ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर पत्नी नीतू सिंगने शेअर केली भावनिक पोस्ट

ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर पत्नी नीतू सिंगने शेअर केली भावनिक पोस्ट

एप्रिल महिन्याचा शेवट हा फारच वाईट झाला. बॉलीवूडने दोन चांगल्या अभिनेत्यांना गमावले. लॉकडाऊनच्या काळात अचानक इरफान खानने रुग्णालयात दाखल होणे आणि त्याच्या मृत्यूची बातमी चटका लावणारी होती. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली आणि सगळी इंडस्ट्री हादरुन गेली. कॅन्सरशी दोन हात करत ऋषी कपूर बरे होऊन नुकतेच भारतात आले होते. पण त्यांना पुन्हा त्रास जाणवून लागला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काहीच तासात त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने कपूर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण तरीही नीतू सिंग यांनी एक भावनिक पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले आहेत.

बाहुबलीनंतर एस,एस, राजमौली बनवणार का 'रामायणा'वर चित्रपट

मानले आभार

नीतू कपूर यांनी सोशल मीडियालर ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी आतापर्यंत शेअर केल्या आहेत. नुकताच त्यांनी ऋषी कपूरसंदर्भात एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.  त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणाऱ्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. नीतू कपूर यांनी पोस्ट लिहित सगळ्या डॉक्टरांचे, नर्सेस आणि बॉयचे आभार मानले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ऋषी कपूर यांच्यावर इलाज सुरु आहेत. त्यांच्या इलाजादरम्यान मदत केलेल्यांचे आभार मानणे आज फारच गरजेचे आहे, असे त्यांनी या  पोस्टमध्ये लिहिले आहे. 

कॅन्सरवर सुरु होता इलाज

Instagram

साधारण वर्षभरापूर्वी  ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर  2019 साली  न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान नीतू सिंगही अनेकदा न्यूयॉर्कला गेल्या होत्या. या ट्रिटमेंट दरम्यान त्यांची प्रकृतीही खालावली होती. पण ते लवकरच बरे होतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. कॅन्सरवर इलाज झाल्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतले होते. या आजारादरम्यान त्यांनी चित्रपटातूनही काम केले होते.  

दीपिकाने कच्च्या कैरीचा फोटो केला शेअर, गरोदर असल्याचा चाहत्यांचा अंदाज

लॉकडाऊनमुळे येऊ शकले नाहीत सेलिब्रिटी

मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात त्यांना शेवटी दाखल करण्यात आले होते. 30 एप्रिल रोजी त्यांना मृत घोषित करण्यात आले. लॉकडाऊनमुळे अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये सामील होता आले नाही. त्यामुळे अगदी कमी सेलिब्रिटी त्यांच्या अंतिम यात्रेत उपस्थित होते.  ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा कपूर देखील दिल्लीतून अंतिम यात्रेत येऊ शकली नाही. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या प्रार्थना सभेला हजर राहिली. 

मोठ्या पडद्यावर पुन्हा होणार इरफान खानची भेट

संपली एक लव्ह स्टोरी

View this post on Instagram

🙏

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची लव्ह स्टोरी बॉलीवूडमधील फारच प्रसिद्ध जोडी आहे. त्यांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपटांमधून काम केले आहे. ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर नीतू सिंग यांनी फार चित्रपटात काम केले नाही. त्यांनी चित्रपटाला अलविदा केला. पण त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा दिसली. नीतू सिंग यांनी 2010 साली आलेल्या ‘दो दुनी चार’, ‘बेशरम’, ‘लव आज कल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 


सध्या कपूर कुटुंबीय दु:खात असून त्यांच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत.