नीता अंबानीच्या ब्लाऊजवर रेशमी धाग्यांनी जडवले आहे आकाश - श्लोकाचं नाव

नीता अंबानीच्या ब्लाऊजवर रेशमी धाग्यांनी जडवले आहे आकाश - श्लोकाचं नाव

देशातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून ओळख असणाऱ्या मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबांनीची स्वतःची अशी वेगळी ओळख नक्कीच आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीत अंबानी यांना रॉयल ब्यूटी क्वीन म्हटलं जातं. त्या नेहमीच काहीतरी वेगळा आणि अनोखा पेहराव घालतात. अर्थात सर्वांमध्ये वेगळ्या उठून दिसतात. नीता अंबानीसमोर अनेक मोठमोठ्या अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतात असं म्हणावं लागेल. आकाश आणि श्लोकाच्या लग्नातही नीता अंबानी अप्रतिम दिसत होत्या. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीता अंबानीचा ब्लाऊज जास्त उठावदार होता.


nita ambani wedding pictures


काय आहे वैशिष्ट्य


आपला मुलगा आकाश अंबानी आणि हिरा व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता यांच्या लग्नाचा थाट काही औरच होता. यांच्या लग्नामध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते राजनीती आणि क्रिकेटमधील दिग्गजही उपस्थित होते. या सोहळ्यात सर्वात सुंदर आणि उठावदार दिसत होत्या त्या नीता अंबानी. गुलाबी रंगाच्या हेव्ही लुकवाला ट्रेडिशनल लेहंग्यामध्ये नीता अंबानीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. तसंच त्यांनी या लेहंग्यावर हिरव्या रंगाचा कुंदन सेट घालून त्याची शोभा अधिक वाढवली होती. पण या लेहंग्यापेक्षाही लक्ष वेधून घेत होता तो त्यांचा ब्लाऊज.


nita-ambani 1552138085 3210056


या ब्लाऊजवर रेशमी धाग्यांनी आकाश आणि श्लोकाचं नाव गुंफलं होतं. त्याशिवाय त्यावर मोठ्या अक्षरात ‘शुभारंभ’ असंही लिहिलं होतं. हा लेहंगा मल्टीकलरच्या रेशमी धाग्यांनी बनवून घेतलेला आहे. नीता अंबानी यांचा पेहराव इतका रॉयल आहे की, इतर कोणाकडेही लग्नामध्ये लक्ष जाणार नाही.


नीता यांनी ब्लाऊज इतका सुंदर तयार करून घेतला आहे की, सर्वांचं लक्ष या ब्लाऊजकडे होतं आणि नीता यांनी सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतल्या होत्या असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. अंबानी यांच्या घरात कितीतरी वर्षांनी सून येत आहे. त्यामुळे त्यावर कोरलेल्या ‘शुभारंभ’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. अर्थात नवी सुरुवात. आकाश आणि श्लोकाच्या आयुष्याची ही नवी सुरुवात आहे. त्यामुळेदेखील या शब्दाला विशेष महत्त्व आहे आणि त्यासाठीच नीता अंबानी यांचा हा ब्लाऊज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.


लग्नात गुलाबी रंगाची छटा


neeta with family


या लग्नामधील वैशिष्ट्य म्हणजे अंबानी कुटुंबीयांनी पिंक अर्थात गुलाबी रंगाच्या विविध छटा परिधान केल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक जण वेगळा तरीही खास दिसत होता. शिवाय आपल्या मुलाच्या लग्नामध्ये नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनीदेखील अगदी मनापासून डान्स केला. स्वतः आकाश अंबानीनेदेखील आपल्या वरातीमध्ये करण जोहर, हार्दिक पंड्या आणि रणबीर कपूरबरोबर धमाल केली. नीता अंबानीने तर काला चष्मा या गाण्यावर काळा गॉगल घालून डान्स केला. सोशल मीडियावर सध्या अंबानी कुटुंबाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.


neeta dancing


पाहा नीता अंबानींचा डान्स व्हिडिओ -श्लोका आणि आकाश दोघांचंही लग्न संपन्न झालं आहे. 9 मार्चपासून सुरु झालेला हा सोहळा तीन दिवस चालूच राहणार आहे. 11 मार्चला मोठं वेडिंग रिसेप्शन देण्यात येणार असून या रिसेप्शनमध्येही बॉलीवूड, पॉलिटिक्स, खेळ आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांची हजेरी लागणार आहे.


फोटो सौजन्य - Instagram, Photographer Pallav, Manav Manglani 


हेदेखील वाचा - 


आकाश अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी पाहुण्यांचा थाट, पाहा फोटो


आकाश आणि श्लोकाच्या लग्नामध्ये फुलांच्या सजावटीचं संपूर्ण डेकोरेशन


आकाश आणि श्लोकाचं स्वप्नवत लग्न, समोर आला पहिला लुक