नेटफ्लिक्सवर 'नया है यह'...आवर्जून पाहावे असे चित्रपट

नेटफ्लिक्सवर 'नया है यह'...आवर्जून पाहावे असे चित्रपट

जर तुमच्याकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिब्शन असेल तर तुमच्यासाठी एक इंट्ररेस्टिंग बातमी आहे. नेटफ्लिक्सवर काही नवे चित्रपट आले आहेत. जे तुम्ही अजिबात miss करायला नको. वेगळ्या आशयाचे आणि वेगळे चेहरे असलेले असे हे चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील. जर तुम्ही काय बघू? या विचारात असाल तर मग तुम्हाला ही यादी नक्कीच मदत करु शकेल.

वरूण धवन नोव्हेंबरमध्ये करणार डेस्टिनेशन वेडिंग

1. गेम ओव्हर (Game over)

imbd

तापसी पन्नू स्टारर असा हा चित्रपट असून जर तुम्हाला मर्डर मिस्ट्री आवडत असतील तर तुम्ही हा आवर्जून पाहायला हवा. कारण या चित्रपटात तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल. 1 तास 37 मिनिटांचा हा चित्रपट असून एका सिरिअल किलरची मर्डर मिस्ट्री आहे. तापसी पन्नूवरसुद्धा याच सिरिअल किलरचा अटॅक होणार आहे. पण ती याचा शिकार होईल की, त्याला मात देईल याची शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारा असा हा चित्रपट आहे.

बिग बींच्या फॅशन स्टेटमेंटमागील मराठमोळा चेहरा

2. सेक्सट्युबलेट्स (Sextuplets)

netflix

आता याच्या नावावरुन तुम्ही लगेचच काही वेगळा अंदाज बांधू नका. याचे कारण असे की, सेक्सट्युबलेट्स या शब्दाचा अर्थ असा की, सहा जुळ्यांपैकी एक.. हो तुम्ही ऐकता ते अगदी खरं आहे. आतापर्यंत तुम्ही जुळी, तिळी असे शब्द ऐकले असतील. आता विचार करा सहा जुळी मुलं… धम्माल तर उडणारच ना... आपल्या हरवलेल्या 6 भावांना शोधण्यासाठी नायक निघतो. तेव्हा नेमकं काय होतं तेच या 1 तास 39 मिनिटांच्या चित्रपटात आहे.

3. टोटा पटाका आयटम माल (Totta pataka item maal)

netflix

दिल्लीच्या वास्तवाशी निगडीत असा हा चित्रपट आहे. आता दिल्ली म्हटलं की, अनेकांना मोठे शहर असून असुरक्षित वाटते. येथील वाढणारा क्राईम रेट पाहताच महिलांना अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी वावरावे लागते. आता आम्ही महिला असून कमी नाही. हे सिद्ध करण्यासाठीच काही मुलींचा ग्रुप चक्क एका पुरुषाला किडनॅप करतात.त्याला किडनॅप करुन त्यांना दिल्लीतील खरं वास्तव दाखवून द्यायचे असते. 1 तास 47 मिनिटांच्या या सगळ्या खेळात नेमकं काय होणार ते पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.

Sacred Games 2 :धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने अनुराग कश्यपविरोधात पोलीस तक्रार

4. ट्रिपल फ्रंटायर (Triple frontier)

Instagram

जर तुम्हाला अॅक्शन बेस चित्रपट आवडत असतील तर तुमच्यासाठी हा एकदम बेस्ट चित्रपट आहे. नेटफ्लिक्सची निर्मिती असलेला हा चित्रपट म्हणजे एक वेगळा विषय आहे. चार माजी सैनिक एकत्र येतात एका वेगळ्याच कारणासाठी. ते एका मोठ्या मिशनवर जाणार आहेत. हे मिशन काय? ते पाहण्यासाठीच हा चित्रपट पाहायला हवा.

5.द रेड सी डायव्हिंग रिसोर्ट (The red sea diving resort)

Instagram

सत्य घटनेवर आधारीत असलेला हा चित्रपट आहे. इथोपियन रेफ्युजीना एका सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी अमेरिकेतील एक टीम कामाला लागते. 1980 च्या दशकातील ही घटना असून ही टीम या ठिकाणी एक जुने रिसोर्ट विकत घेते. या रिसोर्टच्या माध्यमातून ते या रेफ्युजीचचे यशस्वी स्थलांतर करतात. ते हे सगळं कसं करतात. त्यांच्यापुढे काय काय चॅलेंजेस येतात ते पाहण्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहायला हवा. तरच तुम्हाला या चित्रपटाची मजा येईल.

त्यामुळे जर तुम्ही वेगळे काही पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आताच हे चित्रपट पाहा. एखाद्या वीकेंडमध्ये तुम्ही हे सगळे चित्रपट पाहू शकता. तुम्हाला हे चित्रपट कसे वाटले ते नक्की आम्हाला कळवा.