Casting couch: लग्नाचे आमिष देत अभिनेत्रीवर दोन वर्ष अन्याय, पोलिसात घेतली धाव

Casting couch: लग्नाचे आमिष देत अभिनेत्रीवर दोन वर्ष अन्याय, पोलिसात घेतली धाव

बॉलिवूडमध्ये  Casting Couch संदर्भात अनेक बातम्या सतत येत असतात.काहीच दिवसांपूर्वी मालवी मल्होत्राने आपल्यावर झालेला सगळा प्रकार जगासमोर नावासहीत समोर आणला होता. तर आता आणखी एका अभिनेत्रीने आपली आपबिती सांगत एका कास्टिंग काऊट डिरेक्टर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे आणि कामाचे आमिष देत या कास्टिंग डिरेक्टरने तिच्यासोबत दुष्कर्म केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. नेमके हे प्रकरण काय? जाणून घेऊया विस्तृतपणे

या कास्टिंग डिरेक्टर विरोधात तक्रार

पीडितेने कास्टिंग डिरेक्टर आयुष तिवारीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीनुसार तिने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 16  तारखेला पीडित अभिनेत्री पोलीस स्टेशनमध्ये आली होती. पण त्यावेळी तिची तक्रार नोंदवण्या आली नाही. याची अधिक तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आयुष तिवारी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अंधेरीच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,   आयुष तिवारी याला अद्याप अटक करण्यात आली नसली तरी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये आयुष तिवारीच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. 

रोहमन शॉलने अशा प्रकारे व्यक्त केलं प्रेम, काढला सुश्मिताच्या नावाचा टॅटू

जुलैमध्ये होती प्रेग्नंट

पीडित अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार आयुष तिवारीने त्याला जबरदस्ती रिलेशनशीपमध्ये राहण्याचा हट्ट केला होता. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले होते. पीडितेला तो कायम चित्रपटामंध्ये काम मिळवून देईल असे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे सलग दोन महिने तो तिच्यावर बलात्कार करत राहिला. जुलै 2020 मध्ये या अभिनेत्रीला दिवस गेल्याचे कळले.  त्यानंतर तिने लगेचच आयुष तिवारीशी संपर्क साधला. पण यासाठी मी जबाबदार नसल्याचे सांगत त्याने ही जबाबदारी फेटाळून लावली. पीडितेने तरीसुद्धा आपला हट्ट सोडला नाही. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर ज्यावेळी ऑक्टोबर महिन्यात ती त्याला लग्नाबाबत भेटण्यासाठी गेली. त्यावेळी मात्र त्याने लग्नाला विरोध करत त्याच्या मित्रासमोरच हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा अपमान केला. शिवाय पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यास तुझा व्हिडिओ वायरल करु अशी धमकी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या संदर्भातील अधिक तपास करत असून या संदर्भात कोणतेही दोष सिद्ध झालेले नाही.

वाढदिवसाच्या दिवशी अनुराग कश्यप होत आहे ट्रोल, ड्रग्जचाही होतोय उल्लेख

या पूर्वीही बड्या असामींवर आरोप

MeToo प्रकरण सुरु झाल्यापासून बॉलिवूडमधील बड्या असामींची नाव पुढे आलेली आहेत. हल्लीच अनुराग कश्यपवरही गंभीर आरोप लागले होते. काम देण्याच्या बहाण्याने तरुणीवर अतिप्रसंग केल्याचा आरोप त्याच्यावर लागला होता. अनुराग कश्यपच नाही तर साजिद खान यांच्यावरही आरोप लागले आहेत. तरुण अभिनेत्रींना घरात ऑडिशनच्या नावाने घरी बोलावून त्यांच्यासमोर नग्न होत त्यांना नको त्या गोष्टीसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप या लोकांवर लागला आहे. आता या प्रकरणात आणखी एका कास्टिंग डिरेक्टरची भर पडल्यामुळे यामागे आणखी कोण नाही? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत 


आता या पीडित अभिनेत्रीला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. 

सई लोकुर अडकली विवाहबंधनात, सोहळ्याचे अप्रतिम फोटो