शेवंताला मिळणार का नाईकांच्या वाड्यात प्रवेश

शेवंताला मिळणार का नाईकांच्या वाड्यात प्रवेश

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या भागाला अल्पावधीतच चांगली प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र दुसऱ्या भागावर प्रेक्षकांचं  जरा जास्तच प्रेम आहे. या लोकप्रियतेचं श्रेय हे मालिकेतील कलाकारांना जातं. या मालिकेतील अण्णा आणि शेवंता ही दोन पात्र दिवसेंदिवस आपलं वेगळेपण या मालिकेतून दाखवत आहेत. ज्यामुळे लवकरच या मालिकेला एक वेगळं वळण मिळणार आहे.

लवकरच येणार या मालिकेचा उत्सुकता वाढवणारा भाग

रात्रीस खेळ चाले भाग दोन ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. कारण या मालिकेतील मुख्य पात्र शेवंता तिचं सामान घेऊन थेट अण्णा नाईकांच्या वाड्यावर तळ ठोकायला आली आहे. माईंसमोर अण्णा आणि शेवंताचं प्रकरण उघड झाल्यावर माई मात्र तिला वाड्यात घ्यायला नकार देतात. शेवंता ही हार मानणाऱ्या लोकांमधली मुळीच नाही. ज्यामुळे ती घराशेजारील पारावर बसून रात्र काढते. ज्यामुळे आता शेवंताचं पुढचं पाऊल काय असेल ? तिला नाईकांच्या वाड्यात प्रवेश मिळेल का ? माईंचा नकार असताना अण्णा तिला वाड्यात घेतील का ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. 

 

दिवसेंदिवस वाढतेय शेंवताची लोकप्रियता

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेला पाहता पाहता प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. आजही शेवंताला पाहण्यासाठी अनेक चाहते अगदी उत्सुक असतात. ज्यामुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच  आहे. खरंतर सोशल मीडियाच्या युगात आजकाल एखादी गोष्ट अगदी काही सेकंदातच लोकांपर्यंत पोचते. हे माध्यम सुलभ असल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया देखील या माध्यमावर लगेचच उमटतात. ज्यामुळे सध्या या मालिकेच्या प्रत्येक नव्या गोष्टीवर मिम्स देखील वायरल होताना दिसत आहेत. अण्णा आणि शेवंता या व्यक्तिरेखांवरदेखील असंख्य मिम्स व्हायरल होत असतात. या मालिका आणि मिम्सबाबत अपूर्वाने आपलं मत शेअर केल आहे. ती म्हणते की, "सुरुवातीला मला खूप हसू यायचं, की मिम्स बनवायला कुणाकडे एवढा वेळ आहे पण आता मला याचा आनंद होतो. असे बरेच ग्रुप्स आहेत ज्यावर डीपी म्हणून शेवंताचा फोटो असतो. एक कलाकार म्हणून मला याचा नक्कीच खूप आनंद होतो. सगळ्या वयोगटांमध्ये आज शेवंता आणि अण्णांची चर्चा आहे. याचं सगळं श्रेय मी आमचे दिग्दर्शक आणि कॅमेरामनला देईन."

 

शेवंताचा सोशल मीडियावरही आहे बोलबोला

काही दिवसांपूर्वी अपूर्वाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये ती चक्क मेकअप रूममध्ये एक गाणं गाताना दिसत होती. वास्तविक हे गाणं तिने तिच्या एका नाटकाच्या मेकअपरूमधून शेअर केलं होता. अपूर्वा ‘इब्लिस’ या नाटकात जुई हे पात्र साकारत आहे.  या नाटकाच्या सेटवर असताना तिने हा व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. या नाटकात तिच्यासोबत वैभव मांगले , राहुल मेहेंदळे, सुनिल देव हे कलाकारदेखील आहेत. मात्र प्रेक्षकांमध्ये अपूर्वाची ओळख शेवंता या नावाने जास्त झालेली आहे. ज्यामुळे चाहते तिला शेवंता या नावानेच ओळखू लागले आहेत.  सहाजिकच तिच्या चाहत्यांनी शेंवताच्या या व्हिडिओला व्हायरल केलं. ज्यामुळे या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि शेअर मिळाल्या होत्या. 

फोटोसौजन्य -  इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

‘या’ अभिनेत्रीने समुद्रकिनारी बिकनीत शेअर केल्या हॉट योगा पोझ

कार्तिकसोबत बोल्ड सीन्स देण्यास माझी काहीच हरकत नाही

सलमान खानने दिली प्रेमाची कबुली 'या' अभिनेत्रीचे पाहतो फोटो झूम करून