नवाझुद्दीनच्या फॅनसाठी एक खुशखबर आहे. कारण नवाझुद्दीनचा नवा सिनेमा लवकरच फ्लोअरवर येणार आहे. ‘ठाकरे’ या चित्रपटात वेगळी भूमिका साकारल्यानंतर आता पुन्हा एकदा नवाझुद्दीन वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. ‘रात अकेली है’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे शुटींग नुकतेच संपले आहे. नवाझुद्दीनने शुटींग संपल्याची अधिकृत घोषणा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली आहे. शिवाय त्याने या चित्रपटाचा शुटींग अनुभव शेअर केला आहे.
सुश्मिता सेन झाली engaged... शेअर केला फोटो
रात अकेली हा चित्रपट क्राईम थ्रिलर प्रकारातील आहे. त्यामुळे यामध्ये नवाझुद्दीनचा हात कोणीच पकडू शकत नाही. या आधीदेखील नवाझुद्दीनला किलरच्या भूमिकेत आपण पाहिलेले आहे. त्यामुळे या चित्रपटाचा अनुभव शेअर करताना नवाझुद्दीन म्हणाला की, या चित्रपटाचा अनुभव एकदम वेगळा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक हनी थ्रेहान यांच्यासोबत कामाचा अनुभव विलक्षणीय होता. टीमसोबत काम करण्याची प्रक्रिया तर फारच सुंदर होती. एकूणच नवाझुद्दीनला या चित्रपटापासून खूप जास्त अपेक्षा आहे असे म्हणायला हवे.
View this post on Instagram
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास उलगडणार 'हुतात्मा' वेबसीरिज
नवाझुद्दीन सिद्दकीसोबत या चित्रपटात राधिका आपटे आणि श्वेता शर्मा त्रिपाठी आहे. श्वेतासोबत हरामखोर या चित्रपटात नवाझुद्दीनने काम केले आहे. राधिकाने केलेल्या वेबसीरिज आणि चित्रपटातील अभिनयाबाबतीत काय सांगायला नको. त्यामुळे आता हे त्रिकुट एकत्र असणार म्हटल्यावर हा चित्रपट चांगलाच हिट असणार असे म्हणायला हवे. आता हा चित्रपट नेमका काय आणि याची स्टोरी काय असेल? यासाठी ट्रेलरची वाट पाहायला लागणार आहे.
तमाम मराठी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नवाझुद्दीनने ठाकरे या चित्रपटात साकारली त्यामुळे तमाम मराठी जनतेला त्याचा अभिनय आवडला.काही महिन्यांपूर्वी सेक्रेड गेम्स नावाची एक वेबसीरिज येऊन गेली. त्यामध्ये त्याने साकारलेला गणेश गायतोंडे तर आजही अनेकांच्या लक्षात आहे. आजही सोशल मीडियावर या वेबसीरिजमधील मीम्स हिट आहेत. या शिवाय बाबुमोशाय बंदुकबाज, गँग्ज ऑफ वासेपूर, बदलापूर, रमन राघव या चित्रपटात त्याने साकारलेली ग्रे शेड पात्रे खूपच प्रसिद्ध झाली. त्यामुळे नवाझुद्दीनचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे, असेच म्हणायला हवे.
अर्जुन मलायकासोबत नाही करणार नाही लग्न
चित्रपटात राधिका आपटे महत्वाच्या भूमिकेत आहे. राधिकाच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू या आधीही अनेक चित्रपटात पाहायला मिळाले आहे. पॅडमॅनमध्ये तिने साकारलेली गावातील महिला, बदलापूरमध्ये तिने साकारलेली गुन्हेगाराची बायको, याशिवाय तिने घौलसारख्या बेवसीरिजही केल्या आहेत. ज्यामध्ये तिच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे.