अभिनेत्री मौनी रॉयचा बिकिनी अवतार होतोय व्हायरल

अभिनेत्री मौनी रॉयचा बिकिनी अवतार होतोय व्हायरल

आजकाल प्रत्येक अभिनेत्री बिकिनी घालून बीचवरील आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. स्टाईलच्या बाबत सांगायचं झालं तर टीव्हीवरील ‘नागिन’ अर्थात मौनी रॉय काही कमी नाही. मौनी सध्या उन्हाळ्याची सुट्टी बीचवर एन्जॉय करत आहे. तिचे बिकिनी अवतारातील हॉट फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तिने आपल्या सुट्टीतील काही फोटोज आणि व्हिडिओ अधिकृत इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. फारच कमी वेळामध्ये तिच्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक केलं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Summers are best spent in the water 💧


A post shared by mon (@imouniroy) on
बॉलीवूडमध्ये बसवत आहे जम


टीव्हीपासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलीवूडमध्ये आपला जम बसवत आहे. मौनीचे अनेक चाहते आहेत. गेल्या वर्षी अक्षय कुमारबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनीला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद आणि प्रेम दिलं आहे. दरम्यान नुकताच तिचा जॉन अब्राहमबरोबर ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ देखील प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. पण त्यामुळे मौनीच्या चाहत्यांमध्ये काही कमी झाली नाही. मौनीचं फॅन फॉलोईंग सध्या वाढतच आहे. त्यात मौनी नित्यनियमाने आपले फोटो पोस्ट करत असते. शिवाय मौनीला स्टाईल क्वीन असंदेखील म्हटलं जातं. कारण फॅशनच्या बाबत मौनी खूपच काटेकोर असते. नुकतीच तिने घातलेल्या बिकिनीतील फोटोदेखील व्हायरल होत आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

It’s the moon that moves me , else the night sky s so obvious! #Ofmidnightswims & #starsthatmakeyoudream ❤️


A post shared by mon (@imouniroy) on
बिकिनी आणि मोनोकिनीमध्ये केली मस्ती


वास्तविक मौनीने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये ती बिकिनी आणि मोनोकिनीमध्ये मजामस्ती करताना दिसत आहे. यात एका व्हाईट बिकिनीमध्ये पोहताना व्हिडिओ तिने शेअर केले आहेत आणि एक स्लो मोशन व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. तसंच एका फोटोत तिने मोनोकिनी घातली आहे. तर एका फोटोमध्ये स्ट्राईप्ड बॅकलेस बिकिनी घातली आहे. तर बीचवर मस्तपैकी हवेत उड्या मारतानाही काही फोटो आणि व्हिडिओ तिने पोस्ट केले असून चाहत्यांने तिचा हा अवतार खूपच आवडला आहे. तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना खूपच हॉट वाटत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

...


A post shared by mon (@imouniroy) on
मौनी नेहमीच करते फोटो पोस्ट


मौनी बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. ती नेहमी आपल्या आयुष्यातील घटना तसेच ती करत असलेले चित्रपट आणि इतर गोष्टीदेखील ती पोस्ट करत असते. मौनी सध्या नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर ‘चुडीया’ तर राजकुमार रावबरोबर ‘मेड इन चायना’ या दोन चित्रपटांमध्ये काम करत आहे. शिवाय अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’मध्ये ती नकारात्मक भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होत आहे.


मोहित रैनाबरोबर जोडलं गेलं आहे नाव


मौनी आणि मोहित रैना यांचं बऱ्याच वर्षांपासून नाव जोडलं गेलं आहे. त्यामुळे मौनी आणि मोहित कधी लग्न करणार आहे असादेखील प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिच्या लग्नाकडेही सध्या चाहत्यांचं लक्ष आहे. पण मौनी आणि मोहितने नेहमीच आपल्या नात्यावर न बोलणं पसंत केलं आहे. त्यांचे फोटो तर व्हायरल होत असतात, पण अजूनही दोघांनी आपलं नातं कधीही जगासमोर स्वीकारलेलं नाही. पण तरीही हे दोघं नात्यात असल्याचं नेहमीच बोललं जातं. त्यामुळे आता मौनी कधी लग्न करणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


अभिनेत्री मिनिषा लांबाचं हॉट बिकिनी शूट


इन्स्टाग्राम सेन्सेशन बनली आहे 'ही' मिस इंडिया बिकिनी


‘बेहद’ हॉट बिकिनीमध्ये दिसली जेनिफर विंगेट