‘फायर पान’ खाऊन ‘या’ अभिनेत्रीचे झाले हाल, व्हिडिओ व्हायरल

‘फायर पान’ खाऊन ‘या’ अभिनेत्रीचे झाले हाल, व्हिडिओ व्हायरल

फायर पान हा सध्या एक ट्रेंडिंग प्रकार आहे. हे पान खायला तसे तर बरेच जण घाबरतात. पण या पानाची चव मात्र अप्रतिम असते. असाच फायर पान खाण्याचा अनुभव प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माने घेतलाय. निया सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नियाने फायर पान खातानाचा एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. नियाने हे पान खाताना केलेला चेहरा तर बघण्यासारखा आहे. हे पान खाण्यापूर्वी खूपच घाबरलेली आणि भेदरलेली दिसून येत आहे. हा व्हिडिओ एका दिवसात सहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून आता व्हायरल होत आहे. 

निया सध्या मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये करतेय दौरा

View this post on Instagram

Twist with the PAAN!! It’s 🔥 Paan!! #indore

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

निया सध्या मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये आहे. निया आपले बरेच लहान सहान व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. असाच फायर पान खातानाचा व्हिडिओ नियाने पोस्ट केला आहे. यामध्ये फायर पान अर्थात पानाला आग लागलेली असताना हे पान खायचं असतं. हे पान खाताना निया आधी मात्र घाबरलेली आहे. इतकंच नाही तर पान खाण्याआधी आरडाओरडाही करत होती. पण इतरांच्या सांगण्यावरून तिने हे पान खाल्लं. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरली भाव पाहताना समोरच्यांनाही मजा येत आहे. नियाने याआधी ‘खतरों के खिलाडी’ हा रियालिटी शो केला होता. त्यामध्येही ती प्रत्येक टास्कच्या आधी घाबरलेली असायची पण ती टास्क पूर्ण करायचीच. फायर पान खाणं हादेखील तिच्यासाठी एक टास्कच होता असं तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे. दरम्यान काही लोकांना तिचा हा व्हिडिओ आवडला नसून ती ओव्हरअॅक्टिंग करत आहे अशा कमेंट्सही तिच्या या व्हिडिओला मिळाल्या आहेत. पण निया कधीही लोकांचा विचार न करता आपल्याला हवं तेच करते आणि नेहमी लहानसहान गोष्टींचा आनंद घेत जगते हे आधीही पाहण्यात आलं आहे. 

निया आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

Instagram

निया ही लहान पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. नियाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये कामं केली असून रियालिटी शो आणि कॉमेडी शो मध्येही काम केलं आहे. नियाला हिंदी बिग बॉससाठी बऱ्याचदा विचारणा झाली असून तिने मात्र प्रत्येकवेळी या शो ला नकार दिला आहे. निया आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त बोलते आणि नेहमीच एखाद्या गोष्टीबद्दल योग्य स्टँड घेताना सोशल मीडियावरही दिसली आहे. तिचे अनेक चाहते असून तिला सोशल मीडियावरही अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या निया कोणत्याही मालिकेत काम करत नसून आपल्या कुटुंबासह आणि मित्रमैत्रिणींसह मध्यप्रदेशमधील इंदूर इथे फिरत आहे. या ट्रीपमध्येदेखील ती मनापासून प्रत्येक लहानसहान गोष्टींचा आनंद घेताना दिसत असून सतत काही ना काहीतरी व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरून पोस्ट करताना दिसत आहे. ती नेहमीच आपल्या आयुष्यातील अपडेट्स आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून देत असते. त्यामुळे चाहत्यांना आता ती पुढे कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याचीही उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. नियाने अजूनही कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केली नसून नुकतीच तिची मालिका ‘प्यार में मर जावा’ संपली आहे. त्यानंतरच तिने काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे.