मनोरंजन क्षेत्रातील अनेक पुरस्कार सोहळे सध्या सुरु आहेत. विविध चित्रपटांना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने गौरवले जात आहे. त्यातच मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळाही नुकताच पार पडला. विविध भाषांमधील दर्जेदार चित्रपटांना हा पुरस्कार दिला जातो. गेल्यावर्षी कोरोनामुळे एकही चित्रपट रिलीज झाला नाही. पण 2019 साली रिलीज झालेल्या काही दर्जेदार चित्रपटांचा पुरस्कार सोहळा रखडल्यामुळेच 2019 मधील चित्रपटांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यंदाच्या 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये मराठी चित्रपटात ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.
दीपिका पादुकोणच्या 'द्रौपदी'नंतर रणवीर सिंह साकारणार आता सूर्यपुत्र 'कर्ण'
एखाद्या चित्रपटाचे कौतुक हे त्याचे प्रेक्षक करत असतात. पण त्याला पुरस्काराची जोड मिळाली. तर शिरपेचात मयूरपंख खोवले जाते. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ‘आनंदी गोपाळ’ यांची जीवनगाथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडत घराघरापर्यंत आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी पोहोचवले. इतिहासातील अशा महत्वाच्या आणि अभिमान वाटावा अशा घटनेवर हा चित्रपट तयार करण्यात आला. यंदा अनेक पुरस्कार सोहळ्यामध्ये या चित्रपटाने छाप सोडली. शिवाय राष्ट्रीय पुरस्कार ही पटकावला आहे. सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या श्रेणीत या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या शिवाय सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनिंगसाठीही हा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे. वेगवेगळ्या श्रेणीत या चित्रपटाला हे पुरस्कार प्राप्त झाले आहे.
ज्यावेळी महिला शिक्षणाला फारसा वाव नसताना गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिकण्यासाठी तयार करणे. त्यांना डॉक्टर बनवण्यासाठी जीवापाड मेहनत घेणे हे आजच्या पिढीने जाणून घेणे फारच महत्वाचे आहे. त्यांचा दोघांचा तो प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला. पण ते मांडण्याची पद्धत संवाद या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. ललित प्रभाकर याने या चित्रपटात गोपाळरावांची भूमिका साकारली. तर अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिने या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका साकारली. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस याने केले. या चित्रपटातील गाणीही तितकीच उत्कृष्ट होती. जसराज जोशी याने ही गाणी संगीतबद्ध केली जी आजही अनेकांच्या ओठी आहेत.
वेगवेगळ्या भाषांमधील कलाकृतींसाठी हा पुरस्कार दिला जातो. आनंदी गोपाळ वगळता छिछोरे, महर्षी, ताजमहाल, कस्तुरी, जलीकट्टू या चित्रपटांना वेगवेगळ्या श्रेणीत हे पुरस्कार देण्यात आले. कंगना रणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मणिकर्णिका या चित्रपटासाठी देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मनोज वाजपेयी आणि धनुष यांना विभागून देण्यात आला.
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने अनेक पुरस्कारांमध्ये बाजी मारलेली आहे.