ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बापलेकीच्या दृढ नात्याची कहाणी, ‘वेगळी वाट’ सिनेमाची पहिली झलक

बापलेकीच्या दृढ नात्याची कहाणी, ‘वेगळी वाट’ सिनेमाची पहिली झलक

कोणत्याही मुलीच्या आयुष्यात वडिलांचं स्थान अतिशय विशेष आणि अढळ असे असते. अशीच एक वडील-मुलीच्या दृढ नात्याची कहाणी आपल्याला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटांचे आशय-विषय हे नेहमीच प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतात. चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून विशेषतः मराठी चित्रपट बऱ्याचदा मनोरंजनातून समाजप्रबोधनही घडवतात, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इमॅजिनिट प्रॉडक्शन्सने नेमकी हीच बाब हेरत ‘वेगळी वाट’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. जयश्री शाह आणि तुषार शाह प्रस्तुत ‘वेगळी वाट’ या चित्रपटकाचे लेखन-दिग्दर्शन अच्युत नारायण यांनी केले आहे तर अलिकडेच त्यांनी आपल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित केली. 

(वाचा : गिरीश कुलकर्णी-सयाजी शिंदे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार एकत्र)

चौकोनी कुटुंबाचा जीवनप्रवास

अच्युत नारायण आणि आशिष राखुंडे यांनी लिहिलेली ‘वेगळी वाट’ची मनःस्पर्शी पटकथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारलेली आहे. एका सुखी चौकोनी कुटुंबाचा जीवनप्रवास रेखाटणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करेल यात काहीच शंका नाही. या चित्रपटातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात असून ‘वेगळी वाट’च्या पहिल्या-वाहिल्या झलकेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे. या चित्रपटाचे छायांकन शकील खान यांचे आहे तर मंसूर आजमी यांचे संकलन, विजया शंकर, डॉ. दिनेश अर्जुना यांचे संगीत आणि सुनील सिंह यांचे पार्श्वसंगीत असून ‘वेगळी वाट’ हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2020 ला आपल्या भेटीस येणार आहे.

(वाचा : ‘अर्जुन रेड्डी’सोबत काम करण्यास करण जोहर उत्सुक, दिली मोठी ऑफर)

ADVERTISEMENT

हळव्या प्रेमाचा ‘रॉमकॉम’

दरम्यान, मराठी चित्रपटांची प्रेक्षकांसाठी चांगलीच मेजवानी आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हळव्या प्रेमाची गोष्ट सांगणारा रॉम कॉम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. नात्याची हळुवार कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक मुलगा आणि मुलगी यांच्यात फुलत जाणारं प्रेमाचं नातं अशी या चित्रपटाची हलकी फुलकी कथा आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 

(वाचा : रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या ‘सुपरहिरो’च्या भूमिकेत)

27 डिसेंबर प्रदर्शित होणार सिनेमा
 
ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्मस् यांनी रॉमकॉम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते, सुशील शर्मा सहनिर्माते आहेत. संदीप बाळकृष्ण बांगर, सुनील दिगंबर वाळुंज फिल्म प्रस्तुत करणार आहेत. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवांजन फिल्म्स हे डिस्ट्रिब्युटर्स आहेत. चित्रपटात विजय गिते आणि मधुरा वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, छाया कदम, अंतरा पाटील, श्वेता नाईक, स्वाती पानसरे, फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे, सिद्धेश्वरा, हरी कोकरे, शाम भालेराव आणि असित रेडीज अशी दमदार स्टारकास्ट आहे. राॅमकाॅम येत्या 27 डिसेंबरला पुन्हां एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेला आहे.

हे देखील वाचा :

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

23 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT