नेहा कक्कर खरंच करतेय लग्न, रोका व्हिडिओ व्हायरल

नेहा कक्कर खरंच करतेय लग्न, रोका व्हिडिओ व्हायरल

नेहा कक्कर खरंच लग्न करतेय या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. तिच्या इन्स्टा अकाऊंटवरील काही फोटोंमुळे आणि व्हिडिओमुळे ते आता सिद्ध झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्करच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या पसरत होत्या. नेहा खरंच लग्न करतेय की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असा प्रश्न अनेकांना पडला असताना तिच्या या नव्या व्हिडिओने सगळ्यांनाच आणखी एक सुखद धक्का दिला आहे. नुकताच तिचा रोका झाला असून आता लग्नाच्या तयारीत सगळे वऱ्हाडी आणि वर-वधू तयारीला लागले आहेत. दरम्यान, नेहा-रोहनप्रीतचा आनंद या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट नाही तर तिने आयुष्यात घेतलेला एक महत्वपूर्ण निर्णय आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक 

कपिल शर्मा शोला नाव ठेवणाऱ्या मुकेश खन्नांना कपिल शर्माचे उत्तर

रोकाचा व्हिडिओ झाला व्हायरल

नेहा कक्करने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोका कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जांभळ्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये दिसत आहे. यासाडीवर तिने फ्लोरल सिंग्लेट ब्लाऊज घातला असून अंगावर एक ओढणी घेतली आहे. तर रोहनप्रीत आबोली रंगाच्या कुडता सेटमध्ये दिसत आहे. रोकाच्या दरम्यान प्रवेश करतानाचा हा व्हिडिओ असून तिने हा व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे सांगताना या दोघांचा येणारा एक म्युझिक व्हिडिओ याचेही प्रमोशन करायला ती विसरली नाही. त्यांच्या प्रेमाची साक्ष देणारा हा व्हिडिओ  म्हणजेच  #nehudavyah हा आज रिलीज होणार आहे आणि आजच त्यांच्या लग्नाचा सोहळा आहे. 

या आधीही एक व्हिडिओ केला शेअर

नेहाच्या लग्नाची बातमी ही खरी असल्याचा आणखी एक व्हिडिओ तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. रोहनप्रीतच्या पालकांना ती भेटायला त्यांच्या घरी गेली होती. त्यावेळी त्यांचा एक कपल व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांना आवडला होता. या व्हिडिओनंतरच खऱ्या अर्थाने ती लग्न करणार या बातमीवर शिक्कामोर्तब झाले होते. या व्हिडिओपूर्वीही तिने दोघांचे फोटो शेअर केले आहे. 

#DDLJ ला 25 वर्षे पूर्ण, लंडनमध्ये उभारला जाणार राज-सिमरनचा पुतळा

लग्नाच्या व्हिडिओची उत्सुकता

Instagram

नेहा कक्करने तिचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता ती लग्नाचा व्हिडिओ कधी शेअर करेल याची उत्सुकता आहे. कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने आणि घरातील लोकांच्या उपस्थितीत रोका सोहळा पार पडला आहे. पण आता तिच्या लग्नासाठी तिने कोणत्या खास व्यक्तिंना बोलावले आहे ते आता तिने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कळेलच. 

अनुराग कश्यपनंतर अभिनेत्रीने इरफान पठाणचे घेतले नाव, जाणून घ्या कारण

नेहा कक्कर आली प्रकाशझोतात.

नेहा कक्कर तिच्या गाण्यांसाठी फारच प्रसिद्ध आहे. इंडियन आय़डॉलमधून ती अधिक प्रकाशझोतात आली. तिची अनेक गाणी बॉलीवूडम्ध्ये हिट आहे. पण या शिवाय तिच्या रिलेशनशीपमुळेही ती चर्चेत राहिली आहे. तिने सोशल मीडियावरुन तिची बाजू मांडत आणि एक गाणंही केले होते. पण रोहनप्रीत सिंहसोबतचे तिचे रिलेशन लग्नापर्यंत कधी गेले हे अनेकांना कळलेच नाही. आधी तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ हे  केवळ तिच्या म्युझिक व्हिडिओसाठी प्रमोशन असल्याचे अनेकांना वाटले होते. 


आता सगळ्या मागील गोष्टी सोडल्या तर नेहाच्या आयुष्यात आनंद आला आहे. त्यामुळे आता तिच्या लग्नाच्या व्हिडिओच्या प्रतिक्षेत सगळे आहे.