सलमान खानसाठी नवज्योत सिंह सिद्धू परतणार कपिल शर्मा शोमध्ये?

सलमान खानसाठी नवज्योत सिंह सिद्धू परतणार कपिल शर्मा शोमध्ये?

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा त्याचा कॉमेडी शो घेऊन परतला आणि त्याच्या चाहत्यांना आनंद झाला. पण परिक्षकाच्या खुर्चीत बसलेले नवज्योत सिंह सिद्धू अचानक शोमधून बाहेर पडले आणि ती जागा अर्चना पूरणसिंहने भरुन काढली, असे असले तरी या शोला नवज्योत यांची सवय लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवज्योत सिंह सिद्धू शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. शोचा निर्माता सलमान खान पुन्हा एकदा त्यांना त्यांची मानाची खूर्ची मिळवून देणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता सलमानच्या सांगण्यावरुन नवज्योत सिंह सिंद्धू शोमध्ये कधी परतणार याची प्रेक्षकही वाट पाहात आहे.


विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर बॉलीवूडमधून कौतुकाचा वर्षाव


kapil salman


का गेले सिद्धू शो बाहेर ?


गेल्या महिन्याभरापासून देशात शांतता नाही. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात भारतीय सैनिक शहीद झाले. ही गांर्भीयाची बाब असताना देखील या हल्ल्यासंदर्भात नवज्योत सिंह सिद्धू यांनी देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर सडकून टीका झाली. त्यामुळेच त्यांना कपिल शर्मा शोच्या परिक्षक पदाची खूर्ची सोडावी लागली. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना झटका बसला होता. पण शोच्या टीमने त्या जागी अर्चना पूरणसिंह यांची निवड केली. त्यामुळे सध्या शोमध्ये अर्चना पूरणसिंह पाहायला मिळत आहे.


sidhu navjyot


आता परतणार नवज्योत


जर तुम्हाला माहीत असेल तर कपिल शर्माच्या या कॉमेडी शोचा सलमान खान निर्माता आहे. ज्यावेळी सिद्धू यांनी देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावेळी बराचवेळ गदारोळ माजला. पण नवज्योत यांना शो मधून काढून टाकण्यासाठी सलमान तयार नव्हता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील अस्थिरता पाहता लोकांच्या भावनांचा मान ठेवून त्याने तो बदल होऊ दिला. पण आता शोला नवज्योत यांची गरज आहे. म्हणून सलमान खान नवज्योत सिंह सिद्धू यांना परत घेऊन येणार आहे. सिद्धू यांच्या विरोधातील वातावरण निवळल्यानंतर त्यांना पुन्हा या शोमध्ये आणले जाणार आहे, असे समजत आहे. शिवाय नवज्योत सिंह आणि चॅनेल यांच्यामधील करारही अद्याप संपलेला नाही. आता सलमानसाठी नवज्योत कधी परतणार याची वाट कपिलसह शोचे चाहतेही पाहात आहेत.


तुम्हाला माहीत आहे का? सलमानमुळे ऐश्वर्याला गमवावे लागले होते ५ चित्रपट


नवज्योत यांच्यावर आधीही टीका


सिद्धू यांच्यावर याआधीही टीकेची झोड उठली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योत सिंह सिद्धू यांनी लावलेली हजेरीही अनेक जणांना पटली नव्हती.त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावेळीही सलमानने निर्माता म्हणून या संदर्भात बोलणे टाळले होते. हाती आलेल्या माहितीनुसार पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सिद्धू यांच्या विधानाने देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे त्यांनी काही काळासाठी शो सोडावा,अशी सलमानची देखील इच्छा होती. पण शोचा TRP नवज्योत यांच्यावरही आहे. म्हणून त्यांनी पुन्हा शोमध्ये यावे यासाठी सलमान आता पुन्हा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता सलमानसाठी आणि शोच्या कॉन्ट्रॅक्टसाठी  नवज्योत लवकरच शोमध्ये परतणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.


पाकिस्तानी वीणा मलिक भारतीयांना म्हणाली, don't mess with us


कपिल मागचे शुक्लकाष्ट संपेना 


सुनील ग्रोवरसोबत झालेल्या भांडणानंतर कपिलच्या शोला उतरती अवकळा लागली. शो बंद पडला. त्यानंतर कपिल आणखी एक शो घेऊन आला खरा,पण तो शोही सुरु झाल्याझाल्या बंद झाला. ्बॅड पॅचमधून बाहेर पडत आता पुन्हा एकदा कपिल शर्माचा शो सलमान खानमुळे सुरु झाला आहे. पण नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विधानामुळे नाहक कपिलचेही टेन्शन वाढले आहे. त्यामुळे कपिलचे शुक्लकाष्ट संपायचे नावच घेत नाहीए.


(सौजन्य-Instagram)