मनोरंजनाची खुमासदार फोडणी म्हणजे 'बायकोला हवं तरी काय?'

मनोरंजनाची खुमासदार फोडणी म्हणजे 'बायकोला हवं तरी काय?'

घरी राहून आणि काम करुन थोडं बोअरं झाला आहात का? हलकं- फुलकं मनोरंजन करणाऱ्या अशा सीरिजच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक धमाल वेब सीरिज भेटीला आली आहे. आयुष्यात अपेक्षा या कायम वाढत असतात. त्यांचे ओझे काही कमी होत नाही. त्यात प्रत्येक स्त्रीच्या नवऱ्याकडून तर फारच अपेक्षा असतात. म्हणूनच कधी कधी समस्त नवऱ्यांनाही प्रश्न पडत असावा की, बायकोला हवं तरी काय?, अशीच आहे ही नवी मराठी वेबसीरिज. पहिल्यांदाच श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी एका वेबसीरिजमध्ये एकत्र दिसणार आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ही सीरिज नेमकी आहे तरी काय जाणून घेऊया.

Bigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडला शो,फॅन्सनी व्यक्त केली नाराजी

म्हणून आहे ही मालिका धम्माल कॉमेडी

‘मला जरा हे अजून मिळालं असतं तर आनंद झाला असता’ हे वाक्य अनेकांच्या ओठी नाही तर मनात असतंच. अशी जास्तीची अपेक्षा करणे चुकीचे नाही. पण कधी कधी या जास्तीच्या अपेक्षा पूर्ण होत गेल्या तर मात्र काही तरी धमाल उडू शकते. हो ना!,  ‘बायकोला हवं तरी काय?’ मध्ये सर्वसामान्य गृहिणीची भूमिका बजावणाऱ्या श्रेया बुगडेला तिच्या नवऱ्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. आपल्या पतीमध्ये हे सारे गुण का नाही? असे तिला सतत वाटत असते. अत्यंत अध्यात्मिक विचारांची ही गृहिणी कृष्णाची भक्त असते. देवाला प्रसन्न करत ती आपल्या पतीमध्ये अपग्रेड करणाऱ्या एक एक अपेक्षा सांगत राहते. श्रीकृष्ण ( निखिल रत्नपारखी) तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत राहतो. आणि तिच्या नवऱ्यामध्ये तिला अपेक्षित असलेले बदल करत राहतो. नवऱ्याचे अपग्रेड होताना त्यात होणारे बदल हे तिच्या पत्नीला अपेक्षित असले तरी देखील हे बदल होताना नक्कीच हास्याचा फवारा उडतो. आणि मनाशी प्रश्न पडतो की, असं खरंच झालं त… प्रत्येक वेळी देव पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करत जातो. पण शेवटी तिच्या उंचत जाणाऱ्या अपेक्षा आणि होत जाणाऱ्या बदलांना देवही कंटाळतो आणि त्यालाच प्रश्न पडतो की, ‘बायकोला हवं तरी काय?’

 
एमएक्सप्लेअर आणि मिर्ची प्ले ओरिजनल प्रस्तृत ही विनोदी वेबसीरिज असून काहीच दिवसांपूर्वी याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतरच ही सीरिज ही तितकीच धमाल असणार हे कळले होते. 6  भागांची ही सीरिज एकदम धमाल आहे. त्यामुळे जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही मराठी वेबसीरिज पाहायलाच हवी.

कोरोनामुळे झाले अभिनेत्रीचे निधन, देवोलीनाची भावूक पोस्ट व्हायरल

प्रियदर्शनने सांभाळली दिग्दर्शनाची धुरा

Instagram

अभिनेता प्रियदर्शन जाधव या सीरिजचा दिग्दर्शक असून त्याने कॉमेडीची खुमासदार फोडणी या सीरिजला देण्याचा प्रयत्न केला आहे. या सीरिजविषयी तो सांगतो की, आयुष्यात प्रत्येकाला अपग्रेड व्हायचं असतं. नवीन गाडीमध्ये अपग्रेड करावं असं वाटतं. मोठं घर घ्यावं. या गोष्टींचे ठिक आहे. पण ज्यावेळी आपण जोडीदाराला अपग्रेड करण्याची इच्छा व्यक्त करतो? त्याचवेळी यात मनोरंजन होणार हे कळते. या सीरिजमधील कलाकार हे कॉमेडीचे बादशाह असून त्यांचा अभिनय आणि मनोरंजनाचा परफेक्ट टाईमच सीरिजमध्ये प्राण ओततो.

जेलमधून सुटल्यानंतर भारती-हर्ष दिसले आदित्य नारायणच्या लग्नात, व्हिडिओ वायरल

एमएक्स प्लेअरची दमदार निर्मिती

वेबसीरिज ही हल्ली अनेकांच्या जवळची आहे. मोबाईलमध्ये जेव्हा हवे तेव्हा पाहता येणाऱ्या या सीरिज वेगवेगळ्या भाषांमध्ये येतात. मराठी मनोरंजनसृष्टीही यात मागे नाही. आतापर्यंत अनेक दर्जेदार सीरिजची निर्मिती एमएक्स प्लेअरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ‘नजराणा’, ‘पांडू’, ‘इडियट बॉक्स’, ‘आणि काय हवंय’ अशा दर्जेदार वेबसीरिज तयार केल्या आहेत. आता या नव्या वेबसीरिजची त्यात भर पडली असून तुम्हाला हे भाग विनामूल्य पाहता येणार आहेत. 


आता तुम्ही जर मनोरंजन वेबसीरिज पाहण्याचा विचार करत असाल तर ही धमाल सीरिज नक्की पाहा