लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार 'नागिन' फेम मौनी रॉय

लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार 'नागिन' फेम मौनी रॉय


एकता कपूरच्या नागिन या मालिकेमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या दिलखेचक अदा आणि नृत्य कौशल्यासाठी जास्त लोकप्रिय आहे. बॉलीवूडमध्ये तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती तिच्या लग्नाची... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौनी रॉय लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. 

सेलिब्रेटीजच्या लव्ह रिलेशनशिपबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र मौनीला तिच्या खाजगी आयुष्याबाबत उघडपणे सांगणं मुळीच आवडत नाही. ज्यामुळे तिच्या या रिलेशनशिपविषयी फार माहिती पुढे आली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ती या व्यक्तीला डेट करत होती. मात्र आता तिने त्याच्यासोबत चक्क लग्न करण्याचा निर्णय घेतेला आहे. मौनी तिचा खास मित्रासोबत संसार थाटणार अशी चर्चा आहे. त्याचं नाव सूरज नांबियार असं असून तो दुबईमधील एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. सूरज दुबईतील एक प्रसिद्ध बॅंकर आहे. लॉकडाऊनच्या काळात मौनी तिची बहीण, जिजाजी आणि त्यांच्या मुलांसोबत दुबईमध्ये राहत होती. ज्या काळात ती आणि सूरज एकमेकांच्या अधिक जवळ आले. त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली आणि आता लग्न करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. मौनीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर सूरजसोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने तिचं नातं ऑफिशिअली मान्य केलं आहे. मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांची फॅमिली एकमेकांना आधीपासूनच ओळखत आहे. त्यामुळे मौनी सूरजच्या कुटुंबासोबतही खूपच कम्फर्टेबल आहे. ज्यामुळेच तिने सूरजला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं आहे.

मौनी रॉय आणि सूरजच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस

मौनी रॉय सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ज्यामुळे तिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेटचाचा पाऊस पाडला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे मौनीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. असं असलं तरी अजुन याबाबत मौनी रॉयने ऑफिशिअली काहीच जाहीर केलेलं नाही. मात्र ती लॉकडाऊननंतर दुबईवरून मुंबईला येताना तिचं ह्रदय मात्र दुबईत सूरजजवळच सोडून आली हे मात्र यातून नक्कीच जाणवत आहे. 

मौनीचे आगामी चित्रपट

मौनीने तिच्या करिअरची सुरूवात 2006 साली एकता कपूरच्या क्योंकी सांस भी कभी बहू थी या लोकप्रिय मालिकेतून केली होती. यामध्ये तिने एक कृष्ण तुलसी ही एक छोटी भूमिका साकारली होती. मात्र त्यानंतर तिने दो सहेलियॉं, कस्तूरी अशा मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत अभिनयात चांगलाच जम बसवला. देवो के देव महादेव या मालिकेतून ती घरोघरी पोहचली आणि एकता कपूरच्या नागिन मालिकेतून तिला यशाचं शिखर गाठता आलं. मौनीने टेलिव्हिजनवर तर चांगलंच नाव कमावलं मात्र त्याव्यतिरिक्त बॉलीवूडमध्येही हळू हळू जम बसवला. अक्षय कुमारसोबत गोल्ड या चित्रपटात काम करत तिने तिचा बॉलीवूडचा प्रवास सुरू केला.मौनी रॉय लवकरच आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ब्रम्हास्त्रमध्ये झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रची सध्या खूप चर्चा  सुरू आहे. लॉकडाऊनमुळे या बिगबजेट चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. मौनी रॉय या चित्रपटात एक नकारात्मक भूमिका साकारणार आहे.यासोबतच मौनी रॉय लंडन कॉन्फिडेंशिअल या वेब सिरिजमधून डिजिटल माध्यमातही तिच्या अभिनयाची जादू दाखवण्यास सज्ज झाली आहे.