लॉकडाऊनमध्ये ‘यामिनी’ परत येतेय, मौनी रॉयचा पुन्हा एकदा 'नागिन'अंदाज

लॉकडाऊनमध्ये ‘यामिनी’ परत येतेय,  मौनी रॉयचा पुन्हा एकदा 'नागिन'अंदाज

टेलिव्हिजनवरील काही मालिकांचा प्रभाव नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर कायम दिसतो. ‘नागिन’ ही मालिका यापैकीच एक आहे. नागिन ही मालिका एक सुपर नॅच्युरल शो असूनही या मालिकेचे तिनही सिझन सुपरहिट झाले होते. सध्या या नागिनचा चौथा सिझन टेलिव्हिजनवर प्रदर्शित होत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे या मालिकेचं शूटिंग सध्या बंद आहे. त्यामुळे मालिकेचा चौथा सिझन सध्या प्रसारित करणं शक्य नाही. मात्र या मालिकेच्या मागील भागांची लोकप्रियता पाहता आता नागिनचा पहिला सिझन पुन्हा पुनःप्रसारित केला जाणार आहे. 

View this post on Instagram

#nagin 😍😍

A post shared by ❤ishaan😍suhana❤comeback😇 (@jaysoniraginilover) on

पाहा सुपर नॅच्युरल शो नागिनचा पहिला सिझन

लॉकडाऊनमुळे सध्या अनेक वाहिन्यांवर जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या जात आहेत. ज्यामध्ये आता आणखी एका सुपरहिट शोची भर पडणार आहे.  सुपर नॅच्युरल शो नागिनच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. नागिनच्या पहिल्या सिझनचे आता पुन्हा प्रसारण केले जाणार आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया अकाउंटवरून ही गुडन्यूज प्रेक्षकांना दिलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहीलं आहे की, “नागिन सिझन 1 रात्री 9 वा. पुन्हा पाहा कलर्स वाहिनीवर. तुमची यामिनी परत आली आहे” ज्या पोस्टवर नागिनमध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी रिप्लाय दिला आहे.

नागिन शोचा आजही प्रेक्षकांवर प्रभाव

कलर्स वाहिनीवरील नागिन 1 या सिझनमध्ये मौनी रॉय आणि अदा खान या दोन अभिनेत्रींनी नागिणीची भूमिका केली होती. ज्यामध्ये अर्जून बिजलानीची प्रमुख भूमिका होती. मालिकेतील मौनी आणि अर्जूनच्या केमिस्ट्री लोकांना फारच आवडली होती. सुधा चंद्रन यांनी या सिझनमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. या सिझनमध्ये मौनी रॉयने ‘शिवन्या’ तर अदा खानने ‘सेशा’ या नागिणीच्या भूमिका साकारल्या होत्या. अर्जून यात ‘रितिक रहेजा’ आणि ‘राजा संग्राम सिंह’ या रूपात दिसला होता. सुधा चंद्रन यांनी ‘यामिनी रहेजा’ची भूमिका साकारली होती. म्हणूनच सुधा चंद्रन यांनी या पोस्टमधून प्रेक्षकांना ‘यामिनी परत येत आहे’ असं लिहीलं आहे.या पहिल्या सिझनला लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. ज्यामुळे आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे एक दोन नव्हे तर चक्क चार सिझन तयार करण्यात आले. मात्र आता चौथ्या सिझनचं शूटिंग लॉकडाऊनमुळे ठप्प झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वाहिनीने ही नवीन शक्कल लढवली आहे. या सुपरनॅचरल टीव्ही शोला बरंच फॅन फॉलोइंग आहे. या टीव्ही शोच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये मौनी रॉय (Mouni Roy) प्रमुख भूमिकेत होती. तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) ला कास्ट करण्यात आलं होतं. सुरभी ज्योतीने नागिनची आयकॉनिक भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली होती.