तब्बल 14 वर्षांनी परतणार 'शक्तिमान',अभिनेत्याची ही झाली निवड

तब्बल 14 वर्षांनी परतणार 'शक्तिमान',अभिनेत्याची ही झाली निवड

‘अद्भूत अगम्य साहस की परिभाषा है… ये निकली मानवता की छाया है’… काही आठवतंय का? संध्याकाळी टीव्हीवर हे गाणं लागलं की समजून जायचं ‘शक्तिमान’ सुरु झालं आहे. 90च्या दशकात जन्मलेल्यांना हा सुपरहिरो माहीत नसण्याची शक्यता फारच कमी आहे. आताच्या मुलांसाठी खूप वेगवेगळे सुपरहिरोज असले तरी शक्तिमानची क्रेझ एकेकाळी होती. आता पुन्हा एकदा ‘शक्तिमान’ ही मालिका परतणार आहे. पण नव्या रुपात…अशी चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. तब्बल 14 वर्षांनी ही मालिका येणार असून या मालिकेची सगळी तयारी पूर्ण झाली आहे असे देखील सांगण्यात येत आहे  पण...

धडक' बॉय इशान आणि स्टुंडंट अनन्या दिसणार एकत्र, फोटो केला शेअर

नवी मालिका नवा ‘शक्तिमान’

शक्तिमान या मालिकेमध्ये शक्तिमानची भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती. साधाभोळा आणि गंगाधर पंडीत या दोन भूमिका त्यांनी या मालिकेत केल्या होत्या. पण आता 2019 आहे सुपरहिरो हा थोडा नवा नको का? या मालिकेत शक्तिमानची भूमिका साकारण्यासाठी नव्या हिरोची निवड करण्यात आली असे सांगण्यात येत आहे. साऊथचा अभिनेता मुकेशतानचे काही फोटो शक्तिमान रुपात व्हायरल होत आहे. त्यामुळे हाच नवा शक्तिमान असल्याचे म्हटले जात आहे. ओरु अदार लव या साऊथ चित्रपटाचे दिग्दर्शक ओमार लुलू यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळेच या चर्चांना उधाण आले आहे.

विद्या बालनलादेखील करावा लागलाय ‘कास्टिंग काऊच’चा सामना, सांगितला अनुभव

साऊथमध्ये येणार का मालिका ?

आता साहजिकच साऊथमधल्या प्रोडक्शनचा हा व्हिडिओ आहे म्हटल्यावर साऊथमध्ये ही मालिका येणार असा प्रश्न साहजिकच कोणालाही पडेल. पण हाती आलेल्या माहितीनुसार साऊथमधील एका चित्रपटाच्या सीनसाठी शक्तिमानचे पात्र वापरण्यात आले आहे.म्हणूनच मुकेश यांनी हा कॉश्च्युम घातला आहे. त्यामुळे शक्तिमानही मालिका सध्या तरी येत नाही असे कळत आहे.

लवकरच येऊ शकतो सीझन 2

Instagram

शक्तिमान या मालिकेशी संबंधित सगळे राईटस सध्या मुकेश खन्ना यांच्याकडे आहेत. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शक्तिमानचा सीझन 2 येऊ शकतो असे सांगितले होते. शिवाय शक्तिमान माझ्या सगळ्यात जवळची मालिका होती हे देखील सांगितले. पण अद्याप या मालिकेच्या सीझन 2 ची कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. 

अक्षय कुमारने शेअर केला आईसोबत ‘हा’ भावनिक व्हिडिओ

म्हणून मुकेश यांनी बंद केली मालिका

Instagram

13 सप्टेंबर 1997मध्ये ही मालिका सुरु झाली. शनिवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी ही मालिका लागायची. या मालिकेचा शेवटचा भाग 2005 साली प्रसारीत झाला. ही मालिका बंद होण्याची अनेक कारणे सांगितली जात होती. त्यामध्ये एक कारण असे होते की शक्तिमान उडून जातो. हा प्रयत्न करताना अनेक मुलं जखमी झाली होती.त्यामुळे ही मालिका बंद झाली असे म्हटले जात होते. पण मुकेश खन्नाने मात्र ही मालिका प्रसारीत करण्यासाठी लागणारा पैसा परवडत नसल्याचे सांगितले शिवाय कोणताही प्राईम टाईम मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

आता नक्की ही मालिका येणार आहे का नाही प्रश्न आहे. पण जर ही मालिका आली तर या नव्या मालिकेत शक्तिमान म्हणून कोणाला घेतील हे पाहण्याची उत्सुकता आहे.