मुंबई पोलीस हे कामात जितके तत्पर आहेत तितकेच त्यांचे ट्विट हँडल करणारी माणसंही तत्पर आणि मजेशीर आहेत. नेहमीच वेगवेगळ्या ट्विटना रिप्लाय देऊन अथवा ट्विट करून मुंबई पोलीस लक्ष वेधून घेत असतात. कोरोनाचा संकट सुरू झाल्यापासून पोलीस अतिशय दक्ष आहेत आणि लोकांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठीही तत्पर आहेत. अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. त्यामुळे गरजेशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन करत मास्क घालण्याचं आवाहनही पोलीस सतत करत आहेत. अशा स्वरूपाचं आवाहन करताना पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून भन्नाट कल्पना वापरण्यात आलेल्या दिसून येत आहेत. अनेकदा चित्रपटांमधील प्रसिद्ध संवाद, आवडत्या मालिकेतील कलाकार आणि त्यांचे संवाद अथवा त्यांच्याबद्दलच्या गोष्टी मीम्स स्वरूपात पोलीस ट्विटरच्या माध्यमातून लोकांसमोर पोहचवत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पोलिसांच्या या ट्विटर हँडलचे फॉलोअर्सही वाढत जात आहेत. यावेळी पोलिसांनी चक्क ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतील बबड्याची दखल घेतली आहे.
एक महिन्यातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने केले ब्रेकअप, कारण जाणून वाटेल आश्चर्य
कथानकात 'ट्विस्ट' आहे!
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) August 20, 2020
बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे.#UseAMask#FollowUnlockGuidelines pic.twitter.com/vNB2VIkWX8
सध्या ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतील बबड्या हे पात्र खूपच गाजत आहे. नकारात्मक भूमिका असणारा बबड्या आता सकारात्मक होताना दाखविण्यात येत आहे. अभिनेता आशुतोष पत्की ही भूमिका साकारत असून ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली आहे. बबड्याच्या वागण्यावरून अनेक मीम्स व्हायरल होतानाही दिसत आहेत. याचीच दखल घेत मुंबई पोलिसांनीही कोरोनाची जागृती करण्यासाठी मीम्सचा वापर केला आहे. मुंबई पोलिसांनी बबड्याचे हे मीम्स वापरून ‘कथानकात 'ट्विस्ट' आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे.’ असे म्हणत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पोलिसांनी मात्र बबड्याला आता एक जबाबदार नागरीक ठरवलं असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे इतरांनीही अशाच पद्धतीने जबाबदार नागरीक म्हणून मास्कचा वापर करूनच घराबाहेर पडावं आणि सुरक्षित राहावं असं आवाहन या ट्विटद्वारे करण्यात आलं आहे. पोलिसांचं हे जबरदस्त ट्विट अनेकांना आवडलं असून हजारोंच्या वर याचे रिट्विटही करण्यात आले आहेत. ही भन्नाट कल्पना सध्या व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर पोलिसांच्या ट्विटर हँडलचेही नेहमी यासाठी कौतुक करण्यात येते.
सुशांत सिंहच नाही तर या बॉलिवूड कलाकारांच्या मृत्यूचाही नाही उलगडला पेच
आशुतोष पत्की हा संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून त्याने ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले होते. मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘बबड्या’या पात्राने. चित्रपटांमध्येही आशुतोषने काम केले मात्र त्याला मनोरंजन क्षेत्रात या भूमिकेने एक पक्के स्थान मिळवून दिले आहे. आशुतोष पत्कीने ही भूमिका जगवली आहे. त्याला या भूमिकेतून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद तर लाभलाच पण त्याला स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण करता आली आणि प्रसिद्धीही मिळाली. बबड्याचा स्वभाव आणि त्याच्या भूमिकेचा प्रेक्षकांना येणारा रागच त्याच्या कामाची योग्य पोचपावती असल्याचेही त्याने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते. आता बबड्या खरंच चांगला झाला आहे की नाटक करत आहे हे मालिका पाहूनच प्रेक्षकांना ठरवावे लागेल. मात्र आता या गोष्टीवरही अनेक ठिकाणी चर्चा रंगू लागल्या आहेत हे नक्की.
हेमा मालिनी आणि इशा देओल यंदा असं करणार बाप्पाचं स्वागत
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा