खुषखबर! 'नागिन' फेम अभिनेत्री अनिता हसनंदांनीने दिला मुलाला जन्म

खुषखबर! 'नागिन' फेम अभिनेत्री अनिता हसनंदांनीने दिला मुलाला जन्म

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री ‘नागिन’ फेम अनिता हसनंदानीच्या (Anita Hassanandani) घरी लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. अनिताचा नवरा रोहित रेड्डीने (Rohit Reddy) आपल्या घरी मुलाचा जन्म झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. यावर्षी अनेक सेलिब्रिटींच्या घरी लहान पाहुण्यांचं आगमन होणार आहे. त्यापैकी अनिता आणि रोहित हीदेखील एक जोडी होती. अनिताने काहीच दिवसांपूर्वी रोहितबरोबर फोटोशूट केले होते. यापैकीच एक फोटो शेअर करत आपण वडील झाल्याच आनंद रोहितने व्यक्त केला आहे. ‘ओह बॉय’ अशी कॅप्शन देत रोहितने ही खुषखबर सांगितली. तर अनिता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. अनिता आणि रोहितच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला असून अनिता आणि रोहितच्या मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

पॉर्न व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली अभिनेत्रीस अटक

बाळासाठी होते दोघेही उत्सुक

अनिताने आपण आई होणार असल्याचेदेखील एका वेगळ्याच अंदाजात मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अनिता  आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत होती. तर या काळात अनिताने आपला गरोदरपणाचा काळ अत्यंत आनंदात घालवलेलाही दिसून येत आहे. नवरा रोहित असो वा तिचे मित्रमैत्रिणी  असोत, अनिताने या सर्वांबरोबर धमाल करत हा पूर्ण काळ घालवला आहे.  इतकंच नाही तर तिने या काळातही काम करत वेगवेगळ्या जाहिरातीही केल्या आहेत. अनिताच्या  चेहऱ्यावरही गरोदरपणाची एक वेगळी चमक दिसून येत होती. त्यामुळे अनिता कधी एकदा आता खुषखबर सांगत आहे याचीच तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती. 

पुढच्या आठवड्यात होणार करिना पुन्हा एकदा आई, दुसऱ्या बाळाचे करणार आगमन

अनिताची फॅशन स्टाईलही होती चर्चेत

गरोदरपणाच्या काळात अनिताने अनेक फोटो शेअर केले.  गरोदरपणातही तिने आपले फॅशन स्टाईल स्टेटमेंट उत्तम ठेवले होते. त्यामुळे तिच्या फॅशनची नेहमीच चर्चा होती. इतकंच नाही तर तिने अगदी शेवटच्या महिन्यात एक फोटोशूटही केले. ज्यामध्ये तिने अभिनेता आणि कवी परितोष त्रिपाठीची कविता कॅप्शनला देत आपण आई होण्याचा अनुभव सांगितला होता. अनिता नेहमीच आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने तिने या नऊ महिन्यात काय काय केले याबाबत सर्व काही आपल्या अकाऊंटवर पोस्ट केले आहे. कुठे बाहेर फिरायला जाणे असो अथवा काही विशिष्ट खायला वाटणे असो अथवा रोहितबरोबर वेगवेगळे मजेशीर व्हिडिओ असोत अनिताने ही प्रत्येक बाब गरोदरपणाच्या काळात एन्जॉय केलेली दिसून येत आहे.  आता बाळाच्या आगमनामुळे दोघेही अतिशय आनंदी असून बाळाला जन्म दिल्यानंतरचाही दोघांचा फोटो व्हायरल होत आहे. 

बागी 4 मध्ये टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत सारा अली खान

टीव्हीवर आहे अनिता प्रसिद्ध

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm

अनिताने टीव्हीवरील काव्यांजली या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिने एजाज खानसह अफेअरही गाजले. पुढे  मोठ्या पडद्यावर तिने काम केले.  इतकंच नाही तर तिने अनेक तेलुगू चित्रपटांमधूनही काम केले आहे. मोठ्या  पडद्यावर तिची जास्त जादू चालू शकली नाही. मात्र अनेक मालिकांमधील तिचे काम प्रेक्षकांना  अधिक भावले. ये हे मोहब्बते, नागिन यामधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतल्या. बाळाच्या आगमनासाठी अनिताने ब्रेक घेतला असून आता अनिता पुन्हा कधी पुनरागमन करणार याकडे  नक्कीच तिच्या चाहत्यांंचे लक्ष लागून राहिले आहे. 

अनिता आणि रोहितला बाळाच्या आगमनासाठी खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक