लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका, त्याचा परिणाम होतो वाईट - नीना गुप्ता

लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका, त्याचा परिणाम होतो वाईट - नीना गुप्ता

नीना गुप्ता सध्या आपल्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण नीना गुप्ताने आयुष्यात खूपच वाईट दिवसही पाहिले आहेत याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यातील महत्त्वाचे दिवस होते ते तिच्या तरूणपणातले. आता याच दिवसांची आठवण करून देत नीनाने मुलींना लग्न झालेल्या पुरूषांच्या प्रेमात पडू नका, त्याचा परिणाम वाईट होतो असा सल्ला दिला आहे. आपल्या पत्नीपासून असे पुरूष वेगळे होत नाहीत आणि मग फसवणूक झाल्याने असा मुलींना वेगळे व्हावे लागते आणि त्याचा त्रास होतो असे स्पष्ट नीना गुप्ताने सांगितले आहे. 

सलमानच्या प्रेमात पडली ही ब्राझिलियन ब्युटी

नीना गुप्ताने शेअर केला व्हिडिओ

View this post on Instagram

#sachkahoontoe

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

नीना गुप्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती अगदी पोटतिडकीने तरूण वयातील मुलींना आपल्या भावना सांगत असून त्यांनी आयुष्यात कसे वागायला हवे ते सांगत आहे. ‘सच कहूँ तो’ असे कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.  ‘खरं सांगू तर असे काही डायलॉग्ज असतील जे तुम्ही नेहमी ऐकले असतील. त्याने मला सांगितलं की त्याची बायको त्याला आवडत नाही. ते बऱ्याच काळापासून एकमेकांच्या बरोबर नाहीत. हे सर्व ऐकून तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. तो लग्न झालेला पुरूष असतो. तुम्ही विचारता तू वेगळा का होत नाहीस? पण त्यावेळी तो म्हणतो, ‘नाही नाही मुलं आहेत. मी असा विचार नाही करू शकत. बघूया काय होतंय, कदाचित वेगळे होऊसुद्धा.’ हे त्याचं बोलणं ऐकून तुम्हाला पुन्हा एकदा आशा निर्माण होते. तुम्ही मग कधीतरी भेटू लागता. मग तुम्हाला एकत्र फिरायला जायचं असतं. पण त्याच्याकडे घरी सांगायला काही कारण नसतं पण तो खोटं बोलून येतो. मग तुम्हाला त्याच्याबरोबर रात्री पण राहायचं असतं. अशावेळी तुम्ही एखादे हॉटेल अथवा जागा शोधता. मग तुम्हाला त्याच्यासोबतच राहायचं असतं आणि मग शेवटी तुम्हाला त्याच्याबरोबर लग्न करायचं असतं. तुम्ही त्याला त्याच्या बायकोला घटस्फोट देण्यासाठी दबाव आणता. पण त्यावेळी तो उत्तर देतो, ‘मला काही वेळ दे अजून, मी यावर विचार करतोय. हे सोपं नाहीये, प्रॉपर्टी, बँक अकाऊंट्स या सगळ्या गोष्टी आहेत’ मग तुम्हाला अधिक निराशा जाणवायला लागते आणि मग कळत नाही की, आता पुढे काय करायला हवं? कधी कधी वाटतं हे सर्व त्याच्या बायकोला जाऊन सांगावं की तिचा नवरा कसा आहे. पण मग सगळंच गुंतागुंतीचं होऊन जातं. पण मग शेवटी तो म्हणतो जाऊदे मला अधिक गुंतागुंतीचं आयुष्य नाही करायचं. मला काहीच नकोय. मग तुम्ही काय कराल? खरं सांगू का लग्न झालेल्या पुरूषाच्या नादाला लागूच नका. लग्न झालेल्या पुरूषावर कधीच प्रेम करू नका.  मी हे केलं आहे आणि त्याचा वाईट परिणाम मी भोगत आहे. म्हणूनच मी तुम्हाला हे करू नका असं सांगत आहे.’

सिंघम-सिंबा-सूर्यवंशी आले एकत्र, 'सूर्यवंशी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

विवियन रिचर्डबरोबर नीना गुप्ताचे होते नाते

नीना गुप्ताने क्रिकेटर विवियन रिचर्डवर प्रेम केले पण त्यांचे लग्न झाले नाही. मात्र नीनाने तिची मुलगी मसाबाला मात्र जन्म दिला. मसाबाला तिने एकटीने वाढवलं. आपल्याला चूक सुधारायची जर संधी मिळाली तर लग्न झाल्याशिवाय आई होणं टाळलं असतं असं नीनाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं. मुलांना आई आणि वडील दोघांचीही गरज असते. पण मी मसाबाच्या अगदी जवळ होते आणि प्रामाणिक होते त्यामुळे तिच्यावर वाईट परिणाम झाला नाही असंही नीनाने सांगितलंं. नीना गुप्ता सध्या अनेक चित्रपटांमध्ये पुन्हा काम करत आहे. आता ‘83’ या क्रिकेटवरील चित्रपटातही नीना गुप्ताचा स्पेशल अपिरियन्स आहे. पण नीना गुप्तावर आलेली ही वेळ कोणावरही येऊ नये म्हणून तिने हा व्हिडिओ शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे. 

अबब! हेमामालिनीची संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल अवाक...

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.