प्रियांकाला समुद्रात पडण्यापासून वाचवलं निकने, व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रियांकाला समुद्रात पडण्यापासून वाचवलं निकने, व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रियांका आणि निकचं लग्न झाल्यापासून ही जोडी नेहमीच चर्चेत असते. ही जोडी कुठेही गेली तरी यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या निक आणि प्रियांका त्यांचा भाऊ जो जोनस आणि सोफी टर्नरच्या दुसऱ्या लग्नाला पॅरिसमध्ये हजर राहिले आहेत. याआधी जो आणि सोफीने चर्चमध्ये लग्न केलं असून आता पुन्हा ते धुमधडाक्यात लग्न करत आहेत. याचवेळी बोटीतला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून निकचं प्रियांकावरील प्रेम प्रत्येकवेळी दिसून येत आहे. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असून नेहमीच आपलं प्रेम दोघंही अगदी सोशल मीडियावरूनही व्यक्त करत असतात. पण अर्थात ते फक्त दाखवायला नसतं तर अशा प्रसंगांमधूनही त्यांचं प्रेम दिसून येतं. निक नेहमीच प्रियांकाची काळजी घेताना दिसून येतो. या व्हिडिओतूनही त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. 

नक्की काय घडलं?

निक, प्रियांका, सोफी आणि जो असे सगळेजण एका बोटीतून प्रवास करताना दिसून येत आहेत. त्याचवेळी समुद्रावरील हवेने संपूर्ण बोट हलली आणि प्रियांचा बॅलेन्स गेला. त्यावेळी प्रियांका बॅलेन्स जाऊन समुद्रात पडली असती. मात्र निकने प्रसंगावधानाने तिचा हात पकडून तिला सांभाळलं. मात्र त्याच्या हातातील ग्लास पाण्यात पडला. हे दोघंही पॅरिसला जो आणि सोफीच्या लग्नासाठी जात होते. अशा गोष्टीतून नेहमीच निकचं प्रियांकावरील प्रेम दिसून आलं आहे. यापूर्वीदेखील एका समारंभात प्रियांका पायऱ्यांवरून पाय घसरून पडत असताना निकने तिला सांभाळल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा निकने प्रियांकाला पडताना सांभाळलं आहे. सध्या या लग्नाची तयारी चालू झाली असून सगळेच आनंदी आहेत. 

निक - प्रियांका दोघेही जो-सोफीच्या लग्नात व्यस्त

निक आणि प्रियांकाचं सात महिन्यांपूर्वी भारतात लग्न झालं तर जो आणि सोफीने काही दिवसांपूर्वीच चर्चमध्ये लग्न केलं. पण आता पुन्हा जो आणि सोफी पॅरिसमध्ये लग्न करत आहेत. सध्या त्याच्याच तयारीमध्ये निक आणि प्रियांका व्यस्त आहेत. प्रियांका आणि निक या दोघांच्याही खूपच जवळचे आहेत. दीर आणि जाऊ या नात्यापेक्षाही मित्र आणि मैत्रीण हे नातं त्यांच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे ही चौकडी बऱ्याचदा एकत्र पाहायला मिळते. निक आणि त्यांच्या भावांचा बँड जोनस ब्रदर्स बराच प्रसिद्ध आहे. इतकंच नाही गेल्या काही महिन्यात त्यांचा अल्बमदेखील पहिल्या क्रमांकावर असून निक आणि जो दोघेही प्रसिद्ध आहेत. तर सोफीदेखील हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून गेली कित्येक वर्ष जो बरोबर डेट करत आहे. आज या दोघांचं लग्न असून हे चौघं नक्की कोणत्या फॅशनेबल कपड्यांबद्दल दिसतील याचीदेखील त्यांच्या चाहत्यांना आता उत्सुकता लागून राहिली आहे. 

प्रियांका नुकतीच येऊन गेली भारतात

प्रियांका नुकतीच भारतात येऊन गेली. तिच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून नुकतीच तिने पार्टीदेखील एन्जॉय केली. या चित्रपटात तिच्याबरोबर पुन्हा एकदा फरहान अख्तर दिसून येणार आहे. प्रियांका चोप्रा बॉलीवूड आणि हॉलीवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या काम करत असून लग्नानंतर निकबरोबरील संसार आणि करिअर या दोन्ही गोष्टी सध्या बॅलेन्स करत आहे. तर ती नेहमीच आपल्या सासरच्या मंडळींबरोबरील फोटोदेखील शेअर करत असते.