NCB च्या रडारवर पुन्हा करण जोहर, हाऊस पार्टीचे मागितले व्हिडिओ

NCB च्या रडारवर पुन्हा करण जोहर, हाऊस पार्टीचे मागितले व्हिडिओ

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपासून सुरु झालेले बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण थांबायचे नाव घेत नाही. अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी करुनही NCB च्या हाती अद्याप काही मोठं लागलेलं दिसत नाही. या आधी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, को-स्टार सारा अली खानपासून ते आता कॉमेडी क्वीन भारती सिंह यांना देखील NCB ने चौकशीसाठी बोलवले. ड्रग्ज पेडलरकडून बॉलीवूडमधील काही बड्या असामींची नाव पुढे आली होती. यामध्ये आणखी एक नाव होते ते म्हणजे करण जोहर… करण जोहरच्या घरी झालेल्या एका हाऊस पार्टीमध्ये ड्रग्जचे सेवन केल्याचा दावा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी केला त्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली. संशयाची सुई करण जोहरवर आधीपासून होती. पण आता NCB ने करण जोहरकडून हाऊस पार्टीचे सगळे फुटेड मागवल्याचे कळत आहे. आता या फुटेजमुळे करण जोहर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ड्रग्ज संदर्भात अभिनेत्रींनी केले हे धक्कादायक खुलासे

ड्रग्ज पार्टीचे आयोजन

करण जोहरच्या घरी गेल्यावर्षी जुलैमध्ये एक पार्टी झाली होती. त्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्याच्या या पार्टीमध्ये बी टाऊनच्या अनेक बड्या सेलिब्रिटी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, शाहीद कपूर,  वरुण धवन असे कलाकार दिसत आहेत.या पार्टीमध्ये मद्य आणि ड्रग्ज या दोघांचे सेवन केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.  हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आणि करणची ही पार्टी ड्रग्ज पार्टी आहे असा आरोप झाल्यानंतर त्याने सप्टेंबर 2020 मध्ये याचा खुलासा केला होता. धर्मा प्रॉडक्शन आणि माझी बदनामी करण्याचा हा कट आहे. या पार्टीमध्ये कोणताही गैर प्रकार सुरु नव्हता असा दावा त्याने देखील केला आहे.  

NCB ने मागितले फुटेज

करण जोहरने त्याची बाजू आधीच मांडली असली तरी NCB ला बहुदा ते पटले नसावे. कारण करण जोहरच्या अडचणी वाढवण्यासाठीच त्याच्या त्या हाऊस पार्टीचे फुटेज त्याच्याकडून मागितले आहेत.त्यामुळे आता या हाऊस पार्टीचे आणि ड्रग्जचे काही कनेक्शन असणार का? आणि असले तर करण जोहरला याचे किती

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोण निशाण्यावर, वायरल झाले चॅट

ड्रग्ज आणि बॉलिवूड

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सगळी चित्रपटसृष्टी हादरुन गेली. ही हत्या की आत्महत्या तपास सुरु असताना या घटनेला ड्रग्जचे अँगल कधी मिळाले कळले नाही.सुशांत ड्रग्जचे सेवन करत होता. त्याच्या आहारी गेला होता. याचा तपास सुरु असतानाच अनेकांच्या चौकशीअंती बॉलिवूडमध्ये अशाप्रकारे ड्रग्जचे सेवन केले जाते हे समोर आले. त्यामुळे अनेक कलाकारांची यामध्ये चौकशी करण्यात आली. NCB च्या रडारवर आता अनेक सेलिब्रिटी असून त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे त्यांचे लक्ष आहे. मध्यंतरी दीपिका पदुकोणचेही ड्रग्ज संदर्भात एक चॅट प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये ड्रग्जची मागणी करताना दीपिका मेसेज करत आहे. हे वायरल मेसेज आणि दीपिकाची चौकशी हे सगळेच त्या काळासाठी चांगलेच गाजले होते. पण आता करण जोहरच्या नावाचा पुन्हा उल्लेख होत असल्यामुळे आता तरी काही खास हाती लागेल का? असा प्रस्न आहे. 


करण जोहरच्या या पार्टीत नेमकं का घडलं ते आता लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.

NCBने समन्स बजावल्यानंतर दीपिका, सारा आणि रकुल प्रीत मुंबईत दाखल