कसौटी जिंदगी की : सीरियलमध्ये झाली मिस्टर बजाजची एंट्री

कसौटी जिंदगी की : सीरियलमध्ये झाली मिस्टर बजाजची एंट्री

रियल "कसौटी जिंदगी की" ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून सीरियलमध्ये हाय व्हॉल्टेज ड्रामा दिसतोय. एकीकडे भरपूर ट्विस्ट्स आणि टर्ननंतर अखेर कोमोलिकाचा मृत्यू झाला तर दुसरीकडे आता तिचा भाऊ आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आतूर आहे. एवढंच नाहीतर प्रेरणाला किडनॅपही करण्यात आलं. त्या भावापासून अनुराग-प्रेरणा स्वतःला वाचवतील पण त्यांच्या आयुष्यात नवं वादळ म्हणजेच मिस्टर बजाजची एंट्री झाली आहे.


नव्या प्रोमोत मिस्टर बजाज


सीरियल "कसौटी जिंदगी की" मध्ये अनुराग, प्रेरणा आणि कोमोलिकानंतर चौथं महत्त्वाचं पात्र मिस्टर बजाजचं आहे. मागच्या सिझनमध्ये ही महत्त्वपूर्ण भूमिका केली होती अभिनेता रोनित रॉयने. या सिझनबाबत बोलायचं झाल्यास प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्सुकता होती ती कोमोलिकाबाबत. तर तेवढीच उत्सुकता होती मिस्टर बजाजच्या भूमिकेबद्दलही. पण आता प्रेक्षकांसमोर मिस्टर बजाज यांची एंट्री झाली आहे. जे अनुराग-प्रेरणाच्या आयुष्यात काळी सावली बनून येणार आहेत.


Mr. Bajaj Entry in Kasautii 2


अनुराग- प्रेरणाच्या लग्नात मिस्टर बजाज


नुकताच या सीरियलचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला. प्रोमोमध्ये दिसतंय की, अनुराग आणि प्रेरणा पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत बांधले जाणार आहेत. या दोघांचं पहिलं लग्न देवळात झालं होतं. पण आता हे दुसरं लग्न कुटुंबाच्या संमतीने सर्वांसमोर आनंदात होत आहे.


Mr. Bajaj Entry in Kasautii 3


प्रोमोमध्ये दोघंही लग्नाचे विधी करताना दिसत आहेत आणि एकमेंंकाना वचन देत आहेत की, आता त्यांच्यामध्ये तिसरं कोणीच येणार नाही. पण तेव्हाच तिथे एंट्री होते ती मिस्टर बजाजची. तुम्हीही पाहा सीरियलचा हा नवा प्रोमो.…

 


कसौटी जिंदगी की : प्रेरणाचं हृदय जिंकण्यासाठी आता नवी एंट्री


करण सिंग ग्रोव्हर साकारतोय मिस्टर बजाज


या प्रोमोमध्ये जरी मिस्टर बजाजचा चेहरा दिसत नसला तरी या भूमिकेसाठी अभिनेता करण सिंग ग्रोव्हरची निवड निश्चित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सूरू होता. करण सिंग ग्रोव्हरच्या रूपात हा शोध थांबला आहे. मिस्टर बजाजच्या भूमिकेसाठी सुरू असलेल्या शर्यतीत हितेन तेजवानीसोबत हर्षद चोपडा, इक्बाल खान, करण वाही अशी मोठी नावं सामील होती. या सगळ्यांमध्ये अखेर बाजी मारली ती करण सिंग ग्रोव्हरने. खरंतर करण सिंग ग्रोव्हर "कसौटी जिंदगी की" च्या पहिल्या सिझनचा भागही होता.


Mr. Bajaj Entry in Kasautii 5


काही दिवसांपूर्वीच या सीरियलमधील ऑरिजिनल मिस्टर बजाज म्हणजे रोनित रॉयने त्याला या भूमिकेसाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.