#NickYanka दिल्ली रिसेप्शनचा फर्स्ट लुक

#NickYanka दिल्ली रिसेप्शनचा फर्स्ट लुक

#Nickyanka च्या दिल्ली रिसेप्शचा हा फर्स्ट लुक खास तुमच्यासाठी. देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि विदेसी बाबू निक जोनस यांचा दिल्ली रिसेप्शनमधला फर्स्ट लुक एकमद झक्कास आहे. नाही का?


WhatsApp Image 2018-12-04 at 9.11.09 PM %282%29


फोटो सौजन्य : @photobygulshansachdeva


नववधू प्रिया मी बावरते.. अशा अंदाजात हे जोडपं अगदी खुललंय. लाल चु़डा, भांगेत सिंदूर, केसात माळलेली फुलं आणि त्यावर नाजूकसं हास्य सोबतीला नवरा. आहाहा.. पाहा या दोघांची केमिस्ट्री 


 WhatsApp Image 2018-12-04 at 9.24.19 PM


दिल्लीतल्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये हे रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे. हे रिसेप्शन खास दिल्लीतल्या बिझनेस, राजकारण आणि फॅशन जगतातील बड्या व्यक्तींसाठी ठेवण्यात आलं आहे. 


WhatsApp Image 2018-12-04 at 9.11.01 PM


फोटो सौजन्य : @photobygulshansachdeva


#NickYanka च्या रिसेप्शनला मोदींची उपस्थिती


#Nickyanka च्या दिल्ली रिसेप्शनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थिती लावली आणि या नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले. लग्नासाठी जोधपूरला रवाना होण्याआधी या जोडप्याने खास मोदींची भेट घेऊन त्यांना दिल्ली रिसेप्शनला येण्याचं आमंत्रण दिलं होतं.

फोटो सौजन्य : Instagram 


रिसेप्शनच्या काही तास आधीच त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. ख्रिश्चन लग्नाच्या फोटोमधील देसी गर्ल प्रियांकाचा लुक अगदी एखाद्या परीसारखा वाटत होता.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

And forever starts now... ❤️ @nickjonas


A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on
तर हिंदू पद्धतीने केलेल्या लग्नात परदेसी बाबू ही एखाद्या बॉलीवूड चित्रपटातील दुल्हेराजासारखा दिसत होता. 
 

 

 


View this post on Instagram


 

 

And forever starts now... ❤️ @nickjonas


A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on
 


दुसरं रिसेप्शन मुंबईत 


#Nickyanka चं दुसरं रिसेप्शन मुंबईला होणार आहे. या रिसेप्शनला बॉलीवूड जगतातील प्रियांकाच्या निकटवर्तीयांना आमंत्रित करण्यात येईल. #Virushka आणि #DeepVeer यांच्या लग्नानंतर वेगवेगळ्या ठिकाणी रिसेप्शन देण्याचा हा नवीनच ट्रेंड रूजू झालाय, असं म्हणायला हरकत नाही.जोधपूर आणि #Nickyanka


#Nickyanka नी जोधपूरमधल्या शाही ठिकाणी म्हणजेच उमेद भवन पॅलेस येथे दोन पद्धतीने विवाह केला. ग्रॅंड संगीत आणि कलरफुल मेंदी असे सगळे फंक्शन्ससुद्धा अगदी कुटुंबासह एन्जॉय केले. एवढं की, संगीत सोहळ्यात देसी गर्ल प्रियांकाच्या सासरच्यांनी अगदी ठेका धरत डान्स करून सगळ्यांनाच चाट पाडलं.देसी गर्ल प्रियांकाने लग्न जरी अगदी खाजगी ठेवलं तरी जोधपूरहून दिल्लीला रवाना होताना तिने सर्व कसर भरून काढली. ती अशी…


3-nickyanka-airport-looks-feelings


दिल्लीला रवाना होताना जोधपूर विमानतळावर तिने सर्व फोटोग्राफर्सना भरभरून फोटो काढू दिले. या वेळी प्रियांका कुठल्याही नववधूप्रमाणे सिंदूर लावून आणि हातात चुडा घातला होता. जावई निक यांनी ही प्रियांकाबरोबर वेगवेगळ्या पोझेस देऊन सगळ्यांची वाहवा मिळवली. अशा प्रकारे ही मुंबईतल्या देसी गर्लची न्यूयॉर्कमध्ये सुरू झालेली प्रेम कहाणी जोधपूरमध्ये सुफळ संपूर्ण झाली.