कसौटी जिंदगी की : प्रेरणाचं हृदय जिंकण्यासाठी आता नवी एंट्री

कसौटी जिंदगी की : प्रेरणाचं हृदय जिंकण्यासाठी आता नवी एंट्री

टीव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) ची कथा दिवसेंदिवस अजूनच रंजक होतेय. एकीकडे कोमोलिका आणि अनुरागची आई प्रेरणाच्या मागे लागल्या आहेत तर दुसरीकडे प्रेरणाही त्यांना तोडीसतोड उत्तर देत आहे. खरंतर या शोमध्ये लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. आता एकता कपूरची सीरियल म्हटल्यावर ट्वीस्ट तर अपेक्षितच आहेत. तसंच प्रेम प्रकरणंही आलीच. चला तर मग जाणून घेऊया आता कोणाची स्पेशल एंट्री होणार आहे ती.   


कसौटी जिंदगी की : प्रेरणा आणि अनुराग एकमेकांना करत आहेत का डेट


शोमध्ये लवकरच नवीन एंट्री


टीव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये होळीच्या सीक्वेंसनंतर एक मजेशीर सीन शूट करण्यात आला होता. ज्यामध्ये भांग घेतल्यामुळे नशेत असलेली प्रेरणा (एरिका फर्नांडिस- Erica Fernandes) कोमोलिका (हिना खान- Hina Khan) ने बनवलेले खोटे पेपर्स साईन करते. ज्यानंतर कोमोलिका तिला घरातून काढण्याच्या पूर्ण तयारीत होती. पण अनुरागचे जीजू अनुपम, त्यांची बहीण शिवानी आणि छोट्या भावाच्या मदतीने प्रेरणा अनुराग (पार्थ समथान- Parth Samthaan) च्या घरावर बनावट आयकर खात्याचा छापा घडवून आणते. ज्यामध्ये हे पेपरही हाती लागतात.  


new-entry-in-tv-serial-kasautii-zindagii-kay-to-ruin-anurag-komolika-3
या कॉमिक आणि इंटरेस्टींग ट्रॅकच्या दरम्यानच हेही कळतंय की, आता शोमध्ये अजून एक नवीन एंट्री होणार आहे.


'कसौटी जिंदगी की' ची 'प्रेरणा' श्वेता तिवारीचं पुन्हा टीव्हीवर कमबॅकआता बदलणार का प्रेरणाचं नशीब


प्रेरणाची कोमोलिकाच्या त्रासातून सुटका करण्यासाठी अनुराग बासूने प्रेरणापासून अगदीच फारकत घेतली आहे. प्रेम आणि लग्नाचं वचन देणारा अनुराग आजकाल प्रेरणाकडे पाहातही नाही.  


new-entry-in-tv-serial-kasautii-zindagii-kay-to-ruin-anurag-komolika-1
आता या सगळ्यातच सीरियलमध्ये एका नव्या व्यक्तीची एंट्री होण्याची चर्चा आहे. एवढंच नाहीतर ही नवी व्यक्ती प्रेरणाच्या हृदयात आणि आयुष्यातही एंट्री घेईल. ही नवी व्यक्ती म्हणजे टीव्ही अॅक्टर नमिक पॉल आहे, जो प्रेरणाचा लव इंटरेस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. सीरियलची आत्तापर्यंतची स्टोरी पाहता तुम्हाला कळलंच असेल की, नमिक आता अनुरागसोबत असलेल्या दुश्मनीमध्ये प्रेरणाची मदत करणार ते. आत्तापर्यंत सीरियलमध्ये याबाबत काही खुलासा झाला नाही. पण नमिक मात्र या सीरियलबाबत फारच खूष आहे.


‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडणनमिकने व्यक्त केला आनंद


टीव्ही अॅक्टर नमिक पॉलने ‘एक दीवाना था’ आणि ‘एक दूजे के वास्ते’ यासारख्या शोजमध्ये काम केलं आहे आणि त्याच्या सीरियल्समधील अभिनयाचं कौतुकही झालं होतं. नमिकने एक स्टेटमेंट जाहीर करून आपल्या या नव्या फेजबाबत माहीती दिली आहे.


new-entry-in-tv-serial-kasautii-zindagii-kay-to-ruin-anurag-komolika
त्याने लिहीलं आहे की, ‘मी कसौटीची टीम जॉइन करणार आहे. मी खूपच खूष आणि उत्साहीत आहे. याबाबत त्याने बालाजी टेलीफिल्म्सचे आभारही मानले आहेत. सीरियलमध्ये कोमोलिकाची भूमिका करणारी हिना खान हीने शोमधून काही काळ ब्रेक घेतला आहे. आता हे बघणं इंटरेस्टींग असेल की, अनुराग आणि प्रेरणाच्या आयुष्यात कोणतं नवं वळण येतं ते.