करणसोबत कॉफी प्यायला येणार आहेत नवे 'स्टुडंट ऑफ द इयर '

करणसोबत कॉफी प्यायला येणार आहेत नवे 'स्टुडंट ऑफ द इयर '

कॉफी विथ करणमध्ये येणारे यंदाचे  पाहुणे खास आहेत. कारण करणच्या हायफंडू शाळेतील नवे विद्यार्थी या नव्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. अनन्या पांडे,तारा सुतारीया आणि टायगर श्रॉफसोबत हा एपिसोड रंगणार आहे. तुम्हाला माहीत असेल तर करण पुन्हा एकदा 'स्टुडंट ऑफ द इयर 2' हा चित्रपट घेऊन येत आहे. या नव्या चित्रपटातील ही स्टारकास्ट आहे. सोशल मीडिया सेन्सेशन राहिलेली अनन्या करण जोहरच्या सिनेमातून डेब्यू करणार आहे. तर दुसरीकडे मॉडेल तारा सुतारीयादेखील मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या एपिसोडसाठी तुम्हाला येत्या रविवारपर्यंत थांबावे लागणार आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

A fresh batch of students on the couch, next week on #KoffeeWithKaran. #KoffeeWithStudents


A post shared by Star World (@starworldindia) on 


 


 


 


सुबोध करणार भार्गवी चिरमुलेसोबत रोमान्स


अनन्याच्या फॅन्समध्ये उत्सुकता


इतरवेळी इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली ही बार्बी डॉल चंकी पांडेची मुलगी आहे हे आता सगळ्यांनाच माहीत आहे. तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत. त्यामुळेच तिच्या नावाने अनेक फॅन पेज देखील आहेत. तिच्या अभिनयाबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यामुळे करणच्या शोमधून तिच्या तिच्यातील अभिनयाच्या गुणांचा देखील अनुभव लवकरच येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तिच्या फॅन्समध्ये करणच्या या अॅपिसोडची उत्सुकता आहे. हीच उत्सुकता अनन्याला देखील आहे कारण अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही बातमी तिच्या फॅन्सपर्यंत पोहोचवली आहे. तिने करणच्या शोमध्ये जाण्याचा आनंदही व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे तारा सुतारीयानेदेखील हा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

श्रीदेवीचे पहिले वर्षश्राद्ध १४ फेब्रुवारीला


चित्रपट होईल का यशस्वी?


स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून आलिया भट, वरुण धवन आणि  सिद्धार्थ मल्होत्रा या तिघांनी डेब्यू केला होता. हा चित्रपट कॉलेजिएन्ससाठी एकदम खास होता. त्यातील गाणीसुद्धा तितकीच प्रसिद्ध होती. पण वास्तविक शाळा आणि कॉलेज विश्वातील कोणतीच गोष्ट यात नव्हती तर नुसता झगमगाट होता. पण या चित्रपटाने तरीही चांगली कमाई केली. आता या सिनेमाचा सिक्वल आणखी दोन नव्या अभिनेत्रींना घेऊन येणार आहे म्हटल्यावर चित्रपटाकडून अपेक्षाही असणारच. टायगर श्रॉफला या आधीदेखील अनेक चित्रपटांतून आपण पाहिले आहे. आता तो या स्टुडंटच्या वेषात कसा दिसणार? याची उत्सुकताही आहे. आता चित्रपट त्याच धर्तीवर आधारीत आहे की आणखी काही नवा ट्विस्ट या चित्रपटात येणार आहे यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.


tara sutaria


कोण आहे तारा सुतारीया?


तारा सुतारीया ही एक मॉडेल असून तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर वायरल झालेले आहेत. तिच्या मॉडेलिंगपेक्षा ती अधिक चर्चेत राहिली ती धडक फेम ईशान खट्टरमुळे. कारण ही दोघे काही काळ रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. पण या चर्चेला लवकरच पूर्ण विराम लागले कारण या दोघांचेही ब्रेकअपही झाले आता तारा ऑनस्क्रिन टायगरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तारा सुतारीया या चित्रपटात नेमका कोणता रोल साकारणार आहे या बद्दल जास्त काही माहीत नाही. पण तिचा पोस्टरवरील अंदाज पाहता कॉलेजमधील हॉट गर्लचे कॅरेक्टर ती साकारणार असा अंदाज येत आहे. तारा आणि अनन्या यांच्यातील मैत्राही नेहमीच त्यांच्या फोटोमध्ये अनेकदा दिसून येते. पुनीत मल्होत्रा स्टुंडंट ऑफ द इयर २ चे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट १० मे रोजी रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.


(फोटो सौजन्य- Instagram)