ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर करणार ‘एंड काउंटर’

अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर करणार ‘एंड काउंटर’

अंडरवर्ल्ड, गॅंगवॉर आणि एन्काऊंटर यावर आधारित अनेक चित्रपट आपण याआधी पाहिलेत. अंडरवर्ल्ड आणि सिनेमा यांच्यातील वादग्रस्त संबंधही आपण अनेक बॉलीवूड आणि मराठी चित्रपटात पाहिले आहेत. ते नातं नेमकं काय आहे, त्याची एक वेगळी आणि हळवी बाजू या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे.  

जतीन उपाध्यय निर्मित या चित्रपटात प्रशांत नारायणन आणि मृण्मयी कोलवालकर हे मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीमोळी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर ही मूळची पुण्याची असून तिने ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेत काम केले होतं. दिग्दर्शक अलोक श्रीवास्तवच्या यांच्याच एका मराठी चित्रपटात मिस मॅचमध्येही तिने काम केलं. तिच्या अभिनयावर प्रभावित होऊन अलोक श्रीवास्तव यांनी या चित्रपटासाठी तिची निवड केली. ए.जे. एन्टरटेनमेंट प्रस्तुत आणि अलोक श्रीवास्तव दिग्दर्शित ‘एंड काऊंटर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

IMG-20190212-WA0010

ADVERTISEMENT

गुन्हेगारी विश्वाचा वेध घेणा-या या चित्रपटात प्रशांत नारायणन एन्काऊंटर स्पेशालिस्ट समीर देशमुखच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर ही रेणू म्हणजेच त्याची प्रेयसी आणि कादंबरीकाराच्या भूमिकेत दिसत आहे. मृण्मयी कोलवालकरचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या चित्रपटात समीर आणि रेणूची एक सुंदर अशी प्रेमकथा दाखवली आहे. पण या दरम्यान समीरच्या हातून एक एन्काऊंटर होतं, ज्यामुळे संपूर्ण चित्र बदलून जातं. यात पोलिस आणि गँगस्टरमधील एक मैत्रीचं घट्ट नातं देखील दाखवलं आहे, हे ट्विस्ट सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलंय. त्यामुळे ह्या प्रेमाचा शेवट गोड होती की वाईट हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. तसेच या चित्रपटात कॉमेडी स्टार एहसान कुरेशी आणि ब्रिजेश हिरजी यांच्या विनोदाने सिनेमात एक वेगळीच रंगत आणलीय. त्यांच्या विनोदामुळे क्लायमॅक्स नंतर चित्रपटात थोडा जीव आणला आहे.

IMG-20190212-WA0009

हा सिनेमा नाशिकच्या एका एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या कथेवर आधारित आहे. दिग्दर्शक अलोक श्रीवास्तवने एन्काऊंटर हा विषय एका अनोख्या पद्धतीने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा चित्रपट केवळ एन्काऊंटरवच आधारित नाही यामध्ये प्रेम, पार्टनरशिप, लिव्ह इन रिलेशनशिप या विषयांवरही भाष्य करण्यात आलं आहे. गोल्ड कॉईन एन्टरटेनमेंटच्या साहाय्याने ए. जे. डिजिटलच्या या सिनेमात भरपूर ऍक्शन आणि ड्रामा ही आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण मुख्यतः नाशिकमध्ये करण्यात आलं आहे.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

‘या’ चित्रपटामध्ये दुनियादारी फेम संजय जाधव साकारणार नकारात्मक भूमिका

सौंदर्या रजनीकांत आणि विशगन वनंगमुदी चेन्नईमध्ये विवाहबद्ध

प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावतोय ‘आम्ही बेफिकर’

अजय- काजोलच्या निसावर पापाराझींचे बारीक लक्ष
         

ADVERTISEMENT
12 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT