गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण

गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण

नेहा कक्कर हे नाव कोणाला माहीत नाही असं नाही. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून गायिका नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली यांचं नाव एकत्र घेतलं जात होतं. त्या दोघांनीही आपण नात्यात असल्याचं कबूल केलं होतं. मात्र अचानक चाहत्यांसमोर नेहाने आपलं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता. त्यामुळे नेहा आणि हिमांश यांचं नक्की ब्रेकअप का झालं? या चर्चांना ऊत आला. पण नक्की काय कारण याची कोणालाही माहिती नव्हती. पण आता खुद्द नेहाने याबद्दल स्पष्ट केलं आहे. नेहाने यापूर्वी हिमांशपासून आपण वेगळे झाले असून सध्या डिप्रेशनमध्ये असल्याची पोस्ट केली होती. पण तिच्या चाहत्यांनाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. पण आता नेहाने आपलं हिमांशबरोबर नक्की का ब्रेकअप झालं याबद्दल स्पष्ट केलं आहे.


nehansh


हिमांशवर मी प्रेम करावं ही त्याची पात्रता नाही - नेहा


नेहाने एका मुलाखतीमध्ये आपल्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. हिमांश आपल्या प्रेमाच्या लायक नसून हिमांशवर मी प्रेम करावं ही त्याची पात्रता नाही असं नेहाने सांगितलं. हिमांशला आपण वेळ देत नाही असं त्याला सारखं वाटत होतं. हिमांशमुळे आपण आपल्या कुटुंब आणि मित्रांनादेखील वेळ देऊ शकत नव्हतो असंही नेहाने पुढे सांगितलं. त्यांचा वेळही हिमांशला देऊनसुद्धा त्याला माझ्याबद्दल तक्रार होती. त्यामुळे सततच्या भांडणामुळे त्याच्याबरोबर न राहण्याचा निर्णय घेतल्याचं नेहाने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. आता मला सिंगल राहायचं आहे आणि या निर्णयानंतर जास्त आनंदी असल्याचंही तिने म्हटलं आहे.


neha himnash
नेहा आणि हिमांशने बऱ्याच शो मध्ये केलं होतं प्रेम व्यक्त


काही महिन्यांपूर्वीच एका गाण्याच्या शो मध्ये नेहा आणि हिमांशने आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं होतं. पण आता ब्रेकअप नंतर दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावरील साईट्सवरून अनफॉलो केलं आणि एकमेकांबरोबरील फोटोही डिलीट केले आहेत. नेहा सध्या आपल्या आयुष्यात पुढे निघून आली असली तरीही हिमांशने अजूनही ब्रेकअप झाल्यापासून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही आणि कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करून नेहाला दुखावल्याचं दिसलेलं नाही. हिमांशकडून कोणत्याही सोशल मीडियावर अथवा कोणत्याही वृत्तपत्र वा वेबसाईटला मुलाखतही देण्यात आलेली नाही. हिमांशने प्रेम व्यक्त केलं पण ब्रेकअप झाल्यानंतर हिमांशने कधीही कोणतीही भावना व्यक्त केली नाही. पण हिमांश आणि नेहा गेल्या एक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सर्व जगासमोर प्रेम व्यक्त केलं असताना असं केवळ वेळेच्या कारणावरून वेगळे झाल्याचं अजूनही त्यांच्या चाहत्यांना पटत नाहीये हे मात्र नक्की. त्यामुळे अजूनही या दोघांनी एकत्र यावं असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. कारण यापूर्वी असं अनुष्का विराटच्या बाबतीतही झालं होतं पण त्यांनी पुन्हा एकत्र येऊन लग्न केलं. 


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली - कंगना राणौत


‘डीबाडी डीपांग’ नंतर संदीप-सलील-अवधूतचं ‘हे’ नवं गाणं सोशल मीडियावर घालतंय धुमशान


देवेन भोजानी ‘भाकरवडी’तून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला