अंबानीच्या घरी साजरी झाली निक-प्रियांकाची होळी

अंबानीच्या घरी साजरी झाली निक-प्रियांकाची होळी

रंगपंचमी उद्या असली तरी बॉलीवूड स्टार्सनी चक्क तीन दिवस आधीच ती साजरी केली आहे. याचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनीही त्यांची होळी भारतात साजरी केली आहे. अंबानींनी ठेवलेल्या ग्रँड होली पार्टीमध्ये सगळ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली पण त्याचा सगळ्यात जास्त आनंद घेतला तो निक- प्रियांका जोनसने.त्यांचे फोटो आणि व्हिडिओ याची साक्ष आहे. त्यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहुयात अंबानींच्या या पार्टीमधील खास क्षण जे तुम्हाला ही होळी खेळण्यास उद्युक्त करतील.

होळीच्या रंगाचे डाग कसे काढायचे, सोपी पद्धत

निकने लावले देसी ठुमके

 अंबानी कुटुंबाकडून ही खास पार्टी सेलिब्रिटींसाठी ठेवण्यात आली होती. अनेक कलाकारांना या पार्टीसाठी बोलावण्यात आले होते. यात देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनाही खास आमंत्रण देण्यात आले होते. निकला आधीही आपण बॉलीवूडच्या गाण्यांवर नाचताना पाहिले आहे. त्यामुळे या पार्टीतही तो एकदम जोशात नाचला. प्रियांका आणि इतर सेलिब्रिटींसोबत तो या पार्टीमध्ये ठुमके लावताना दिसला. त्यामुळ सगळ्यांचे लक्ष निकने वेधून घेतले होते. अमेरिकन निक यावेळी छान सफेद रंगाच्या कुडता पायजमा या सोज्वळ लुकमध्ये दिसला तर प्रियांका ऑफ व्हाईट रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसली. या शिवाय अनेक सेलिब्रिटी डिझायनर वेअरमध्ये दिसल्या

सोनाली, कतरिना,डाएनाने लावली हजेरी

अंबानीच्या या होळी पार्टीचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक सेलिब्रिटी दिसत आहे. कतरिना, सोनाली बेंद्रे, डाएना पेंटी, हुमा कुरेशी, जॅकलिन फर्नांडिस या सगळ्यांनी हजेरी लावली होती. सगळ्यांनीच अंबानीच्या होळी पार्टीमध्ये चार चाँद लावले. 

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी झळकणार वेबसीरिजमध्ये

मीम्सना आले उधाण

निक- प्रियांका भारतात आले की, त्यांच्यावर मीम्सचा पाऊस पडत नाही असे होत नाही. सगळ्यांना ही जोडी आवडत असली तरी देखील त्यांच्यावर मीम्स होत नाहीत असे शक्य नाही. आताही अनेकांनी त्यांच्यावर मीम्स करायला सुरुवात केली आहे. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

बी टाऊनमध्ये आणखीही पार्टी होण्याची शक्यता

अंबानी यांच्या पार्टीने या सगळ्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली असली तरी देखील अजून बऱ्याच पार्टी व्हायच्या आहेत. बॉलिवूडच नाही तर अजून टीव्ही स्टार्सच्याही होळी पार्टीला सुरुवात व्हायची आहे.

रंगाची उधळण आणि पाण्याची मजा, कोरोनाचे काय ?

सध्या देशात कोरोना व्हायरसची भीती अनेकांना सतावते आहे. एकीकडे पालिकेकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. एकमेकांच्या जवळ जाऊ नका. तोंडाला स्पर्श करु नका असे सांगितले जात आहे. पण अंबांनीच्या घरात मात्र अगदी बिनधास्त रंगाची उधळण आणि पाण्याची मजा लुटली जात आहे. त्यामुळे बॉलीवूडला कोरोनाची भीती फक्त मास्क लावण्यापूर्तीच आहे असे दिसून येत आहे.


आता ही पार्टी पाहिल्यानंतर तुम्हाला रंगाची उधळण करावीसी वाटत असेल पण थोडी सावध भूमिका घ्या आणि सणाचा आनंद लुटा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.