सोशल मीडियावर मीम्स फक्त तुम्हीच करु शकता असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फारच चुकीचे आहात. कारण आताच्या या कोरोना काळात मुंबई पोलीसही अफलातून मीम्स करु लागले आहेत. लोकांनी घरात राहावे आणि सहकार्य करावे हे सांगून कळत नसल्यामुळेच त्यांना अशा नव्या पद्धतीचा आधार घ्यावा लागत आहे. आता तुम्हीही या काळात कोरोनावर मीम्स केले असतील तर आधी पोलिसांनी केलेले मीम्स पाहा म्हणजे तुम्हाला वर्दीत लपलेला कलाकार देखील समजून येईल. पाहुयात मुंबई पोलिसांनी तयार केलेले हे अफलातून मीम्स
शाहरूख खानने मेडिकल स्टाफच्या सुरक्षेसाठी 25 हजार पीपीई किट्सची केली मदत
कोरोनावर मीम्सचा उतारा
This class (well, almost all of them) was prompt to learn its lesson from @iamsrk 's encounter with Professor Rasai! #MaskHaiNa https://t.co/HpHoOHnYZB pic.twitter.com/FarmS6CyIK
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 12, 2020
.@iamsrk wouldn’t need to do such stunts any longer – Mask Hai Na! pic.twitter.com/8lHfCtJgye
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 12, 2020
घरी राहून अनेकांना कंटाळा आला आहे. घराबाहेर पडू नका या सूचना देऊनही अनेकजण घराबाहेर पडतात. अशांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे मीम्स बनवले आहेत. विशेष म्हणजे बॉलीवूडचाच आधार घेत म्हणजे डायलॉग आणि व्हिडिओचा आधार घेत हे मीम्स तयार करण्यात आले आहेत. जर तुम्हाला ‘मै हूँ ना’ हा चित्रपट आठवत असेल तर या चित्रपटातील एक प्रोफेसर जे बोलतानाही थुंकत असतात. म्हणजे अभिनेते सतीश शहा.. यांचा सीन मुंबई पोलिसांनी लोकांना कोरोनापासून सावधान राहण्यासाठी वापरला आहे. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही असा संकेत यातून देण्यात आला आहे.
आलियाच्या घरचे संपले सामान, सोनी राजदानने मांडली मुख्यमंत्र्यापुढे व्यथा
ओ स्त्री कल आना
The only mantra we need to keep #EverySTREEtSafe is not to venture out on the STREEts #TakingOnCorona #coronavirus #CoronavirusOutbreakindia #COVIDー19 pic.twitter.com/1JpYXXUk9Y
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 9, 2020
श्रद्धा कपूरचा चित्रपटही सगळ्यांना माहीत आहे. ‘ओ स्त्री कल आना’ या पोस्टरचा उपयोग करुन पोलिसांनी एक नवं मीम्स तयार केले आहे. ‘कोरोना कभी मत आना’ असे पोस्टर्स त्यांनी सध्या सगळीकडे शेअर केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या मीम्सची चर्चा आहे. श्रद्धा कपूरने सुद्धा या मीमला प्रतिसाद दिला आहे.
साराभाई का जलवा
रोशश साराभाई हे पात्र अनेकांच्या आवडीचे आहे. त्याच्या कविता तुम्ही मालिकेच्या माध्यमातून ऐकल्या असतील. पण मुंबई पोलिसांनी त्याच्या या मजेशीर कविताही वापरल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा साराभाई vs साराभाईच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. स्वत: रोशेजने देखील त्याच्या चाहत्यांसाठी काही चारोळ्या शेअर केल्या आहेत. ज्याला या आधीही पसंती मिळाली आहे.
हम पांच’ मालिकेमुळे वयाच्या सतराव्या वर्षी एकता कपूर झाली डेलीसोप क्वीन
For all Rosesh poetry fans.. here is the video version of all poems.. courtsey @MumbaiPolice .
Chahe jao Paris ya phir Rome
U will be safe if you stay at home
Whoooopieeee!! @CPMumbaiPolice @sumrag @TheRupali @JDMajethia @sats45 @Deven_Bhojani @aatish304 pic.twitter.com/lyauFFiExx— Rajesh Kumar (@Rajesh_rosesh) April 14, 2020
पोलीस झाले आहेत कवी
आता मीम्सच नाही. तर देशभरात जिथे शक्य आहे तिथे घरी राहिलेल्या नागरीकांना इंटरटेन करण्याचे काम पोलीस करत आहेत. काही ठिकाणी उगाचच घराबाहेर पडणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलीस कोरोना हेल्मेट घालून त्यांना समजावून सांगत आहे. तर काही ठिकाणी गाण्याच्या माध्यमातून सांगत आहे. एकूणच काय तुम्ही घराबाहेर पडू नका हे सांगण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
पण एक म्हणायला हवे पोलिसांमध्ये दडलेला कलाकार आता या कोरोनाच्या निमित्ताने बाहेर पडू लागला आहे.