या महिन्याच्या शेवटी नेहा कक्कर अडकणार विवाहबंधनात, चर्चांना आलंय उधाण

या महिन्याच्या शेवटी नेहा कक्कर अडकणार विवाहबंधनात, चर्चांना आलंय उधाण

गायिका आणि परीक्षक म्हणून प्रसिद्ध असणारी नेहा कक्कर आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही बरेचदा चर्चेत असते. आपला एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कक्करचे नाव अनेकदा वेगवेगळ्या गायकांबरोबर जोडले गेले. मात्र नेहाने आपण सिंगल असल्याचे सांगितले होते. यामध्ये आदित्य नारायणचेही नाव जोडण्यात आले होते. आदित्य आणि नेहा एकाच कार्यक्रमात नेहमी एकत्र असल्याने आणि आदित्य नेहाबरोबर नेहमीच मजामस्करी करत असल्याने हे नाव जोडण्यात आलं होतं. मात्र आता या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी नेहा कक्कर विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार नेहा कक्कर आणि गायक रोहनप्रीत सिंह हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र याबाबत दोन्हीकडून कोणताही अधिकृत होकार अथवा माहिती मिळालेली नाही. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या चर्चांनी जोर धरला आहे. 

कॅन्सरमुळे घटलं संजय दत्तचं वजन, चाहत्यांना वाटतेय काळजी

लग्न होणार दिल्ली अशी माहिती

View this post on Instagram

Shukar Hai Mere Rabba! ♥️👼🏻🙏🏼😇

A post shared by Rohanpreet Singh (@rohanpreetsingh) on

नेहा आणि रोहनप्रीत यांचे लग्न या महिन्याच्या शेवटी दिल्लीमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसंच सध्या पँडेमिक अर्थात कोरोना कालावधी असल्याने या लग्नाला खूप लोकांची उपस्थिती नसेल असंही सांगण्यात आले आहे. रोहनप्रीतच्या मॅनेजरने मात्र ही चर्चा केवळ रोहनप्रीत  आणि नेहाने एकत्र व्हिडिओ केल्यामुळे होत असल्याचे सांगितले असून रोहनप्रीतचा सध्या तरी लग्नाचा कोणताही विचार नसल्याचे सांगितलं आहे. तसंच या गोष्टी आपल्या कानावर आल्या असून यात तथ्य नाही असंही सांगण्यात आलं आहे. मात्र नेहा आणि रोहनप्रीत यापैकी कोणीही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अथवा नकार दिलेला नाही. 

Bigg Boss 14: च्या या स्पर्धकाविषयी काय म्हणाला पारस छाबडा

कोण आहे रोहनप्रीत सिंग

रोहनप्रीत सिंग हा पंजाबमधील एक उत्कृष्ट गायक असून त्याने 2007 मध्ये सा रे ग म पा चा लिटल चँप म्हणून पहिला रनर अपचा मान मिळविला होता.  तर 2018 मध्ये त्याने आपल्या मधुर आवाजाने ‘रायझिंग स्टार’ या लाईव्ह स्पर्धेतून सर्वांची मनं जिंकून घेतली होती. रोहनप्रीतला खूपच फॅन फॉलोईंग असून शंकर महादेवन यांनीदेखील त्याच्या आवाजाची नेहमीच प्रशंसा केली आहे. इतकंच नाही तर मुझसे शादी करोगेमध्ये शहनाझच्या स्वयंवरमध्येदेखील रोहनप्रीत सहभागी झाला होता आणि इतरांच्या तुलनेत रोहनप्रीतने शहनाझला नक्कीच भारावून सोडले होते. काही दिवसांपूर्वीच रोहनप्रीत आणि नेहा कक्करने ‘डायमंड दा छल्ला’ या गाण्यावर म्युझिक व्हिडिओ तयार केला असून ही त्यांच्या लग्नाची एक हिंट देण्यात आल्याची आता चर्चा होत आहे. दोघांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला होता. तर या गाण्याला खूपच चांगला प्रतिसादही मिळत आहे. इतकंच नाही तर या गाण्यात नेहा हिऱ्याची अंगठी मागत असून रोहनप्रीत तिला ‘लॉकडाऊनच्या काळातच लग्न करूया म्हणजे खर्च वाचेल’ अशा स्वरूपाची गाण्याची ओळ म्हणत अंगठी घालताना दिसत आहे. त्यामुळेच आता या चर्चांनी अधिक जोर धरला आहे. पण जोपर्यंत नेहा आणि रोहनप्रीत याबाबत स्पष्टता देत नाहीत तोपर्यंत नक्की काय खरं आहे ते मात्र कळणार नाही आणि ही चर्चा अशीच होत राहणार हे नक्की!

अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकत आहे आरव, ट्विंकलने शेअर केली ही खास गोष्ट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक