नेहा कक्कर नशेमध्ये, जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल

नेहा कक्कर नशेमध्ये, जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल

गायिका नेहा कक्कर बॉलिवूड म्युझिक क्षेत्रातील त्या गायकांपैकी एक आहे, जी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नेहाने आपला बॉयफ्रेंड आणि बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहलीबरोबर झालेल्या ब्रेकअपमुळे सोशल मीडीयावर चर्चेत होती. त्याचवेळी तिचे रियालिटी शो पासून अगदी लाईव्ह शो परफॉर्मन्स करतानाचेही रडण्याचे व्हिडिओ खूपच व्हायरल झाले होते. शिवाय एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारेदेखील नेहाने आपल्या ब्रेकअपमुळे झालेला त्रास चाहत्यांसमोर सांगितला होता. आता पुन्हा एकदा नेहा कक्करचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


नशेतील नेहा पडली जमिनीवर


नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेमध्ये असणारी नेहा कक्कर पुन्हा Neha kakkar- Lily Singh Funny Videoएकदा सोशल मीडियाच्या चर्चेचा विषय झाली आहे. नुकताच नेहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा युट्यूबर लिली सिंहबरोबर नशेमध्ये नाचत असल्याचं दिसत आहे. पण या व्हिडिओमध्ये एक ट्विस्ट आहे. गायिका नेहा कक्कर आणि युट्यूबर लिली सिंह नशेत तर आहे पण दारूच्या नाही तर कोकाकोलाच्या. तुम्हालादेखील बसला ना धक्का? तर या व्हिडिओचा हाच ट्विस्ट होता.हो, हे खरं आहे. नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लिली सिंहबरोबर नेहा कोका कोलाच्या नशेत मजेत डान्स करताना दिसून येत आहे. हा एक अतिशय गंमतीशीर व्हिडिओ आहे. यापूर्वी त्या दोघींनी बीअर घेतली पण त्यांना कोणतीच नशा चढली नाही. नंतर कोकाकोला प्यायल्यावर त्यांना अशी नशा चढली की दोघींनीही जमिनीवर लोळून डान्स करायला सुरुवात केली. तुम्हीदेखील हा गंमतीशीर व्हिडिओ पाहा.हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत नेहाने म्हटलं, ‘तुम्हाला कोणत्याही अल्कोहोलची गरज नाही, जर तुम्ही कोकाकोला पिऊनच नशेमध्ये इतके नाचू शकत असाल.’


दोघींनी मिळून गायलं गाणं


यानंतर दोघींनी गाणं गात खूप धमाल केली. याचा व्हिडिओ युट्यूबर लिली सिंहनेदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लिली सिंह लिप्सिंक करत असून नेहा कक्कर तिला आवाज देत आहे. त्यामुळे दोघींनी केलेली मजा सध्या चाहत्यांनाही मजेशीर वाटत आहे.


नेहाचं काही महिन्यांपूर्वी झालं ब्रेकअप


काही महिन्यांपूर्वीच एका गाण्याच्या शो मध्ये नेहा आणि हिमांशने आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं होतं. पण आता ब्रेकअप नंतर दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावरील साईट्सवरून अनफॉलो केलं आणि एकमेकांबरोबरील फोटोही डिलीट केले आहेत. नेहा सध्या आपल्या आयुष्यात पुढे निघून आली असली तरीही हिमांशने अजूनही ब्रेकअप झाल्यापासून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही आणि कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करून नेहाला दुखावल्याचं दिसलेलं नाही. हिमांशकडून कोणत्याही सोशल मीडियावर अथवा कोणत्याही वृत्तपत्र वा वेबसाईटला मुलाखतही देण्यात आलेली नाही. हिमांशने प्रेम व्यक्त केलं पण ब्रेकअप झाल्यानंतर हिमांशने कधीही कोणतीही भावना व्यक्त केली नाही. पण हिमांश आणि नेहा गेल्या एक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सर्व जगासमोर प्रेम व्यक्त केलं असताना असं केवळ वेळेच्या कारणावरून वेगळे झाल्याचं अजूनही त्यांच्या चाहत्यांना पटत नाहीये हे मात्र नक्की. त्यामुळे अजूनही या दोघांनी एकत्र यावं असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. कारण यापूर्वी असं अनुष्का विराटच्या बाबतीतही झालं होतं पण त्यांनी पुन्हा एकत्र येऊन लग्न केलं.

फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण


नेहा कक्करने केली हिमांशची पाठराखण, म्हणाली विश्वासघातकी नाही


बॉयफ्रेंडमधून बाहेर पडत नेहा कक्करने केली मोठी घोषणा