुलगा हवा असतो. तिने आतापर्यंत इतकी मुलं पाहिलेली असतात. पण तिच्या स्वप्नांना पूर्ण करेल असा त्यात कोणीही नसतो. ज्यावेळी ती नवाजुद्दीनला पाहते त्यावेळी मात्र तिला तो NRI आहे असे वाटते आणि ती त्याच्यासोबत लग्नाला होकार देते. पण लग्नानंतर तो NRI नसल्याचे तिला कळते. आता पुढे ती काय करणार आणि ते करताना नेमकी काय धमाल येणार हे सांगणाराच हा चित्रपट आहे.
सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी ‘हिरो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली. यात आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीही होता. दोघांचा हा डेब्यू चित्रपट होता. पण दोघांना फार काही यश आले नाही. त्यानंतर अथिया मुबारका, नवाबझाथे या चित्रपटात दिसली. त्यानंतर आता ती ‘मोतीचूर चकनाचूर’मध्ये दिसणार आहे.
एकूणच काय चित्रपटात नवाझुद्दीनची हवा असल्यामुळे चित्रपट तर चालेलच पण सध्या या गाण्याने अगदी कहर केला आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.