नीना गुप्ताने घेतला कोणाशी पंगा की व्हिडिओ झाला व्हायरल

नीना गुप्ताने घेतला कोणाशी पंगा की व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्री नीना गुप्ता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 60 वर्षीय अभिनेत्रीने हा पंगा घेतल्यामुळे चर्चा तर होणारच ना! नीना गुप्ता यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीना गुप्ता यांनी चक्क पंजाबी डान्सर जेसी गिलसोबत हा पंगा घेतला असून #pangadiaries नावाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्रियांकाच्या व्हेकेशनचे फोटो काढतोय हबी निक

काय आहे हा व्हिडिओ?

निकले करंट या गाण्यावर नीना गुप्ताने चक्क जेसी गिलसोबत काही डान्सस्टेप्स शेअर केल्या आहेत. या वयातही नवीन शिकण्याची त्यांची इच्छा या डान्समधून दिसत आली आहे. म्हणूनच त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या नीना गुप्ता या गाण्याचे बोल तर शिकत आहेतच शिवाय डान्स स्टेप्सही करुन पाहत आहेत.

पाहा व्हिडिओ

नीना गुप्ता या आजही स्टायलिश

Instagram

नीना गुप्ता यांची साठीजरी उलटली असली तरी त्या आजही स्टाईलिश आहे.त्यांचे अनेक इन्स्टाग्राम फोटो आजही त्याची साक्ष आहे. त्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कायम अॅक्टिव्ह असतात. त्यांनी त्यांचे हॉट आणि सीझलिंग असे अनेक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 

या चित्रपटाने दिली नवी ओळख

Instagram

नीना गुप्ता या मध्यंतरीच्या काळात जू  गायबच झाल्या होत्या. त्यांनी एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यांना चांगल्या ऑफर्स येत नसल्याचे म्हटले होते. पण त्यांना एक चांगली संधी बधाई हो या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली. या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ गरोदर महिलेचे काम केले होते. एखादी महिला संसाराच्या अनेक वर्षानंतर जेव्हा गरोदर राहते त्यानंतर तिला समाजाकडून ऐकावे लागणारे टोमणे आणि कुटुंबाने दिलेली साथ असे सगळे काही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील नीना गुप्ता यांचा अभिनय आणि त्यांनी साकारलेली भूमिका वाखाणण्यासारखी होती. त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा एक नवी ओळख या माध्यमातून मिळाली.

अभिनेत्री सयानी गुप्ताने केले बाल्ड... जाणून घ्या कारण

10 वर्ष नव्हतं काम

नीना गुप्ता यांनी आतपर्यंत अनेक मुलाखती दिलेल्या आहेत. त्यांना अनेकदा कामाबद्दल विचारण्यात आले. कायम चित्रपटातून काम केल्यानंतर त्यांना काही चांगले रोल मिळत नव्हते. म्हणून त्यांनी मालिकांमधूनही काम केले. पण ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या निमित्ताने मात्र त्यांना एक वेगळी संधी साधून आल्याचे त्यांनी सांगितले. 

प्राऊड सिंगल मॉम

Instagram

नीना गुप्ता या सिंगल मॉम असून त्यांची मुलगीसुद्धा या क्षेत्राशी निगडीत आहे. तिच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. मसाबा गुप्ता ही त्यांची मुलगी असून ती देखील अभिनय क्षेत्राशी निगडीत आहे. नीना गुप्ता आणि विवियन रिचर्डशी ही मुलगी असून लग्नाआधीच त्यांना ही मुलगी झाली होती. त्यानंतर 2008 साली त्यांनी विवेक मेहरासोबत लग्न केले.

आता दिसणार या दोन चित्रपटात

बधाई हो नंतर आता नीना गुप्ता आणखी नव्या चित्रपटात दिसणार आहे. सूर्यवंशम आणि पंगा या दोन चित्रपटात त्या दिसणार असून या चित्रपटात त्यांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहेत. त्यांच्या पंगा या चित्रपटासाठीच त्यांनी हा पंगा चँलेज घेतला आहे. त्यामुळे आता नीना गुप्ता यांची चित्रपटांची गाडी परत रुळावर आली असे म्हणायला हवे.

या टीव्ही अॅक्ट्रेसच्या घरात आली एक नन्ही परी