मौनी रॉयला नखरे पडले महागात, ‘बोले चूडियाँ’ मधून हकालपट्टी

मौनी रॉयला नखरे पडले महागात, ‘बोले चूडियाँ’ मधून हकालपट्टी

मौनी रॉय हे नाव आता बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीला नक्कीच नवीन नाही. ‘गोल्ड’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या मौनीला नवजुद्दीन सिद्धीकीबरोबर मिळालेला चित्रपट ‘बोले चूडियाँ’मधून हाकलण्यात आल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. मौनी आणि या चित्रपटाचे निर्माते राजेश भाटिया यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर मौनीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बेजबाबदार वागणुकीबद्दल मौनीला या चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्याचं राजेश भाटिया यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पहिला लुक समोर आला होता. तरीही आता मौनीच्या चुकीच्या वागणुकीमुळे तिला या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे.


नक्की काय घडलं?


mouni 1


‘नागिन’ या मालिकेनंतर मौनीला चित्रपटांमध्ये संधी मिळाली. पण दिवसेंदिवस मौनीचे नखरे खूपच वाढत चालल्याची सध्या चर्चा आहे. राजेशने मौनीला काढल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्राकडे स्पष्ट केलं आहे. ‘होय, मौनी या चित्रपटाचा आता भाग नाही आणि आम्ही आता चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीचा विचार करत आहोत. ‘बोले चूडियाँ’ या चित्रपटाला डेट्स दिल्यानंतर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी मौनीला डेट्स द्यायच्या होत्या. तसंच स्क्रिप्ट रिडिंगच्या दिवशीही ती 3 ची वेळ असताना तब्बल दोन तास उशीरा म्हणजे 5 वाजता आली. त्यामुळे तिला बदलण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आम्ही चित्रपट बनवण्याच्या व्यवसायात आहोत. अशा कोणत्याही सवयी आम्हाला नाहीत. तसंच, मौनीने सुरुवातीपासूनच अतिशय बेजबाबदारपणा दाखवल्यामुळे आम्ही आता तिच्याबरोबर हा चित्रपट करत नाही. तर ती आता जे काही सांगत आहे, ते तिच्या बचावासाठी सांगण्यात आलेल्या थातुरमातुर गोष्टी आहेत.’


मौनीच्या प्रवक्त्यांनी केली तिची बाजू स्पष्ट


दरम्यान मौनीच्या प्रवक्त्यांनीही तिची बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘मौनी आता या चित्रपटाचा भाग नाही. मौनीने याआधीही चित्रपटांमधून काम करून आपलं करिअर केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला राजेश भाटिया आपला दुसरा चित्रपट बनवत आहेत. त्यांच्या मते मौनी व्यावसायिक नाही, पण आमच्याकडे असलेल्या ईमेल आणि मेसेजवरून त्यांना आम्ही चुकीचं ठरवू शकतो. पण या सगळ्यात आम्हाला कोणतंही स्वारस्य नाही. आम्ही यावर अधिक काहीच बोलू इच्छित नाही. कोणत्याही समंजस व्यक्तीला काय खरं आणि काय खोटं ते नक्की कळेल. त्यांच्या चित्रपटासाठी मौनीकडून शुभेच्छा’. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान या प्रकरणारवर नवाजुद्दीनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या महिन्यातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. पण आता मौनी चित्रपटातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्या अभिनेत्रीच्या शोधात निर्माते आहेत. त्यामुळे आता मौनीची जागा आता कोण घेणार याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.


मौनी पोस्ट करते स्टोरीज


mouni FI %281%29


मौनी रॉय ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. नेहमी ती आपल्या स्टोरीज आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे निर्मात्यांचं असंही म्हणणं होतं की, मौनीला व्हेकेशनमध्ये वेळ घालवायला जास्त आवडत असून तिचं कामावर अजिबातच लक्ष नाही. मौनीकडे सध्या अयान मुखर्जीचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट असून ती यामध्ये नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा 


स्मिता तांबेही आता घेणार 'पंगा'


सलमानच्या फॅनने ‘भारत’साठी बुक केलं संपूर्ण थिएटर


दीपिका आणि रणबीरच्या या व्हिडिओने केली या चित्रपटाची आठवण ताजी