पाहा #mrsmukhyamantri ची जोडी सुमी-समरच्या लग्नाचा थाट

पाहा #mrsmukhyamantri ची जोडी सुमी-समरच्या लग्नाचा थाट

मराठीतील अनेक मालिका सध्या जोरदार सुरू आहेत. त्यातच जर एखाद्या सीरियलमधल्या जोडीचा लग्नाचा एपिसोड असेल तर मग प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. सध्या मिसेस मुख्यमंत्री ही मराठी मालिका एका रंजक वळणावर आहे. या मालिकेतील जोडी सुमी आणि समरच्या लग्नाचा थाट प्रेक्षकांना वीकेंड एपिसोड्समध्ये पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने मालिकेतील जोडीचे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत.

मिसेस समर होणार सुमी

या मालिकेची कथा पहिल्यापासूनच हलकीफुलकी अशी दाखवण्यात आली आहे. मोठ्या आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातील समर साध्या घरातील सुमीच्या प्रेमात पडतो. मग सुरू होते धमाल. आधी समर आणि सुमीच्या लग्नाला तयार नसलेली समरची आई तिच्याबद्दलची भविष्यवाणी ऐकून बळंच तयार होते. असो हे झालं कथेबाबत. पण या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावाकडचं लग्न आणि विधी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

सुमीने खास लाल रंगाच्या साडीला लग्नासाठी पसंती दिली होती. या लग्नाच्या शॉपिंगवेळीही सुमी-समरने फारच धमाल केली होती. तर लग्नाच्या लुकमध्ये सुमी फारच छान दिसत आहे. एरवी अगदी साध्या लुकमध्ये दिसणारी सुमी लग्नाच्या पारंपारिक दागिन्यांमध्ये आणि साडीमध्ये अगदी नवी नवरी शोभतेय. तिला पाहून नकळतच नवराई माझी लाडाची लाडाची गं असं गाणं तोंडात येत आहे. तर समरनेही सुमीच्या आवडीने पसंत केलेला कुर्ता आणि भरजरी फेटा घालून वरात घेऊन सुमीला आणायला जाणार आहे.

या जोडीने हळद आणि मेहंदीही अगदी मस्त सेलिब्रेट केली होती. सुमीने छान फ्लोवर ज्वेलरी आणि पिवळी साडी असा पेहराव केला होता. तर समरने खास सुमीच्या नावाची मेहंदी काढली होती. पाहा सुमी समरच्या हळद आणि लग्नाचे फोटो.

लग्नाआधी खास प्री-वेडिंग शूटही केलं समर-सुमीने

या मालिकेच्या निमित्ताने एक नवा ट्रेंडही चॅनलने सुरू केला. टिपीकल मालिकांमधील हळद, मेहंदी आणि लग्न दाखवलं जातं. पण या मालिकेत तर सुमी आणि समरचं हटके आणि छान असं प्री-वेंडिग फोटोशूटही दाखवण्यात आलं होतं. पाहा सुमी-समरचं हे क्युट प्री-वेडिंग फोटोशूट.

मालिकेसाठी कलाकारांनाही शेअर केले खास फोटो

या मालिकेतील लग्नाच्या निमित्ताने दोन हॅशटॅग व्हायरल झाले होते. ते म्हणजे #MrsMukhyamantri आणि #WeddingDiary या हॅशटॅगला अनुसरून अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या लग्नाचे फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही नक्कीच नॉस्टॅल्जिक फील होईल. पाहा कलाकारांनी त्यांच्या लग्नाचे शेअर केलेले हे खास फोटोज. 

आता या थाटामाटात झालेल्या लग्नानंतर समर आणि सुमीची प्रेमकथा कोणतं वळण घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तोपर्यंत एन्जॉय करा मिसेस मुख्यमंत्री मालिकेच्या या वीकेंडचा wedding special एपिसोड.  

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.