Good News : अभिनेत्री नेहा पेंडसेने जाहीर केला तिचा 'Reletionship Status'

Good News : अभिनेत्री नेहा पेंडसेने जाहीर केला तिचा 'Reletionship Status'

‘दिल तो बच्चा है जी’ आणि ‘बिग बॉस 12’ ची स्पर्धक असणारी नेहा पेंडसे नात्यात असल्याचं आपल्या सोशल मीडियावरून सांगितलं आहे. नेहा पेंडसे नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. यापूर्वीदेखील अनेक वेळा नेहाच्या साखरपुड्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्या प्रत्येक वेळी नेहाने हे चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच हे जेव्हा खरं असेल तेव्हा मी स्वत: सांगेन असंही तिने सांगितलं होतं. आता नेहाने आपल्या सोशल मीडियावरून आपल्या होणाऱ्या जोडीदाराचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. 

अभिजीत खांडकेकरने केली होती पोस्ट

View this post on Instagram

Congratulations 🤟🏻 #buddies #sareelove #marathi

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

याआधी अभिनेता अभिजीत खांडकेकरने एक पोस्ट केली होती. त्यावेळी नेहाचा साखरपुडा झाला असं सगळीकडे म्हटलं जात होतं. पण त्यावर नेहाने असं काहीही नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. नेहा आणि अभिजीतचा एक ग्रुप आहे. त्यामध्ये काहीतरी सिक्रेट असल्याचं तिने सांगितलं होतं. जे अशा तऱ्हेने सेलिब्रेट करण्यात आलं होतं. पण नक्की काय होतं याबद्दल त्यावेळीही नेहाने सांगितलं नाही. 

पुन्हा एकदा सनी ठरतेय गुगलवर ‘नंबर 1’

नेहाने चाहत्यांना दिलं सरप्राईज

View this post on Instagram

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहाने आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिलं असून ती लवकरच आता लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळलं आहे. तिने आपल्या जोडीदाराबरोबरचा फोटो पोस्ट करून त्यावर हार्ट इमोजी टाईप केला आहे. दरम्यान आपण अजून साखरपुडा केला नसून गोष्ट पक्की झाल्याचं सांगितलं आहे. त्याने प्रपोज केल्यानंतर आपण होकार दिला असल्याचंही तिने म्हटलं आहे. तसंच आपल्या आयुष्यातील या खास व्यक्तीबद्दल काहीही आता बोलणं हे योग्य नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तपशील शेअर करेन असंही नेहाने सांगितलं आहे. पण आपण त्याच्याबरोबर नात्यात आहोत हे तुम्ही म्हणू शकता असंही तिने स्पष्ट केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहा आणि तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंह बायस हे बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांनी ही गोष्ट खूपच काळ लपवून ठेवली होती. नेहा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असल्याने तिने हे कोणालाही सांगितलं नव्हतं. 

Movie Review : अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी ‘मिशन मंगल’

लग्नाला अजून वेळ

जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात असता तेव्हा तुम्हाला ते नातं नक्कीच लग्नामध्ये बदलायचं असतं हे खरं असलं तरीही अजून लग्न करायला वेळ असल्याचं नेहाने म्हटलं आहे. नेहाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं असून ती सध्या चांगल्या प्रोजेक्टची वाट पाहत आहे. तिला अनेक मालिकांच्या ऑफर्स येत असल्या तरीही तिला आवडेल असं काम तिला मिळालं नसल्याचं तिचं म्हणणं आहे. ती एका चांगल्या प्रोजेक्टची वाट पाहात असल्याचंही तिचं म्हणणं आहे. जे काम करताना मजा येईल अशाच प्रोजेक्टमध्ये काम करायचं असल्याचंही तिने म्हटलं आहे. तसंच लवकरच ती एका एका मराठी चित्रपटातही दिसणार आहे. ज्याच्या चित्रीकरणाला ती लवकरच सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ती पुन्हा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसेल. तिच्या चाहत्यांनाही तिला बघायची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असली तरीही तिचा अभिनय बघण्याचीही चाहत्यांना इच्छा आहे. त्यामुळे आता नव्या प्रोजेक्टसह नेहाच्या लग्नाचीही वाट तिचे चाहते पाहत आहेत हे नक्की.

अभिनेता जय भानुशालीला हवी आहे मुलगी, लवकरच होणार बाबा