Good News: ‘बिग बॉस’फेम मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच अडकणार लग्नबंधनात

Good News: ‘बिग बॉस’फेम मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच अडकणार लग्नबंधनात

नेहा पेंडसे हे नाव मराठी आणि हिंदी पडद्यासाठी नक्कीच नवं नाही. मराठीतील ही बोल्ड अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच आपण नात्यात असल्याचं तिने घोषित केलं होतं. प्रियकर शार्दुल सिंह बयासबरोबर ती लवकरच लग्न करणार आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार असून हे लग्न पुण्यात होणार आहे. एका वेबसाईटला खुद्द नेहाने लग्नाची तारीख जाहीर केली आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच नेहा शार्दुलशी लग्न करणार असून 5 जानेवारी 2020 मध्ये लग्न करणार आहेत. नेहाचा होणारा नवरा हा इंडस्ट्रीतील नसून उद्योगपती आहे. 

पुण्यात करणार लग्न

View this post on Instagram

Maharashtra divsachya shubheccha❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहा पेंडसेने मराठी आणि हिंदी लहान आणि मोठ्या पडद्यावरही आपला एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकताच नेहाने आपला 37 वा वाढदिवस साजरा केला. शार्दुलने तिला तिच्या वाढदिवसाच्या कार भेट दिली. नेहाने काही महिन्यांपूर्वीच आपण शार्दुलबरोबर नात्यात असून सध्या लग्नाचा काही प्लॅन नसल्याचं सांगितलं होतं. पण आता मात्र नेहाने ही गुड न्यूज सर्वांबरोबर शेअर केली आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात नेहा आणि शार्दुल लग्न करत आहेत. हे लग्न पुण्यात होणार असून केवळ घरचे आणि काही जवळचे मित्रमंडळी या लग्नाला उपस्थित असतील असंही नेहाने सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहा आणि तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंह बायस हे बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांनी ही गोष्ट खूपच काळ लपवून ठेवली होती. नेहा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असल्याने तिने हे कोणालाही सांगितलं नव्हतं. 

‘पति,पत्नी और वो'नंतर भूमी दिसणार ऐतिहासिक चित्रपटात

फोटोवरून साखरपुडा झाल्याचा केला चाहत्यांनी अंदाज

नेहाने सोशल मीडियावर शार्दुलबरोबरचे फोटो शेअर केले होते. त्यामधील फोटोमध्ये नेहाच्या हातात अंगठी बघितल्यानंतर तिच्या चाहत्यांनी साखरपुडा झाला असल्याचा अंदाज बांधत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर नेहाने आपण नात्यात असल्याचा खुलासाही केला. नेहा मराठीतच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटातही प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक हिंदी मालिकांमध्येही नेहा झळकली आहे. मराठीपेक्षाही नेहाने हिंदी मालिकांमध्ये अधिक काम केलं आहे. 

नेहा पेंडसेचा झाला का गुपचूप साखरपुडा

नेहा अजूनही करत आहे काम

नेहाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं असून ती सध्या चांगल्या प्रोजेक्टची वाट पाहत आहे. तिला अनेक मालिकांच्या ऑफर्स येत असल्या तरीही तिला आवडेल असं काम तिला मिळालं नसल्याचं तिचं म्हणणं आहे. ती एका चांगल्या प्रोजेक्टची वाट पाहात असल्याचंही तिचं म्हणणं आहे. जे काम करताना मजा येईल अशाच प्रोजेक्टमध्ये काम करायचं असल्याचंही तिने म्हटलं आहे. तसंच लवकरच ती एका एका मराठी चित्रपटातही दिसणार आहे. ज्याच्या चित्रीकरणाला ती लवकरच सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ती पुन्हा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसेल. तिच्या चाहत्यांनाही तिला बघायची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असली तरीही तिचा अभिनय बघण्याचीही चाहत्यांना इच्छा आहे. त्यामुळे आता नव्या प्रोजेक्टसह नेहाच्या लग्नाचीही वाट तिचे चाहते पाहत आहेत हे नक्की.

अभिनेत्री नेहा पेंडसेने जाहीर केला तिचा 'Relationship Status'

अभिजित खांडकेकरनेही केली होती पोस्ट

View this post on Instagram

Congratulations 🤟🏻 #buddies #sareelove #marathi

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

याआधी अभिनेता अभिजीत खांडकेकरने एक पोस्ट केली होती. त्यावेळी नेहाचा साखरपुडा झाला असं सगळीकडे म्हटलं जात होतं. पण त्यावर नेहाने असं काहीही नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. नेहा आणि अभिजीतचा एक ग्रुप आहे. त्यामध्ये काहीतरी सिक्रेट असल्याचं तिने सांगितलं होतं. जे अशा तऱ्हेने सेलिब्रेट करण्यात आलं होतं. पण नक्की काय होतं याबद्दल त्यावेळीही नेहाने सांगितलं नाही. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.