आता #bottlecapchallenge होतोय व्हायरल, तुम्ही करुन पाहिले का

आता #bottlecapchallenge होतोय व्हायरल, तुम्ही करुन पाहिले का

#Kikichallenge, #lemonchallege, #icebucketchallenge या सगळ्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यानंतर आता सोशल मीडियावर नवे चॅंलेज व्हायरल होत आहे. #bottlecapchallenge असं या चॅलेंजचे नाव असून आता बी टाऊनमधील सेलिब्रिटींनीही हे चँलेंज स्विकारायला सुरुवात केली आहे. अक्षय कुमार, विद्युत जामवाल या अॅक्शन हिरोंनी या संदर्भातील व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

बी टाऊनमध्ये अनेकांनी घेतले चॅलेंज

एखादे चॅलेंज सोशल मीडियावर आले आणि ते सेलिब्रिटींनी घेतले नाही,असे कधीच होत नाही. #bottlecapchallengeचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर सगळ्यांनी लगेचच ते चॅलेंज घ्यायला सुरुवात केली. खिलाडी अक्षय कुमारने हे चॅलेज स्विकारले. त्या पाठोपाठ टायगर श्रॉफ,विद्युत जामवाल, सिद्धार्थ जाधव, अदा शर्मा,सिद्धार्थ मल्होत्रा यांनी हे चॅलेंज स्विकारुन त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. यातील विद्युत जामवाल आणि टायगरने एक लेव्हल वर जाऊन हे चॅलेंज स्विकारले आहे. विद्युत जामवालने तीन बॉटलसोबत हे #bottlecapchallenge पूर्ण केलेले आहे. तर टायगरने डोळ्याला पट्टी बांधून हे चॅलेंज पूर्ण केले आहे. 

पाहा समीरा रेड्डीचे underwater फोटोशूट

पाहा काही खास व्हिडिओ

लाखो लोकांनी घेतले चॅलेंज

आता बाजारात काहीतरी नवीन आले म्हटल्यावर लोक तर नक्कीच करुन पाहणार नाही का? अगदी तसचं या चॅलेंजच्या बाबतीत झाले आहे. तीन दिवसांपासून या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर या संदर्भातील 75 हजाराहून अधिक व्हिडिओ आहेत. या शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जाणून घ्या जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती नेमक्या कशा असतात?

काय आहे #bottlecapchallenge चॅलेंज

आता तुम्हाला जर हे सगळे व्हिडिओ पाहून #bottlecapchallenge हे करण्याचा मोह झाला असेल तर तुम्हाला पाण्याला भरलेली बॉटल घेऊन समोर उभी करायची आहे आणि किक मारुन तुम्हाला या बाटलीचे बूच उघडायचे आहे. एका फटक्यात बाटलीचे बूच गोल गोल फिरुन बाहेर आले तर तुम्ही हे चॅलेजं पूर्ण केले असे समजा 

कोणी केली या चॅलेंजची सुरुवात

या चॅलेंजची सुरुवात 25 जून रोजी झाली आहे. Farakicks नावाने हे चॅलेंज सध्या सुरु असून त्याने सगळ्यात आधी या चॅलेंज संदर्भातील व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये त्याने @jasonstatham @thenotoriousmma @jcvd@jackiechan यांना हे चॅलेंज दिले. @jasonstathamने हे चॅलेंज स्विकारल्यानंतर अक्षय कुमारने त्याचा व्हिडिओ केला.

कार्तिकी गायकवाड आणि दीप्ती भागवत वारीत सहभागी

रोज नव्या चॅलेंजची चलती

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. बाहेर पडून एकत्र काही करायला मिळत नसले म्हणून काय झाले.अशा प्रकारचे चॅलेंज एकमेकांना देऊन अनेक नव्या गोष्टी ट्राय केल्या जात आहे. #kikichallenge ने तर लोकांना वेडच लावले होते. पण या चॅलेंजचा अतिरेक झाल्यानंतर मात्र लोकांना आवरते घेण्यासाठी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. चालत्या ट्रेनमधून उतरत, गाडीतून उतरत या गाण्यावर डान्स करण्याचा मोह अनेकांना आवरत नव्हता. पण अनेक ठिकाणी हे चॅलेंज जिवाशी ेबेतेल अशी परिस्थिती निर्माण झाली.हे चॅलेंज आता सगळीकडून थंड झाल्यानंतर आता या नव्या चॅलेंजने डोकं वर काढलं आहे. आता हा हे नवे चॅलेंज तसे स्टंट आहे म्हणा. पण आता यात काही उद्योग करु नका अशीच अपेक्षा सगळ्यांना आहे. flexibility वाढवणारे असे हे चॅलेंज असून तुम्हालाही ते करुन पाहायचे असेल तर कोणीतरी  असतानाच हे चॅलेंज करा