एकमेकांच्या आयुष्यात 'स्पेस' बनवू पाहणारे ‘नेबर्स’

एकमेकांच्या आयुष्यात 'स्पेस' बनवू पाहणारे ‘नेबर्स’

कोई मिल गया, क्रीश आणि पीके यासारखे अंतराळ विश्वातील जीवसृष्टी म्हणजेच एलियन्स आणि त्याभोवती कथा असणारे चित्रपट आपण हिंदीत पाहिले आहेत. पण मराठीत मात्र असा काही चित्रपट आला नव्हता. 'ए कल्पना रोलिंग प्रौडक्शन' निर्मित आणि 'मिठुवाला प्रौडक्शन्स' यांचं सादरीकरण असलेला असा पहिलावहिला चित्रपट ''नेबर्स'' चं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

या चित्रपटाचं इन्स्टाग्रामवर आलेलं टीझर पाहिल्यास तुम्हाला लगेच कल्पना येईल की, हा चित्रपट अंतराळातील जीवसृष्टीशी निगडीत आहे. यातील नेबर्स म्हणजे परग्रहावरून आलेले एलियन्स असं पाहिल्यावर कळतं.

अभिनयामध्ये करिअर करत असलेल्या रोशनच्या आयुष्यात अचानक एक घटना घडते आणि त्याचं आयुष्यच बदलतं. त्याच्या शेजारी राहायला आलेल्या प्रेरणाचे वागणे त्याला अगदी एलियनसारखे वाटत असते. आपल्या बेस्टफ्रेंड अमितला तो याबद्दल सांगतो. मात्र तो त्याला गंभीरपणे घेत नाही. या दरम्यान प्रेरणाचा मित्र असलेल्या डॉ. अंकुरचीही एंट्री होते. ज्याला असतो परग्रहावरील जीवनसृष्टीबाबत रस. प्रेरणा आणि अंकुरची जवळीक वाढू लागते. पण रोशनला मात्र हे सहन होत नाही. पुढे नेमके काय होते आणि ही गूढ कथा कोणते वळण घेते हे पाहण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

View this post on Instagram

📸 by @hemant031988

A post shared by Chetan Chitnis (@chetanchitnis) on

नेबर्समध्ये प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अभिनेता चेतन चिटणीस आणि तर पहिल्यांदाच अभिनेत्री म्हणून झळकणऱ्या कृतिका गायकवाड या दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर याचं पोस्टर शेअर केलं आहे. कृतिका सध्या युवा डान्सिंग क्वीन या रिएलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसते आहे. तर चेतनचेही बरेच प्रोजेक्ट यंदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे.

दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत. तर छायालेखनाची  महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद स्टोरी यांनी स्वरसाज चढविला आहे. पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू सर्वश्री विशाल तालकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.