छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना, पाहताना सर्वांचा ऊर अभिमानानं भरून येतो, पण त्यांच्या या शौर्य आणि जडघडण यांमागे मोठा वाटा आहे तो त्यांच्या आईचा, जिजाऊ माँसाहेबांचा आणि म्हणूनच त्यांना ‘स्वराज्यजननी जिजामाता’ म्हटलं जातं. कोरोनामुळे गेले तीन महिने सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबले होते. मात्र आता पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेमध्ये आता छोट्या शिबवाचा प्रवेश होणार आहे. छोट्या शिवबाच्या भूमिकेत आर्यन लहामगे हा अभिनेता आता प्रेक्षकांना दिसणार असून येत्या 13 जुलैपासून या नव्या भागांना सुरूवात होणार आहे. प्रेक्षकही सध्या या मालिकेची आतुरतेने वाट पाहात आहेत.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत पुन्हा बदलली शनाया, रसिका येणार का परत
नवीन भागासह छोटे शिवबाही येणार भेटीला
सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. 13 जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वा. मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही गाथा मुलखावेगळ्या आईची गाथा आहे. जिजाऊंनी स्वराज्याचा सिंह, रयतेचा राजा कसा घडवला याची कथा या मालिकेत मांडली आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशीच मालिकेतही शिवजन्म झाला आणि स्वराज्यबांधणीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मालिका आता काही वर्षांचा भाग पुढे नेत असून आता आर्यन रवींद्रनाथ लहामगे हा बालकलाकार छोट्या शिवबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी आर्यनने एक होती राजकन्या आणि सावित्रीजोती या मालिकेत अभिनय केला आहे. शिवबाची भूमिका साकारण्यासाठी आर्यनने घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे मिळालेल्या वेळेत त्यानं बरीच पुस्तकंही वाचून काढली आहेत. या मालिकेतून प्रेक्षकांना जिजाऊंचे संस्कार आणि शिवबांची जडणघडण पाहायला मिळणार आहे!
सुशांतच्या आत्महत्येच्या 20 दिवसांनंतरही ‘या’ अभिनेत्रीला होतोय त्रास
सध्या कोरोनाचे सावट
सध्या कोरोनाचे सावट असले तरीही मालिकेचे चित्रीकरण अगदी व्यवस्थित सुरक्षितता घेऊन करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासूनच या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून आता प्रेक्षकांना लवकरच स्वराज्यजननी जिजामाताचे नवे भाग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहेत. ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षक नेहमीच डोक्यावर उचलून घेत आले आहेत. त्यातही ही मालिकादेखील डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्स अन्वये तयार होत असल्यामुळे प्रेक्षक ही मालिका बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. एका मुलखावेगळ्या आईची गाथा, जिनं स्वराज्याचा सिंह घडवला अशा जिजामातांच्या आयुष्यावर ही मालिका आहे. या मालिकेचं चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी इथं सुरू झालं आहे. सरकारनं आखून दिलेले सर्व नियम पळून या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं. संपूर्ण सेटचं सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. सेटवर मास्क सक्तीचे असून नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आता चित्रीकरण पार पडणार आहे. काही लोक सेटवरच राहून काम करणार असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं ही निर्मात्या संस्थांची जबाबदारी आहे. मुंबईत चित्रीकरण सुरू होणारी ही पहिलीच मालिका आहे. तीन महिन्यांनंतर आपापल्या कामावर रुजू झाल्यामुळे सर्वच मंडळींमध्ये उत्साह आहे. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही ऐतिहासिक मालिका असल्यानं मिळालेल्या वेळेत कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखेसाठी कसून तयार केली आहे. आता नियमांच्या चौकटीत राहून आपलं काम व्यवस्थित करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेचा पूर्ण चमू सज्ज झाला आहे.
या आहेत बॉलीवूडमधील स्टायलिश बहिणी, संपूर्ण जग करतं स्टाईल फॉलो