‘मिस्टर इंडिया 2’ येणार परत, पुन्हा मोगँम्बो खुश होणार

‘मिस्टर इंडिया 2’ येणार परत, पुन्हा मोगँम्बो खुश होणार

नव्वदच्या दशकातील ‘मिस्टर इंडिया’ हा अनिल कपूर आणि श्रीदेवीचा चित्रपट तुफान गाजला. प्रेक्षकांनी अक्षरशः त्यावेळी हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला होता. आजही हा चित्रपट तितकाच चर्चेत आहे. ‘मोगँम्बो खुश हुआ’ या संवादाने आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. संपूर्ण चित्रपट आणि त्यातील भूमिका अजरामर झाल्या. याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कारण नुकताच या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर आणि अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये शेखर आणि अनिल एकमेकांना भेटले असून शेखर अनिल कपूरची टोपी नीट करताना दिसत आहे.काय म्हणाले शेखर कपूर आणि अनिल कपूर


शेखर कपूर आणि अनिल कपूर यांनी नुकतीच एकमेकांंची भेट घेतली आणि या भेटीचा फोटो शेखर आणि अनिल दोघांनीही आपल्या अधिकृत ट्टविटर हँडलवरून शेअर केला आहे. ‘मिस्टर इंडिया 2 च्या लुकची चर्चा करताना की अजून एखादा चित्रपट एकत्र? तू सांग’ असं कॅप्शन शेखर कपूर यांनी लिहिलं आहे. तर अनिल कपूरनेदेखील हाच फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनिलने या फोटोखाली कॅप्शन दिलं आहे, ‘मी आणि शेखर आम्ही काहीतरी नवीन आणि वेगळं भारी करण्याच्या विचारात आहोत. मिस्टर इंडियाच्या वेळी निर्माण केलेली जादू पुन्हा एकदा उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यावेळी माझी टोपी नीट करण्याने आमचं नशीब झळकवलं होतं आणि आताही तसंच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’ अनिल कपूर आणि शेखर कपूरच्या मिस्टर इंडियातील केमिस्ट्रीने त्यावेळी अनेक रेकॉर्ड केले होते. आता पुन्हा ही जोडी नक्की काय घेऊन येणार याचीच चर्चा या व्हायरल झालेल्या फोटोमुळे सुरु झाली आहे.श्रीदेवीची कमतरता भासेल


मिस्टर इंडिया 2 जरी येत असला तरीही यामध्ये श्रीदेवीची कमतरता नक्की भासेल. कारण या चित्रपटामध्ये श्रीदेवीने अप्रतिम अभिनय केला होता आणि तिच्या जागी दुसऱ्या एखाद्या अभिनेत्रीची कल्पना करणं प्रेक्षकांनाही थोडं जड जाईल. पण कथानक चांगलं असेल तर पुन्हा तीच जादू नव्या पिढीवर चालू शकेल का अशा चर्चांनाही आता उधाण आलं आहे. तर श्रीदेवीच्या भूमिकेमध्ये नक्की कोणती दुसरी अभिनेत्री चांगली दिसू शकेल याचाही आता कयास बांधायला सुरुवात झाली आहे. मिस्टर इंडिया पुन्हा बघायला सर्वांनाच आवडेल. फक्त त्याची पुन्हा एकदा त्याचप्रकारे जुळवणी व्हायला हवी.


मोगँम्बो सदाबहार भूमिका


Mr India FI


मिस्टर इंडिया अजरामर झाला त्यामध्ये मोगँम्बोचाही सर्वात मोठा वाटा आहे. ही भूमिका अमरिश पुरी यांनी साकारून अजरामर केली. आता जर पुन्हा रिमेक झाला तर या भूमिकेला कोण न्याय देणार अशाही चर्चांना आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये शेखर कपूर आणि अनिल कपूर हे रिमेक करणार असतील तर नक्की कोणत्या कलाकारांना यामध्ये संधी देतील हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत. शिवाय या चित्रपटाची कथा नक्की आता कोणत्या वळणावर घेऊन जाणार आणि या डिजीटल युगामध्ये काय वेगळेपणा दाखवणार याचंही प्रेक्षकांना आता औत्सुक्य आहे.


फोटो सौजन्य - Twitter, Instagram 


हेदेखील वाचा - 


आराध्या बच्चनचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


लवकरच मराठी पडद्यावर येतोय 'सत्यशोधक' चित्रपट


Bad News:अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बाॅम्ब'मुळे 'सूर्यवंशी' अडचणीत