फोटो काढण्याआधी मेकअप तरी करायचा,सल्ला देणाऱ्याला नम्रताने दिले उत्तर

फोटो काढण्याआधी मेकअप तरी करायचा,सल्ला देणाऱ्याला नम्रताने दिले उत्तर

सेलिब्रिटींनी नेहमीच  परफेक्ट दिसायला हवे. त्यांना कितीही त्रास होत असला तरी त्यांनी दाखवून द्यायचे नाही हा कोणता नियम आहे? असेच काहीसे घडले आहे नम्रता शिरोडकरसोबत… हो तीच नम्रता शिरोडकर जी एकेकाळी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. तिने तिच्या नवऱ्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि तिला लगेचच ट्रोल करण्यात आले. तू मेकअप का करत नाहीस? डिप्रेशनमध्ये तर नाहीस ना?असा खोचक सवाल एका युजरने नम्रताला केला आहे. त्यावर नम्रतानेही सडेतोड उत्तर दिले आहे.


दीपिकाने घेतली ऋषी आणि नीतू कपूरची भेट


नेमका कधी शेअर केला हा फोटो?


namrata social media1


नम्रता ही दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबूची बायको आहे. लग्नाआधी तिने स्वत:चे फिल्मी करिअर सोडून दिले. ती त्यानंतर कधीही चित्रपटात दिसली नाही. नुकताच महेश बाबूचा ‘महर्षी’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगले यश मिळाले याचे सेलिब्रेशन करण्यासाठीच काही खास लोकांसोबत ही पार्टी करण्यात आली. या शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने अजिबात मेकअप केलेला नाही. तिचा हा लूक नो मेकअप लूक आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. पण एका युजरने तिला  why dont you put make up.are you suffering from fibia or depression. असा प्रश्न खोचक प्रश्न केला. त्यानंतर ती या नो मेकअप लुकसाठी ट्रोलदेखील झाली.


स्टुडंट नाही हा तर होता डान्स ऑफ द इयर... वाचा #soty2 चा रिव्ह्यू


असे दिले सडेतोड उत्तर


namrata social media


नम्रताने या युजरला उत्तर देताना थोडा संयम दाखवला. ती म्हणाली, तुम्हाला मेकअप केलेल्या महिला आवडत असतील तर तुम्ही अशा महिलांना फॉलो करा.पण नेहमीच सुटाबुटात आणि तुम्हाला हव्या तशा मुली मिळणे फारच कठीण आहे. त्यामुळे तू येथून जाणेच बरे आहे. नम्रताने दिलेल्या या सडेतोड उत्तरानंतर तिचे अनेकांनी कौतुक केले आहे. बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य महत्वाचे असे म्हणत अनेकांनी तिचे कौतुकच केले. त्यामुळे एक नवी चळवळ या माध्यमातून उभी राहील असे वाटत आहे. अभिनेत्रींनी नेहमीच सोशल मीडियाचा विचार करुन कपडे घालायला हवे का? त्यांनी नेहमीच चांगले दिसायला हवे का?ती माणसं नाहीत का? त्यांनाही कधीकधी चांगलं दिसण्याचा चारचौघात इतरांसारखे वावरण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे ट्रोलर्सनी या नंतर सावध राहिलेलेच बरे नाही का??


अभिनेत्री रश्मी देसाईचे म्हणून वाढत होते वजन केला खुलासा


करिअरला दिली सोडचिठ्ठी


namrata social media1 %281%29


सौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्य नम्रताने तिच्या करिअरची सुरुवात 1999 सालापासून केली. वास्तव या चित्रपटातील तिच्या रोलमुळे तिला चांगली ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चांगले चित्रपट केले. दिल विल प्यार यार, नायक, कच्चे धागे, मसिहा, इन्साफ, अग्निपंख या सारखे हिंदी आणि साऊथमधील चित्रपटही तिने केले आहेत. 2005 साली तिने साऊथ स्टार महेश बाबूसोबत लग्न केले. आणखी महत्वाची गोष्ट अशी की, ती 1993 साली ती फेमिना मिस इंडिया झाली होती.त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. पण सध्या ती दोन मुलांची आई असून तिने या दोघांकडे लक्ष देण्याला पसंती दिली आहे. त्यामुळेच ती हल्ली तिच्या नो मेकअप लूकमध्येच अनेकदा दिसते.


(फोटो सौैजन्य-Instagram)