नाईकांच्या वाड्याचं रहस्य उलगडतयं, पहिला आठवडा दमदार

नाईकांच्या वाड्याचं रहस्य उलगडतयं, पहिला आठवडा दमदार

नाईकांच्या वाड्याचे रहस्य काय? पोलिसांना पहिल्या सीझनमध्ये नाईकांच्या घराच्या आजूबाजूला काय सापडले? या सगळ्या प्रश्नांचा आता हळूहळू उलगडा व्हायला सुरुवात झाली आहे. पहिल्या भागाचा अचानक गुंडाळलेला गाशा पाहता या मालिकेने सुरुवात तर अगदी दमदार केली आहे. नाईकांच्या वाडयावर रहस्याचे सावट का? याचा अंदाज आल्यामुळे पुढे काय होईल याची उत्सुकता मालिकेने प्रेक्षकांमध्ये निर्माण केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असे म्हणायला हवे.


अण्णांच्या पापाची शिक्षा


पहिल्या भागात अभिरामच्या लग्नाच्या दिवशीच अण्णांचे निधन होते आणि आता या भागात लग्नाच्या दिवसापासून सुरुवात करत भूतकाळात झालेल्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. पैशांचा हव्यास असलेला अण्णा नाईक उन्मत्त दाखवण्यात आला आहे.. गावातल्या इतर महिलांशी त्याचे अनैतिक संबंध आहेत. खुनशी प्रवृत्तीच्या अण्णाला त्याचे वडील नानादेखील थांबवू शकत नाही. इंदू म्हणजेच अण्णाच्या पत्नीला सध्या माधव आणि छाया ही दोन मुले दाखवण्यात आली आहे. गरोदर इंदूचे मुल पडते या मुलाचे नाव त्यांनी दत्ताराम असे ठेवण्याचे ठरवलेले असते. पण मालिकेत दाखवलेला दत्ता कोण ? असा प्रश्न साहजिक उपस्थित राहतो. कारण अण्णांच्या इतर मुलांच्या तुलनेत तो वेगळा दिसतो.  याचाही उलगडा मालिकेत झाला आहे. अण्णांशी अनैतिक संबंध असलेल्या भिवरी या भिल्लीणीपासून झालेला मुलगा इंदू दत्ता म्हणून सांभाळायला घेते. ज्या दिवशी अण्णा भिवरीला घरात घेऊन येतात. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा खून करुन तिला घराच्या मागच्या दाराला पुरतात. त्याच रात्री तिला भिवरीची आत्मा दिसते जी मागे राहिलेले मूल परत दे अशी मागणी अण्णाकडे करते. लोकांचे खून करुन त्यांना पुरण्याची अण्णांची सवयच असल्याचे यातून सिदध होते. म्हणजेच अण्णांच्या घराशेजारील परीसरात मारुन पुरण्यात आलेल्या माणसाचा खच आहे की काय? असा प्रश्न पडतो. त्यामुळे गेल्या सीझनमध्ये अनुत्तरीत राहिलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा या भागामध्ये होत आहे.


ratris-khel-chale 2


 छायाचा अभिनय अफलातून


मालिकेत छोट्या छायाचे काम करणारी मुलगी कोकणाची भाषा तर सुंदर बोलतेच. पण अण्णांसारखा क्रूरपणा तिच्यातही पुरेपूर उतरल्याचा तिचा अभिनय अफलातून वाटतो. मालिकेत तिच्या संवादाची फेक, माधवला  देत असलेला त्रास, खोटे बोलण्याची सवय या सगळ्यामुळे तिच्यावर चटकन राग येतो, अशी मुलगी कोणालाच नको असे वाटायला लागते. त्यामुळे मालिकेतला युएसपी ही छोटी छाया आहे असे म्हणायला हवे.


श्रीदेवीच्या मृत्यूचे केले जात आहे भांडवल?


ratris chaaya


माधव म्हणून म्हणतो ‘हो हो’


माधवला मालिकेत सगळ्या गोष्टीला हो हो म्हणायची सवय असते. ही सवय त्याला केवळ अण्णांमुळे लागते. अण्णांना घाबरुन राहणाऱ्या माधवला त्यांच्या काही गोष्टी पटत नसतात. पण ते नाही म्हणायची हिंमत त्यात नसते. त्यामुळेच  प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्याकडून अण्णा हो हो म्हण असे वदवून घेत असतात. या शिवाय लहानपणीचा पांडूदेखील मालिकेत दाखवण्यात आला आहे. या मालिकेत घेण्यात आलेली पात्र आणि त्यांच्या संवादाची फेक अगदी अचूक असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. 


 नाईकांचा वाडा घाबरायला सज्ज


आता पुढे काय? 


रात्रीस खेळ चाले २ या मालिकेचा पहिलाच आठवडा दमदार राहिला आहे. पहिल्या भागात दाखवलेली शेवंता मालिकेच्या टायटल ट्रॅकमध्येही दिसत आहे.आता शेवंताची मालिकेत एन्ट्री कधी? आणि तिच्या सोबत अण्णाने काय केले? ती कसा सूड घेते? हे मालिकेत दाखवण्यात येईल, असा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याला आणखी थोडावेळ वाट पाहावी लागणार आहे हे मात्र नक्की!


जाणून घ्या श्रेया बुगडेचा फॅशन फंडा


(सौजन्य- Instagram)