ADVERTISEMENT
home / मनोरंजन
प्रेक्षकांसाठी अभिनयाची 'अजूनही बरसात आहे' मुक्ता आणि उमेश एकत्र

प्रेक्षकांसाठी अभिनयाची ‘अजूनही बरसात आहे’ मुक्ता आणि उमेश एकत्र

प्रेक्षकांसाठी विशेषतः गृहिणींसाठी मालिकाप्रेम हे काही नवे नाही. पण त्यातही अभिनय आणि चांगला विषय अशी जुगलबंदी असेल तर मालिका सुरू होण्याआधीपासूनच हवा होते. नुकताच सोनी मराठी वाहिनीने  प्रेक्षकांसाठी एक नवा प्रोमो प्रसारित केला आहे. सोनी मराठी नवनवीन मालिकांची मेजवानी सातत्यानी घेऊन येत असते आणि त्यात आता ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या मालिकेची भर पडली आहे. यामध्ये चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या मालिकेत मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानीही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे ही जोडी एकत्र कमालच करेल असा विश्वास सोशल मीडियावरून आलेल्या कमेंट्सवरूनही कळून येत आहे. 

10 जणांच्या उपस्थितीत अभिनेता अंकित गेराने उरकले गुपचूप लग्न

मुक्ता आणि उमेश या जोडीला पाहूनच प्रेक्षक आनंदी

चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आजपर्यंत आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा  पाहायला मिळणार आहे. ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आताही मालिकेतून ही जोडी येत असल्याने प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशाही आहे. मालिकेतून वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवायला आलेले मीरा आणि आदी आधीपासूनच एकमेकांना ओळखत आहेत आणि आता पुढे काय गमतीजमती घडणार आहेत हे पाहण्याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता आहे. तसंच ही जोडी नक्कीच कमाल करणार असाही आता चाहत्यांना सूर दिसून येत आहे. 

पहिल्यांदाच एकत्र काम करणार सारा अली खान आणि अमृता सिंह, फोटो झाले व्हायरल

ADVERTISEMENT

मुक्ता आणि उमेश दोघांचाही सहज अभिनय

मुक्ता आणि उमेश हे दोन्ही कलाकार म्हणून अप्रतिम आहेत. दोघेही अत्यंत सहज अभिनय करतात आणि म्हणूनच हा प्रोमो प्रसारित झाल्यापासून या मालिकेबद्दल चर्चा चालू आहे. मराठीमध्ये अत्यंत कमी मालिका आहेत ज्यांच्याबद्दल बोलले जाते. एक प्रेक्षक म्हणून प्रत्येकालाच या मालिकेचा विषय आणि या दोघांना बघून आनंद झाल्याचे सध्या सोशल मीडियावरील कमेंट्स वाचून लक्षात येत आहे. मुक्ता आणि उमेश हे दोघेही जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा अत्यंत रोखठोक अभिनय आणि सहज प्रेक्षकांना जिंकून घेतात. त्यामुळेच ही मालिका बघायला हवी असा सूर अनेक प्रेक्षकांनी आळवायला सुरूवात केली आहे. म्हणूनच या प्रोमोतील जोडीनेच अर्धी लढाई जिंकली आहे असं सध्या चित्र निर्माण झालं आहे. मुक्ता आणि उमेश या दोघांनाही आतापर्यंत निवडलेले काम हे अत्यंत चोखंदळपणे निवडले आहे आणि म्हणूनच ही मालिकाही अप्रतिम असेल अशी आशा आता त्यांच्या चाहत्यांना आहे. 

‘राधे’ चित्रपटाच्या कमाईपेक्षाही चर्चेत आहे हा पॅरडी व्हिडिओ

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT