गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा 'आयपीसी 307 A', सचिन देशपांडे मुख्य भूमिकेत

गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा 'आयपीसी 307 A', सचिन देशपांडे मुख्य भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीत माफिया जगाचा किंवा गुन्हेगारी जगाचा वेध घेणारे फारच थोडे चित्रपट आजवर झालेत. त्यातही अगदीच काही चित्रपटांनी उल्लेखनीय यश मिळवलं. आता "आयपीसी ३०७ ए" या चित्रपटातून माफिया जगाची आणि तरीही भावनिक कथा मांडण्यात आली असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संघर्षयात्रा, शिव्या असे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या साकार राऊत यांनी अर्थ स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून आयपीसी ३०७ ए या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्नील देशमुख यांनी दिग्दर्शन केलं आहे. 'संघर्षयात्रा' आणि 'शिव्या' या चित्रपटांतून साकार राऊत यांनी दिग्दर्शक म्हणून लक्षणीय कामगिरी केली होती. आता निर्माता म्हणून त्यांनी निवडलेला विषय आणि संहिता चित्रपटाच्या रुपात पडद्यावर येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सचिन देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सचिनसोबत अन्यही कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मात्र त्याच्या सह कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
(वाचा : बॉलिवूडचा ऋतिक रोशन ठरला 2019 मधील 'सर्वात सेक्सी आशियाई पुरूष')
चित्रपटाच्या नावामुळे कायद्याच्या अंगानं जाणारा गुन्हेपट असंही आयपीसी ३०७ ए या चित्रपट म्हणता येईल. तसंच चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार या विषयीही उत्सुकता आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही काळात नक्कीच मिळतील.

(वाचा : चर्चा तर होणारच! अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान)

 

हळव्या प्रेमाचा 'रॉमकॉम'

दरम्यान, मराठी चित्रपटांची प्रेक्षकांसाठी चांगलीच मेजवानी आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हळव्या प्रेमाची गोष्ट सांगणारा रॉम कॉम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. नात्याची हळुवार कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक मुलगा आणि मुलगी यांच्यात फुलत जाणारं प्रेमाचं नातं अशी या चित्रपटाची हलकी फुलकी कथा आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 

27 डिसेंबर प्रदर्शित होणार सिनेमा
 
ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्मस् यांनी रॉमकॉम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते, सुशील शर्मा सहनिर्माते आहेत. संदीप बाळकृष्ण बांगर, सुनील दिगंबर वाळुंज फिल्म प्रस्तुत करणार आहेत. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवांजन फिल्म्स हे डिस्ट्रिब्युटर्स आहेत. चित्रपटात विजय गिते आणि मधुरा वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, छाया कदम, अंतरा पाटील, श्वेता नाईक, स्वाती पानसरे, फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे, सिद्धेश्वरा, हरी कोकरे, शाम भालेराव आणि असित रेडीज अशी दमदार स्टारकास्ट आहे. राॅमकाॅम येत्या 27 डिसेंबरला पुन्हां एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेला आहे.

(वाचा : कमालच! 2 वर्षांची चिमुकली गातेय लतादीदींचं गाणं, सोशल मीडियावर धुमाकूळ)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.