आता या नव्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकतील का,तुम्हाला काय वाटतं

आता या नव्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकतील का,तुम्हाला काय वाटतं

संध्याकाळ झाली की, अनेकांच्या घरी मालिकांचे आवाज ऐकू येतात.आता काही महिलांना मालिका पाहायला अजिबातच आवडत नाही. पण काहींना मात्र मालिका टाईमपास म्हणून का असेना पाहायला आवडतात. काही मालिका लोकांना आवडतात मग काय त्या वर्षानुवर्षे सुरु राहतात. तर काही मालिका संपण्याची लोकं अगदी वाटचं पाहत असतात. आज आपण मराठी चॅनेलवरील नव्या मालिकांविषयीच बोलणार आहोत. तुमच्या जुन्या आवडीच्या मालिकांनी निरोप घेऊन त्यांच्या जागी कोणती नवी मालिका येत आहे हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मग करायची सुरुवात

Confirmed : करण पटेलनी सोडली 'ये है मोहब्बतें' सीरियल

कोणत्या मालिकांनी केला अलविदा

instagram

जुलै महिन्यात अनेक मालिकांनी निरोप घेतला आहे.त्याजागी येणाऱ्या मालिका सुरु झाल्या आहेत आणि काही येणार आहेत. टीआरपीमध्ये वर असलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका नुकतीच संपली. त्या आधी ‘लागीर झालं जी’ ही मालिका देखील संपली.या मालिका टीआरपीमध्ये वरच्या स्थानावर होत्या. पण मालिकांनी योग्यवेळी संपणे गरजेचे असते नाहीतर त्या रटाळ होतात. म्हणूनच या मालिका वेळीच थांबवण्यात आल्या.

या मालिकांनी घेतली जागा

‘तुला पाहते रे’ या मालिकेची जागा ‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेने घेतली आहे. ही मालिका सोमवारी सुरु झाली असून एक वेगळी संकल्पना या मालिकेची आहे. विशेष म्हणजे निवेदिता सराफ आणि डॉ, गिरीश ओक या मालिकेत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. तेजश्री प्रधान या मालिकेत प्रमुख भूमिकेत असून सासूचे दुसरे लग्न हे या मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे. या दुसऱ्या लग्नासाठी प्रत्यक्ष सूनबाई मदत घेताना दिसणार आहे. त्यामुळे या मालिकेचा अंदाज थोडा वेगळा असणार आहे. 

तर दुसरीकडे ‘लागीर झालं जी’ ही शितलीची मालिकाही संपली असून त्या जागी मिसेस मुख्यमंत्री ही मालिका आली आहे. या मालिकेचे काही अॅपिसोड झाले असून या मालिकेची फार चर्चा होताना दिसत नाही.

एक नवं प्लॅनेट, एक नवीन योजना... काय असेल अमृता खानविलकरची नेक्स्ट स्टेप

पाहा या मालिकांचे प्रोमोज

या नव्या मालिकाही येणार

इतक्याच नाही तर आणखी दोन मालिकाही फ्लोअरवर येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या म्हणजे ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ आणि ‘भागो मोहन प्यारे’ या दोन्ही मालिका ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 ते10 या वेळांमध्ये लागणार आहे. अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ या मालिकेत तुमची लाडकी शितली म्हणजेच शिवानी बावकर आणि चेतन वडनेरे प्रमुख भूमिकेत असून ते या मालिकेत बंटी बबलीप्रमाणे फ्रॉड करणारी जोडी साकारणार आहे. यात शिवानी बावरकरचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ‘भागो मोहन प्यारे’ ही मालिका देखील सुरु होणार आहे. जागो मोहन प्यारे प्रमाणे ही मालिकाही प्रेक्षकांना खळखळून हसवायला येणार आहे. आधीच्या मालिकेत परी होती. आता त्याच्या आयुष्यात भूत येणार आहे. आता हे भूत त्याच्या आयुष्यात पत्नीच्या रुपात येणार आहे.

नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधेच्या अभावी अभिनेत्यांनी व्यक्त केला संताप


आता या नव्या मालिकांपैकी तुमच्या पसंतीला कोणती मालिका उतरते ते कळलेच.म्हणजे साधारण आठवड्याभरानंतर या मालिका आवडतात की, बोअर होतात. हे कळेल.