नच बलिए 10 ची परिक्षक असणार बिपाशा बासू, या दोन सेलिब्रेटीजच्या नावाचीही चर्चा

नच बलिए 10 ची परिक्षक असणार बिपाशा बासू, या दोन सेलिब्रेटीजच्या नावाचीही चर्चा

लॉकडाऊननंतर आता चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन माध्यम पुन्हा नव्याने दमाने सुरू झालं आहे. मनोरंजन विश्वात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आणि शोज यांना प्रंचड मागणी आहे. त्यामुळे अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. लवकरच रॉप रेटिंग डान्सिंग रिअॅलिटी शो नच बलिएचा दहावा सिझनही सुरू होणार आहे. त्यामुळे या शोची थीम काय असणार, कोणकोण सेलिब्रेटी त्यात भाग घेणार आणि यावेळी परिक्षक कोण असणार याबाबत प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मागचा सिझन जबददस्त हिट झाल्यामुळे यावेळी या शोमध्ये नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न वाहिनीकडून नक्कीच केला जाणार आहे. या सिझनचा निर्माता करण जोहर असून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या परिक्षकांची नावे समोर आली आहेत.

Instagram

बिपाशा बासूसह दे दोन सेलिब्रेटी असणार परिक्षक

नच बलिएच्या नव्या सिझनबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिझनमध्ये बॉलीवूडची हॉट आणि सिझलिंग अभिनेत्री बिपाशा बासू परिक्षक असणार आहे. त्यासोबच दिग्दर्शक डेविड धवन आणि कोरिओग्राफर वैभवी मर्चंटही तिच्यासोबत परिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. या तिन्ही परिक्षकांसोबत सुरूवातीची बोलणी सुरू असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या शोसोबतच बिग बॉसचा 13 वा सिझन आणि आयपीएल 2020 सोबतच सुरू होत असल्यामुळे या तीन शोची चांगलीच चर्चा आहे. कदाचित टीआरपी मिळवण्यासाठी हे तिन्ही शो एकाच वेळी प्रदर्शित केले जाण्याची शक्यता आहे. सहाजिकच या शोमधून प्रेक्षकांना आकर्शित करण्यासाठी निरनिराळ्या ट्रिक्स वापरल्या जाणार आहेत. 

नच बलिएचा मागचा सिझन होता सुपरहिट

मागच्या सिझनमध्ये रविना टंडन आणि अहमद खान  या शोचे जज होते. शिवाय हा शो मनिष पॉल आणि वलूशा डिसूझाने होस्ट केला होता. प्रिंस नरूला आणि युविका चौधरी या सिझनचे विनर होते. नववा सिझनचा निर्माता सलमान खान होता. या सिझनमध्ये अनेक वादविवाद निर्माण झाले होते. ज्यामुळे हा सिझन चांगलाच चर्चेत राहिला. आता दहावा सिझन यापेक्षाही सुपरहिट व्हावा अशी निर्मात्यांची इच्छा आहे. 

Instagram

बिपाशा बासूची क्रेझ -

एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक कोण आहे यावरही शोची लोकप्रियता किती असणार हे ठरत असतं. यंदा नच बलिएमध्ये बिपाशा परिक्षक असल्याने तिचे चाहते या शोलाच जास्त पसंती देण्याची शक्यता आहे. बिपाशा 2015 मध्ये 'अलोन' या चित्रपटात शेवटची दिसली होती. 2016 मध्ये बिपाशाने टेलिव्हिजन अभिनेता करणसिंह ग्रोव्हर याच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणं कमी केल्यामुळे चाहते काहिसे नाराज झाले होते. बिपाशाने 2015 साली 'डर सबको लगता है' हा रिअॅलिटी शोदेखील होस्ट केला होता. चाहत्यांसाठी ही एक खुशखबर आहे की बिपाशाने सध्या चित्रपटांपेक्षा वेबसिरिजकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. 'डेंजरस' नावाच्या एका हिंदी वेबसिरिजमध्ये बिपाशा लवकरच दिसणार आहे. आता तिचे नाव नच बलिए 10 च्या परिक्षकासाठी पुढे आल्याने चाहते नक्कीच सुखावले आहेत. कारण त्यांना या वेबसिरिज आणि नच बलिएमधून बिप्सचा हॉट आणि सिझलिंग अवतार पुन्हा पाहायला मिळेल.